Monday, May 25, 2026
Homeचंद्रपूरनगर परिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांविरोधात कर्मचाऱ्यांचा एल्गार; अंतर्गत संघर्ष चव्हाट्यावर..

नगर परिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांविरोधात कर्मचाऱ्यांचा एल्गार; अंतर्गत संघर्ष चव्हाट्यावर..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
चंद्रपूर :-जिल्ह्याच्या चिमूर नगर परिषदेच्या सर्व विभागांतील कर्मचाऱ्यांनी मुख्याधिकारी अर्चना वंजारी यांच्या वागणुकीविरोधात एकत्र येत आज,मंगळवार ६ जानेवारीपासून बेमुदत कामबंद आंदोलन सुरू केले आहे.कर्मचाऱ्यांनी मुख्याधिकाऱ्यांवर शिवीगाळ, निलंबनाच्या धमक्या,वेतन कपात,रजा नाकारणे,सुट्टीच्या दिवशी जबरदस्ती हजेरी,रात्री उशिरापर्यंत काम करून घेणे व मानसिक छळ केल्याचे गंभीर आरोप करण्यात आले आहेत.नगर परिषद कार्यालय हे नागरिकांच्या सेवेसाठी असते; मात्र सध्या तेच कार्यालय अंतर्गत संघर्षामुळे ठप्प झाल्याने “लोका सांगे ब्रम्हज्ञान अन् स्वतः कोरडे पाषाण” असे म्हणण्याची वेळ आली आहे.
चिमूर नगर परिषदेतील कर्मचाऱ्यांच्या अनेक मागण्या प्रलंबित आहेत.या मागण्यांबाबत वारंवार निवेदने सादर करूनही,मुख्याधिकारी कार्यालयाकडून कोणताही सकारात्मक प्रतिसाद देण्यात आला नाही.उलट, मागण्यांवर चर्चा न करता अपमानास्पद भाषेत बोलणे, आढावा बैठकीत अयोग्य शब्द वापरणे आणि कारवाईची भीती दाखवणे सुरू असल्याचा आरोप कर्मचाऱ्यांनी केला आहे.विशेषतः कर वसुलीच्या आढावा बैठकीत, काही कर्मचाऱ्यांना वसुली कमी असल्याच्या कारणावरून वेतन रोखण्याची,एक महिन्याचा पगार कापण्याची,चौकशी लावण्याची आणि निलंबन करण्याची धमकी देण्यात आल्याचे निवेदनात म्हटले आहे.सुट्टीच्या दिवशीही हजर राहण्यास सांगणे,रजा मागितल्यास ती नाकारणे आणि कोणतीही पूर्वसूचना न देता बेकायदेशीर वेतन कपात करणे,यामुळे कर्मचाऱ्यांचा मानसिक तणाव प्रचंड वाढला असून कामाचे वातावरण भयग्रस्त झाल्याचा उल्लेख करण्यात आला आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

बलात्कार पीडितेचे नाव सार्वजनिक करणे पडले महागात.. – गृह विभागाचे प्रधान सचिव,पोलिस आयुक्त तसेच पोलिस निरीक्षक यांना उत्तर सादर करण्याचे निर्देश..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-बलात्कार पीडितेची किंवा लैंगिक अत्याचार प्रकरणातील अल्पवयीन पीडित मुलीची ओळख म्हणजेच नाव किंवा छायाचित्र जाहीर करणे कायद्यानुसार गंभीर गुन्हा आहे.सर्वोच्च न्यायालयाच्या...

नागरिकांनो जीवाची काळजी घ्या; आजपासून नवतपाला सुरुवात.. – सर्वाधिक तापमानाचे नऊ दिवस..

उद्रेक न्युज वृत्त :-काही दिवसांपासून सूर्यदेवता विदर्भातील जीवसृष्टीवर कोपला की काय?अशी स्थिती निर्माण झाली आहे.सूर्य मोठ्या प्रमाणावर आग ओकू लागल्याने विदर्भातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये उष्ण...

नागरिकांनी लोकशाही दिनात तक्रारी व निवेदने सादर करण्याचे आवाहन..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे आयोजन  येत्या,सोमवार १ जून २०२६ रोजी दुपारी ३ वाजता जिल्हाधिकारी कार्यालय गडचिरोली येथील सभागृहात करण्यात आले आहे.जिल्ह्यातील नागरिकांनी...

देशात जनगणनेची प्रक्रिया सुरू झाली; पण ओबीसी समाजासाठी स्वतंत्र रकानाच नाही.. देसाईगंज तालुका ओबीसी समाज संघटनेच्या वतीने उपविभागीय कार्यालयावर धडकणार ‘भव्य मोर्चा’..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):- "आमची संख्या,आमचा हक्क,आमचा सन्मान!" आणि "जनगणनेत स्वतंत्र कॉलम,आमचा हक्क!" अशी गगनभेदी गर्जना करत देसाईगंज तालुका ओबीसी समाज संघटनेच्या वतीने आयोजित करण्यात...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!