Friday, June 19, 2026
Homeचंद्रपूरपकडलेल्या २०० क्विंटल तांदळाची आज होणार चौकशी.. - तांदळाची खरेदी-विक्री करतांना परवाना...

पकडलेल्या २०० क्विंटल तांदळाची आज होणार चौकशी.. – तांदळाची खरेदी-विक्री करतांना परवाना आवश्यक..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
चंद्रपूर :-तांदळाची खरेदी-विक्री करतांना परवाना आवश्यक आहे.त्याचबरोबर,परवानाधारक व्यापाऱ्यांकडे खरेदी-विक्री रजिस्टर,विक्रेत्यांची यादी,साठ्याची नोंद, साठ्यासाठी स्वतंत्र स्टॉक परवाना व नोंदणीकृत गोदाम असणे बंधनकारक आहे.मात्र,काहीजणांकडे कुठल्याही प्रकारचा परवाना नसतांना तांदळाची खरेदी करून विक्रीसाठी अवैधपणे वाहतूक करतांना दिसून येतात. असाच धक्कादायक प्रकार  चंद्रपूर जिल्ह्याच्या गोंडपिपरी शहरात दोन दिवसांपूर्वी उघडकीस आला आहे.प्रकरणी पोलिसांनी तब्बल २०० क्विंटल तांदळाची अवैध वाहतूक सुरू असतांना तांदूळ भरलेला ट्रक जप्त केला असून आज,गुरुवार २९ जानेवारी रोजी चौकशी करून दोषी आढळल्यास जीवनावश्यक वस्तू अधिनियम १९५५ अंतर्गत कारवाई करू,असे गोंडपिपरी पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक रमेश हत्तीगोटे यांनी म्हटले आहे.प्राथमिक तपासात जप्त करण्यात आलेला तांदूळ हा गोंडपिपरीतील व्यावसायिक पौणिमा चापले यांचा असल्याचे स्पष्ट झाले आहे.प्रकरणी पोलिसांनी त्यांची चौकशी सुरू केली असून तांदळाच्या खरेदी-विक्री संबंधी कागदपत्रांची पडताळणी केली जात आहे.जप्त केलेला तांदूळ रेशन दुकानातून अपहार करून काळाबाजारासाठी नेला जात होता कां?याचाही तपास सुरू करण्यात आला आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

कुटुंबीयांना भेटण्यासाठी गावात येताच नक्षली समर्थक पोलिसांच्या तावडीत..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-तब्बल अकरा वर्षांपासून पोलिसांना गुंगारा देणारा नक्षल समर्थक अखेर पोलिसांच्या तावडीत सापडला.विशेष म्हणजे,कुटुंबीयांना भेटण्यासाठी गावात येताच त्यास अटक करण्यात आली.त्याचा शोध...

देसाईगंजात सुगंधित तंबाखूविक्री जोमात; आरमोरीत अवैध सट्टा-पट्टी,तर कुरखेड्यात दारूचा महापूर..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-गडचिरोली जिल्ह्याच्या विविध तालुक्यात अवैध धंद्यांनी डोके वर काढले असून देसाईगंज शहर व तालुक्यात सुगंधित तंबाखूची खुलेआम विक्री,तर आरमोरी शहरापासून ते ग्रामीण...

जीएसटी नंबर मिळवून दिले नं..! आता दहा हजार द्या.. – राज्यकर निरीक्षक लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-गलेलठ्ठ पगार असतांना एकदा कां ओवर कमाईची सवय लागली रे लागली,तर मग ज्या टेबलावर कुठलेही काम मोफत जरी होत असेल तरी...

स्थानिक उत्पादनांना मिळणार नवी ओळख; गडचिरोली ब्रँडसाठी स्वतंत्र लोगो आणि टॅगलाईन..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-स्थानिक उत्पादनांना जागतिक बाजारपेठ मिळवून देण्यासाठी स्वतंत्र 'गडचिरोली ब्रँड' विकसित करणे,पर्यटन विकासाला गती देणे,महिला बचत गटांना अधिक सक्षम बनविणे,धान साठवणुकीची क्षमता...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!