Thursday, July 30, 2026
Homeउद्रेक न्युज वृत्तविदर्भातील जिल्हे वगळता आजपासून शाळेला सुरुवात..

विदर्भातील जिल्हे वगळता आजपासून शाळेला सुरुवात..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र राज्याच्या विदर्भातील ११ जिल्हे वगळता आज,सोमवार १५ जूनपासून राज्यातील शाळांना अधिकृतपणे सुरुवात झाली आहे. राज्यभरात विविध ठिकाणी मंत्री,लोकप्रतिनिधी आणि शिक्षकांनी शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांचे स्वागत करून त्यांचे मनोबल वाढवले.राज्यातील सर्व शाळा १५ जूनपासून सुरू होणे अपेक्षित होते.मात्र,विदर्भातील वाढते उष्णतामान आणि उन्हाळी सुट्ट्यांचा कालावधी यामुळे या भागातील शाळा उशिरा सुरू करण्याची मागणी पुढे आली होती.या मागणीच्या अनुषंगाने काही शिक्षक संघटनांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याचिका दाखल केली होती.त्यानुसार, उष्णतेचा कहर,विद्यार्थ्यांचे आरोग्य आणि मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे निर्देश लक्षात घेता शिक्षण विभागाने सीबीएसई आणि राज्य मंडळाशी संलग्न असलेल्या सर्व प्राथमिक,माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळा आता १५ जूनऐवजी ३० जूनपासून सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.शिक्षणाधिकारी (माध्यमिक)यांनी जिल्ह्यातील सर्व गटशिक्षणाधिकारी आणि शाळा व्यवस्थापनांना याबाबतचे निर्देश जारी केले आहेत.त्यानुसार,आता नागपूर विभागातील नागपूर,
चंद्रपूर,भंडारा,गोंदिया,गडचिरोली,वर्धा,तसेच अमरावती विभागातील अमरावती,अकोला,यवतमाळ,बुलढाणा आणि वाशिम या विदर्भातील ११ जिल्ह्यांच्या शाळा ह्या येत्या,मंगळवार ३० जून २०२६ पासून सुरू होणार आहेत.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

रेल्वेच्या धडकेत दोन सख्ख्या भावांचा दुर्दैवी मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-रेल्वेच्या धडकेत दोन सख्ख्या भावांचा  दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना नागपूर जिल्ह्याच्या सावनेर तालुक्यातील मालेगाव टाऊन परिसरात आज,गुरुवार ३० जुलै रोजी सकाळच्या...

आज गडचिरोली जिल्ह्यातील पुरामुळे २५ मार्ग बंद..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-नुकतेच दोन दिवसांपूर्वी नागपूरच्या  प्रादेशिक हवामान खात्याने गडचिरोली जिल्ह्यासाठी काल,बुधवार २९ जुलै रोजी रेड अलर्ट,तर आज गुरुवारसाठी पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी केला होता. त्यानुसार,जिल्ह्याच्या...

लाखो रुपयांचा विदेशी दारूसाठा जप्त; कार ठेवून पळाला आरोपी..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे अवैधरीत्या दारूची वाहतूक करणाऱ्या कारचा पाठलाग करण्यात आला.दरम्यान,चालकाने पोलिसांना चकमा देण्याचा प्रयत्न केला खरी,पण त्याचा प्रयत्न...

ज्येष्ठ नागरिक आणि महिला प्रवाशांसाठी; …अन्यथा एसटी बसची मिळणारी सवलत होणार बंद..!

उद्रेक न्युज वृत्त :-एसटी महामंडळाच्या बसेसमधून प्रवास करणाऱ्या विविध सवलतधारक प्रवाशांसाठी 'नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड' म्हणजेच संपर्करहित स्मार्ट कार्ड(NCMC)अनिवार्य करण्यात आले आहे. त्यानुसार,येत्या शनिवार...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!