Tuesday, July 14, 2026
Homeगडचिरोलीपालकमंत्र्यांनी गडचिरोली जिल्ह्यातील जनतेला सोडले वाऱ्यावर- काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाडे ...

पालकमंत्र्यांनी गडचिरोली जिल्ह्यातील जनतेला सोडले वाऱ्यावर- काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाडे -पुरामुळे शेकडो गावांचा संपर्क तुटला,पिकांचे प्रचंड नुकसान,रस्ताच नसल्याने सर्प दंश झालेला इसम दवाखान्यात पोहचूच शकला नाही…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

गडचिरोली :-मागील आठवडाभरापासून पडत असलेला पाऊस आणि पुरामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांवर अस्मानी संकट ओढवले आहे.या पार्श्वभुमीवर राज्याचे उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री मात्र निव्वळ पक्षाच्या कार्यक्रमात व्यस्त असून,त्यांनी जनतेला वाऱ्यावर सोडले आहे;अशी टीका काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाडे यांनी केली आहे.

महेंद्र ब्राम्हणवाडे यांनी प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की,आठवडाभरापासून मुसळधार पाऊस पडत असल्याने जिल्ह्यात पूर परिस्थिती निर्माण झाली आहे.शेकडो गावांचा संपर्क तुटला आहे.याबरोबरच घरांची पडझड झाली असून,पिकांचेही प्रचंड नुकसान झाले आहे.नाल्यावर पूल नसल्याने भामरागड तालुक्यातील एका गरोदर महिलेला जेसीबीच्या साह्याने नाला पार करावा लागला.कुरखेडा तालुक्यातील सती नदीवरील रपटा वाहून गेल्याने अनेक विद्यार्थ्यांना पुरामुळे शाळेत जाणे शक्य होत नाही.सर्पदंश झालेल्या एक इसम रस्ताच नसल्याने दवाखान्यात पोहचू शकला नाही.परिणामी त्याचा जीव गेला.अनेक रस्त्यांची दूरवस्था झाली असून, अहेरी-सिरोंचा बस कित्येक दिवसांपासून बंद आहे.या विदारक परिस्थितीत खासदार डॉ.नामदेव किरसान यांनी संसदेचे अधिवेशन सुरु असताना सुटीच्या दिवशी येऊन् पूरग्रस्त भागाचा दौरा करुन प्रशासनाला आवश्यक सूचना केल्या.अशावेळी जिल्ह्याचे पालक असलेले देवेंद्र फडणवीस कुठे हरवले आहेत, असा सवाल ब्राम्हणवाटे यांनी केला आहे.

जिल्ह्यातील नागरिकांना पालकमंत्र्यांच्या मदतीची गरज असताना, ते पक्षाच्या कार्यक्रमात व्यस्त आहेत,अशी टीकाही काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाडे यांनी केली आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

वसतिगृहातील गंभीर अनियमिततेवर आमदार मसराम संतप्त.. – आरमोरी येथील वसतिगृहांची प्रत्यक्ष पाहणी..

उद्रेक न्युज वृत्त  आरमोरी(गडचिरोली):-आरमोरी शहरातील शासकीय आदिवासी मुला-मुलींच्या वसतिगृहास आरमोरी विधानसभा क्षेत्राचे आमदार रामदास मसराम यांनी अचानकपणे भेट देऊन प्रत्यक्ष पाहणी केली असता वसतिगृहातील अनेक...

आज दहावी आणि बारावीच्या पुरवणी परीक्षेचा निकाल होणार जाहीर..

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे जून-जुलैमध्ये घेण्यात आलेल्या दहावी व बारावीच्या पुरवणी परीक्षेचा निकाल आज,मंगळवार १४ जुलै रोजी...

केंद्रीय विद्यालयात इयत्ता पहिली ते पाचवीच्या प्रवेशासाठी अर्ज प्रक्रिया सुरू..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-गडचिरोली येथे नव्याने सुरू झालेल्या केंद्रीय विद्यालयात शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी इयत्ता १ ली ते ५ वी मधील रिक्त जागांसाठी प्रवेश...

आता मार्केटमध्ये येणार दहा किलो वजनाचा गॅस सिलेंडर..

उद्रेक न्युज वृत्त:-बऱ्याच ठिकाणी जागेचा अभाव, वजनी सिलेंडर तसेच वजनानुसार वाढणारी रक्कम सर्वसामान्यांना न झेपावणारी असते.विशेषतः लहान व्यावसायिक,हॉटेल चालक आणि रस्त्यावरील विक्रेते. यासाठी सरकारी...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!