Wednesday, October 21, 2026
Homeआरमोरीबेपत्ता ग्रामपंचायत शिपायाचा तब्बल १८ दिवसांनी जंगलात आढळून आला झाडाला लटकलेल्या स्थितीत...

बेपत्ता ग्रामपंचायत शिपायाचा तब्बल १८ दिवसांनी जंगलात आढळून आला झाडाला लटकलेल्या स्थितीत मृतदेह.. – आरमोरी तालुक्यातील घटना..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
आरमोरी(गडचिरोली):-आरमोरी तालुक्याच्या कुरंडीमाल येथील ग्रामपंचायतीचा शिपाई अमृत सुखदेव सराटे वय ३० वर्षे, रा.कुरंडीमाल,ता.आरमोरी
हा १६ नोव्हेंबरला सकाळी शौचास जातो म्हणून घरून निघून बाहेर पडला होता; परंतु बराच वेळ होऊनसुद्धा तो घरी परतला नाही.त्यामुळे कुटुंबीयांनी  त्याची सर्वत्र शोधा-शोध केली,पण त्याचा कुठेही थांगपत्ता लागला नाही.त्यामुळे कुटुंबीयांनी आरमोरी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती.अशातच काल,मंगळवारी ३ डिसेंबरला गावातील एक व्यक्ती सरपण आणण्यासाठी जंगलात गेला असता,त्यास एक व्यक्ती झाडाला लटकलेल्या स्थितीत आढळून आला.जवळ जाऊन बघितले असता,गावातीलच बेपत्ता असलेला ग्रामपंचायतीचा शिपाई असल्याचे लक्षात येताच घटनेची माहिती गावात वाऱ्यासारखी पसरली.त्यानुसार आरमोरी पोलिसांना पाचारण करण्यात आले.आरमोरी पोलिसांनी मृतदेह खाली उतरवून जागेवरच उत्तरीय तपासणी केली.त्यानंतर मृतदेह ग्रामीण रुग्णालयात पाठविला. याप्रकरणी आरमोरी ठाण्यात ‘आकस्मिक मृत्यू’ची नोंद करण्यात आली आहे.शिपायाच्या मृत्यूचे कारण अद्याप कळलेले नसून पुढील तपास आरमोरी पोलीस करीत आहेत.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

शेतात धान कापण्यासाठी गेली ती परतलीच नाही; वाघाच्या हल्ल्यात मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्याच्या एटापल्ली तालुक्यातून ऐन सणाच्या दिवशीच धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.शेतावर धान कापणीसाठी गेलेल्या वृध्द महिलेचा वाघाच्या हल्ल्यात मृत्यू झाल्याची घटना आज,मंगळवार...

गडचिरोली सायबर कमांडो पथकाची उल्लेखनीय कामगिरी.. -हरवलेले तब्बल ६ लाख रुपये किंमतीचे २१ मोबाईल मूळ मालकांना परत..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-विजयादशमी हा सण सत्याचा असत्यावर आणि चांगुलपणाचा वाईट प्रवृत्तींवर विजय मिळविण्याचा संदेश देतो.याच शुभमुहूर्तावर आज गडचिरोली पोलीस स्टेशनने नागरिकांच्या चेहऱ्यावर आनंद...

देसाईगंज तालुका दुष्काळग्रस्त घोषित करा.. -दहा दिवसांत निर्णय न झाल्यास बेमुदत उपोषणाचा इशारा..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-सन २०२६ च्या खरीप हंगामात अनियमित पाऊस,वाढते तापमान,वादळ,कीड व रोगांचा प्रादुर्भाव तसेच वन्यप्राण्यांमुळे धान पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.या पार्श्वभूमीवर देसाईगंज...

‘तिच्या’ त्रासाला अन् वादाला वैतागला; शिक्षकाने केली प्रेयसीची हत्या..!

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-एका विवाहित महिलेशी प्रेमसंबंध असलेल्या प्रेमाचा शेवट अखेर प्रेयसीच्या हत्येने झाल्याची घटना नुकतीच चंद्रपुरात उघडकीस आली.प्रेयसीच्या हत्येप्रकरणी आरोपी शिक्षकास अटक करून...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!