Monday, August 31, 2026
Homeभंडाराशेतीच्या वादातून शेतकऱ्याची हत्या करणाऱ्या आरोपीस आजन्म कारावास..

शेतीच्या वादातून शेतकऱ्याची हत्या करणाऱ्या आरोपीस आजन्म कारावास..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 

भंडारा :-जिल्ह्याच्या लाखनी तालुक्यातील रेंगेपार/कोठा येथील शेतीच्या वादातून एका शेतकऱ्याची हत्या करणाऱ्या आरोपीस भंडारा जिल्हा व सत्र न्यायालयाने आजन्म कारावासाची शिक्षा सुनावली आहे.राजेंद्र निंबार्ते वय ४० वर्षे,रा.रेंगेपार/कोठा,लाखनी असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे.तर सुधाकर बालकृष्ण निंबार्ते वय ४३ वर्षे,रा. खोकरला,ता.जि.भंडारा असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे.सदरची घटना २८ जुलै २०१७ रोजी लाखनी तालुक्यातील रेंगेपार/कोठा येथे घडली होती.२८ जुलै २०१७ रोजी राजेंद्र निंबार्ते हे शेतात रोपाईसाठी ट्रॅक्टर घेऊन जात असतांना आरोपी निंबार्तेने त्यांना अडवून वाद घातला.वाद वाढल्यानंतर आरोपीने त्यांच्यावर चाकूने वार केला.वडिलांवर हल्ला होतांना पाहून मुलगा राकेश निंबार्ते वाचवण्यासाठी धावून गेला असता आरोपीने त्याच्यावरही चाकूने हल्ला केला.गंभीर जखमी झाल्याने निंबार्ते यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.या घटनेबाबत मृतकाची पत्नी रजनी राजेंद्र निंबार्ते वय ३५ वर्षे,रा.रेंगेपार/कोठा,ता.लाखनी यांच्या तक्रारीवरून लाखनी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.तत्कालीन पोलिस निरीक्षक चंद्रशेखर चकाटे यांनी तपास करून पुराव्यानिशी दोषारोपपत्र न्यायालयात दाखल केले होते.प्रकरणाची सुनावणी पार पडली.यात घटनेच्या वेळी उपस्थित असलेल्या साक्षीदारांचे जबाब नोंदविण्यात आले. प्रकरणी भंडारा जिल्हा व सत्र न्यायाधीश-२ तसेच अतिरिक्त सत्र न्यायाधीश भारती काले यांनी आरोपी सुधाकर निंबार्ते यास काल मंगळवारी आजन्म कारावासाची शिक्षा व पाच हजार रुपये दंड ठोठावला.या प्रकरणात सरकारी ॲड.दुर्गा तलमले यांनी प्रभावीपणे काम पाहिले.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

पॅकेजिंगचा झोल; एक्सपायरी डेट बदलून पुन्हा बाजारात विकणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश.. -तब्बल ७५ लाखांहून अधिक किंमतीचा मुदतबाह्य साठा जप्त..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-दुकानात पॉकीटामध्ये मिळणारे विविध अन्न पदार्थ चवदार म्हणून आपण मोठ्या आवडीने खात असतो.प्रत्येक पॉकीटांवर सुरक्षित अन्नपदार्थांच्या चविंसाठी विशिष्ट कालमर्यादा नमूद केलेली...

आज गडचिरोली जिल्ह्याची प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध; ७ लाख ३८ हजार ३०१ मतदारांवर शिक्कामोर्तब.. – २७ हजार ४१४ ‘जुळवणी न झालेले मतदार’; तर ५६...

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण(एसआयआर) कार्यक्रम-२०२६ अंतर्गत १ ऑक्टोंबर २०२६ या अर्हता दिनांकावर आधारित गडचिरोली जिल्ह्याची प्रारूप...

शासकीय आदिवासी वसतिगृहांच्या खासगीकरणाचे आरोप तथ्यहीन.. – राज्यातील ४९० शासकीय वसतिगृहांतील विद्यार्थ्यांसाठी १८ प्रकारचे उपक्रम मोफत..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-आदिवासी विकास विभागाच्या शासकीय विद्यार्थी वसतिगृहांचे खासगीकरण करण्यात येत असल्याचे किंवा वसतिगृहांचे व्यवस्थापन खासगी संस्थेकडे सोपविण्यात आल्याचे आरोप तथ्यहीन आहेत. वसतिगृहांची...

आज आमदार मसराम यांच्या नेतृत्वात काँग्रेसचा देसाईगंज उपविभागीय कार्यालयावर धडकला महामोर्चा..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-आरमोरी विधानसभा क्षेत्रातील शेतकरी,कष्टकरी,आदिवासी,निराधार व बेरोजगारी,महागाईने तसेच स्मार्ट मिटरने त्रस्त नागरीकांच्या न्याय हक्कासाठी काँग्रेस पक्षाच्या वतीने आज,सोमवार ३१ ऑगस्ट रोजी आरमोरी विधानसभा...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!