Tuesday, September 1, 2026
Homeनागपूरकमी वय असतांना लग्न; सहमतीला महत्त्व नाही.. - प्रियकर बिन भाड्याच्या खोलीत..

कमी वय असतांना लग्न; सहमतीला महत्त्व नाही.. – प्रियकर बिन भाड्याच्या खोलीत..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
नागपूर :-अल्पवयीन बालकांचे लैंगिक छळापासून संरक्षण करण्यासाठी पोक्सो कायदा लागू करण्यात आला आहे.त्यानुसार,अल्पवयीन मुलीने लग्न व शरीरसंबंधास दिलेल्या सहमतीला काहीच महत्त्व नाही. अल्पवयीन मुर्लीचे लग्न व गर्भधारणा ही देशातील मोठी समस्या आहे.लहान वयात गर्भधारणा झाल्यानंतर मुलीसह बाळाचेही जीवन धोक्यात येते,त्यामुळे बलात्काराचा एफआयआर व खटला रद्द करता येणार नाही; असे मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे न्यायमूर्ती उर्मिला जोशी-फलके यांनी अल्पवयीन प्रेयसीसोबत लग्न करणाऱ्या प्रियकराला दणका देत बिन भाड्याच्या खोलीत पाठवले आहे.दीपक गजानन बुंदे वय २६ वर्षे, रा.गाडेगाव,जि.अकोला असे प्रियकराचे नाव असून घटनेच्या वेळी प्रेयसी ही १७ वर्षे वयाची होती.१७ जानेवारी २०२० रोजी तिने दीपकसोबत पळून जाऊन लग्न केले.त्यानंतर,पोलिसांनी तिचा शोध घेतला असता ती सात महिन्यांची गर्भवती होती.त्यामुळे अकोला जिल्ह्याच्या तेलहारा तालुक्यातील हिवरखेड पोलिसांनी दीपकविरुद्ध बलात्कारासह इतर संबंधित गुन्ह्यांचा एफआयआर नोंदविला व तपासानंतर विशेष सत्र न्यायालयात खटला दाखल केला होता.परिणामी, दीपकने मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात
याचिका दाखल करून प्रकरणातील एफआयआर व खटला रद्द करण्याची मागणी केली होती.त्यानुसार, न्यायालयाने विविध बाबी लक्षात घेता,दाखल केलेली याचिका फेटाळून लावत प्रियकराला दणका दिला आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

धक्कादायक..! जेवणाच्या डाळभाजीत पाल; ३० विद्यार्थ्यांना विषबाधेची लक्षणे..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-विद्यार्थ्यांच्या जेवणाच्या डाळभाजीत पाल (विचगुर)पडल्याने तब्बल ३० विद्यार्थ्यांना विषबाधेची लक्षणे जाणवू लागल्याची घटना आज,मंगळवार १ सप्टेंबर रोजी सकाळच्या सुमारास चंद्रपूर जिल्ह्याच्या...

अनाथ बालकांना योजनांचा लाभ वेळेत देण्याचे जिल्ह्याधिकाऱ्यांचे निर्देश..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यात महिला व बालकांच्या कल्याणासाठी राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी करून पात्र लाभार्थ्यांपर्यंत त्यांचा लाभ वेळेत पोहोचवावा.बालविवाह व अल्पवयीन मातांशी...

आजपासून बसमधून प्रवास करणाऱ्या ज्येष्ठ नागरिक व महिला प्रवाशांसाठी ‘एनसीएमसी’ कार्ड अनिवार्य..

उद्रेक न्युज वृत्त :-एसटी महामंडळाच्या बसेसमधून प्रवास करणाऱ्या विविध सवलतधारक प्रवाशांसाठी आज,मंगळवार १ सप्टेंबर पासून 'नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड' म्हणजेच संपर्करहित स्मार्ट कार्ड (एनसीएमसी)अनिवार्य करण्यात आले...

एकल महिला सर्वेक्षणात नाव न समाविष्ट झालेल्या महिलांना नाव नोंदविण्याची संधी- देसाईगंज नगर परिषदेचे मुख्याधिकारी सतिश चौधरी

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-देसाईगंज नगर परिषदेच्या महिला व बाल विकास विभागाच्या वतीने देसाईगंज शहरातील एकल प्रकारातील महिलांचे सर्वेक्षण संबंधित वार्डातील महिला बचत गटांच्या सदस्यांच्या माध्यमातून...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!