Friday, October 23, 2026
Homeगडचिरोलीआज गडचिरोली जिल्ह्याची प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध; ७ लाख ३८ हजार ३०१...

आज गडचिरोली जिल्ह्याची प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध; ७ लाख ३८ हजार ३०१ मतदारांवर शिक्कामोर्तब.. – २७ हजार ४१४ ‘जुळवणी न झालेले मतदार’; तर ५६ हजार ८५२ मतदारांच्या नोंदींमध्ये विसंगती..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण(एसआयआर) कार्यक्रम-२०२६ अंतर्गत १ ऑक्टोंबर २०२६ या अर्हता दिनांकावर आधारित गडचिरोली जिल्ह्याची प्रारूप मतदार यादी आज,सोमवार ३१ ऑगस्ट रोजी प्रसिद्ध करण्यात आली.या प्रारूप मतदार यादीवर नागरिकांना ३१ ऑगस्ट ते ३० सप्टेंबर २०२६ या कालावधीत दावे व हरकती नोंदविता येणार आहेत.
प्रारूप मतदार यादीनुसार जिल्ह्यात ३ लाख ७२ हजार ८७८ पुरुष,३ लाख ६५ हजार ४११ महिला आणि १२ तृतीयपंथी मतदारांसह एकूण ७ लाख ३८ हजार ३०१ मतदारांचा समावेश आहे.याशिवाय अनुपस्थित, स्थलांतरित,मृत किंवा अन्य कारणांमुळे वर्गीकृत मतदारांची संख्या ९० हजार ६१६ आहे.
प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करण्याच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी अविश्यांत पंडा यांच्या अध्यक्षतेखाली आज राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींची बैठक घेण्यात आली.बैठकीत उपस्थित राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींना प्रारूप मतदार यादी उपलब्ध करून देण्यात आली.ही प्रारूप मतदार यादी मतदार नोंदणी अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी कार्यालय देसाईगंज,गडचिरोली, अहेरी व जिल्ह्यातील सर्व सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी कार्यालये,सर्व ९७३ मतदान केंद्रे तसेच जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी कार्यालय,गडचिरोली येथे प्रसिद्ध करण्यात आली आहे.
दावे व हरकतींच्या कालावधीत नोंदींमध्ये विसंगती असलेले तसेच पूर्वीच्या नोंदीशी जुळवणी न झालेले मतदार यांना सुनावणीची संधी देण्यात येणार आहे. यासाठी ECI NET पोर्टलवरून संबंधित मतदारांसाठीची नोटीस ऑटो जनरेट होणार आहे.मतदार नोंदणी अधिकारी त्यावर सुनावणीची तारीख व ठिकाण नमूद करून संबंधित मतदारांना नोटीस उपलब्ध करून देतील.
जिल्ह्यात सध्या २७ हजार ४१४ ‘जुळवणी न झालेले मतदार ’ तर ‘नोंदींमध्ये विसंगती असलेले’ ५६ हजार ८५२ मतदार आहेत.संबंधित मतदारांची मतदान केंद्रनिहाय संख्या लक्षात घेऊन त्यांच्या सोयीसाठी शहरी तसेच ग्रामीण भागात सुनावणीची ठिकाणे निश्चित करण्यात आली आहेत.तसेच संपर्क होऊ न शकलेल्या मतदारांची अद्ययावत यादी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आली आहे.दावे व हरकतींच्या कालावधीत ज्या मतदारांना सुनावणीसाठी नोटीस प्राप्त झाली आहे, त्यांनी निर्धारित दिवशी आवश्यक कागदपत्रांसह सुनावणीस उपस्थित राहून निवडणूक प्रशासनास सहकार्य करावे,असे आवाहन उप जिल्हा निवडणूक अधिकारी राहुल जाधव यांनी केले आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

कराळे मास्तरांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षातून हकालपट्टी..!

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र विधानपरिषदेेच्या तीन पदवीधर आणि दोन शिक्षक मतदारसंघाची उद्या,शुक्रवार २३ ऑक्टोंबर रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. यामध्ये नागपूर पदवीधर मतदार...

दोन बालकांना मिळाले हक्काचे कुटुंब; कोलकाता व ठाणे येथील कुटुंबीयांनी स्वीकारले पालकत्व..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-विशेष दत्तक संस्थेच्या देखरेखीतील दोन बालकांना आज गुरुवारी हक्काचे कुटुंब आणि मायेची ऊब मिळाली.जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी दत्तक आदेशांवर स्वाक्षरी करून...

भारतीय वन सेवेतील पाच परिविक्षाधीन अधिकाऱ्यांची सहाय्यक वनसंरक्षक पदावर पदस्थापना..

उद्रेक न्युज वृत्त :-भारतीय वन सेवेतील सन २०२४ च्या तुकडीतील पाच परिविक्षाधीन अधिकाऱ्यांना सहाय्यक वनसंरक्षक पदावर पदस्थापना देण्यात आली आहे.या संदर्भात आज,गुरुवार २२ ऑक्टोंबर...

विधान परिषद निवडणूक; घरबसल्या मोबाईलवर तपासा तुमचे मतदार यादीतील नाव..

उद्रेक न्युज वृत्त  ​गडचिरोली :-विधान परिषदेच्या नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघाची निवडणूक उद्या,शुक्रवार २३ ऑक्टोंबर रोजी होणार असून येत्या २७ ऑक्टोंबर रोजी मतमोजणी होणार आहे.त्यानुसार,मतदारांची नावे...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!