Friday, June 19, 2026
Homeउद्रेक न्युज वृत्तराज्यात तीन दिवस शासकीय दुखवटा जाहीर; पण उद्याला सुट्टी असणार की नाही?...

राज्यात तीन दिवस शासकीय दुखवटा जाहीर; पण उद्याला सुट्टी असणार की नाही? जाणून घ्या..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त :-राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आज,बुधवार २८ जानेवारी रोजी विमान अपघातात निधन झाले.यामुळे महाराष्ट्रात २८ ते ३० जानेवारी २०२६ पर्यंत तीन दिवसांचा शासकीय दुखवटा जाहीर करण्यात आला आहे.त्यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत,असे सामान्य प्रशासन विभाग(राजशिष्टाचार) विभागामार्फत कळविण्यात आले आहे.या तीन दिवसांच्या कालावधीत महाराष्ट्रातील ज्या इमारतींवर नियमितपणे राष्ट्रध्वज फडकविण्यात येतो,त्या सर्व ठिकाणी राष्ट्रध्वज अर्ध्यावर उतरविण्यात येईल.तसेच या कालावधीत कोणतेही शासकीय मनोरंजन कार्यक्रम आयोजित करण्यात येऊ नयेत.राष्ट्रीय किंवा प्रशासकीय दुखवट्याच्या काळात राष्ट्रध्वज अर्ध्यावर फडकवला जातो.मुख्यमंत्र्यांनी अजित पवारांच्या निधनानंतर प्रशासकीय दुखवटा जाहीर केल्यानंतर मंत्रालयासहीत सर्वच शासकीय कार्यालयांवरील राष्ट्रध्वज अर्ध्यावर उतरवण्यात आले आहेत.याला हाफ मास्ट असे म्हणतात.निधन झालेल्या व्यक्तीचे शासकीय इतमामाने अंत्यसंस्कार केले जातात. यासंदर्भातील आदेशही जारी करण्यात आला असून अजित पवारांच्या पार्थिवावर उद्या,गुरुवार २९ जानेवारी रोजी बारामतीमध्ये अंत्यसंस्कार केले जाणार आहे. अंत्यदर्शनासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह उपस्थित राहणार आहेत.काही राज्यांमध्ये अंत्यसंस्काराच्या दिवशी सुट्टी जाहीर केली जाते तर काही राज्यांमध्ये ज्या दिवशी अशा मान्यवर व्यक्तीचे निधन झाले आहे त्या दिवशी प्रशासकीय सुट्टी जाहीर केली जाते.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज म्हणजेच २८ जानेवारी रोजी प्रशासकीय सुट्टी जाहीर केली असली तरी पुढील दोन दिवसांसंदर्भात कोणतीही घोषणा केलेली नसल्याने सरकारी कार्यालये आणि शाळा सामान्यपणे सुरु राहणार असल्याचे सांगितले जात आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

वाघाच्या हल्ल्यात शेतकऱ्याचा मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-वाघाच्या हल्ल्यात एका शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना नागभीड तालुक्यातील गिरगाव येथे आज,शुक्रवार १९ जून रोजी सकाळच्या सुमारास उघडकीस आली.आत्माराम दसरू बोरकर...

कुटुंबीयांना भेटण्यासाठी गावात येताच नक्षली समर्थक पोलिसांच्या तावडीत..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-तब्बल अकरा वर्षांपासून पोलिसांना गुंगारा देणारा नक्षल समर्थक अखेर पोलिसांच्या तावडीत सापडला.विशेष म्हणजे,कुटुंबीयांना भेटण्यासाठी गावात येताच त्यास अटक करण्यात आली.त्याचा शोध...

देसाईगंजात सुगंधित तंबाखूविक्री जोमात; आरमोरीत अवैध सट्टा-पट्टी,तर कुरखेड्यात दारूचा महापूर..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-गडचिरोली जिल्ह्याच्या विविध तालुक्यात अवैध धंद्यांनी डोके वर काढले असून देसाईगंज शहर व तालुक्यात सुगंधित तंबाखूची खुलेआम विक्री,तर आरमोरी शहरापासून ते ग्रामीण...

जीएसटी नंबर मिळवून दिले नं..! आता दहा हजार द्या.. – राज्यकर निरीक्षक लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-गलेलठ्ठ पगार असतांना एकदा कां ओवर कमाईची सवय लागली रे लागली,तर मग ज्या टेबलावर कुठलेही काम मोफत जरी होत असेल तरी...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!