Sunday, April 19, 2026
Homeभंडारानगरपरिषदेत २० टक्के कमिशनशिवाय कामेच होत नाही- भाजप आमदारांचा घरचा आहेर..

नगरपरिषदेत २० टक्के कमिशनशिवाय कामेच होत नाही- भाजप आमदारांचा घरचा आहेर..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
भंडारा :-जिल्ह्यात अचानकपणे मोठ्या राजकीय घडामोडी घडतांना दिसून येतात.जिल्ह्यातील आमदार असोत वा खासदार असोत ते नेहमी चर्चेत तर असतातच,पण एखादा ॲक्शन करतोय म्हटले तर प्रत्यक्षात कृतीही करून दाखवतात.अश्यातच दिवाळी सणानिमित्त आयोजित स्नेह मिलन कार्यक्रमात भाजप आमदार परिणय फुके यांनी केलेल्या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. नगरपरिषदेत मागील काही वर्षांपासून २० टक्के कमिशनशिवाय कोणतेही काम होत नसल्याचा दावा त्यांनी केला आहे.एवढेच नव्हे,तर चार वर्षाच्या कालावधीत कोट्यवधी रुपयांच्या कामांमध्ये भ्रष्टाचार झाल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.एका नेत्याने २० कोटींच्या कामात २० टक्के कमिशन ठेवले होते.मात्र,सदरची कामे तात्काळ थांबविण्यात आली.कामांना कुठल्याही प्रकारची प्रशासकीय मान्यता वा इतर ठराविक बाबी नसतांनाही पोळी शेकली जात होती.नगर परिषदेत पुन्हा भाजपची सत्ता आली,तर सर्व व्यवहारांची चौकशी करण्यात येईल,असाही इशारा परिणय फुके यांनी दिल्याने चक्क आपल्याच सरकारवर भाजप नेते प्रश्न उपस्थित करत आहेत; अशा शब्दांत टीकाकारांनीही हल्ला चढवला आहे.दिवाळी स्नेहमिलन कार्यक्रमात राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि पालकमंत्री पंकज भोयर यांच्या प्रमुख उपस्थितीत आमदार परिणय फुके यांनी भंडारा नगर परिषदेतील भ्रष्टाचारावर बोट ठेवल्याने सत्ताधारी पक्षातील नेत्यांनी चुप्पी साधली आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

विद्यार्थ्यांची सुरक्षितता महत्त्वाची; सर्व शैक्षणिक संस्था सकाळच्या सत्रात सुरू ठेवण्याचे निर्देश..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-दिवसेंदिवस उष्णतेची तीव्रता वाढत असल्याने शाळा व महाविद्यालयात जाणाऱ्या विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.अश्यातच चंद्रपूर जिल्ह्यात उन्हाची...

चहा बनवण्यासाठी गॅस पेटवणार तितक्याच उडाला भडका; पतीचा मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-स्वयंपाकघरातील गॅस लिकेज असल्याने चहा बनवण्यासाठी गॅस पेटवणार तितक्याच आगीचा अचानकपणे भडका उडाला आणि काही क्षणातच सिलिंडरचा जोरदार स्फोट झाला.दरम्यान,संपूर्ण घरात...

वाहनधारकांसाठी दिलासा; गडचिरोली शहरातील ट्रॅफिक सिग्नल काही वेळासाठी राहणार बंद..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-विदर्भातीलच नव्हे तर राज्याच्या विविध जिल्ह्यात उकाड्याने नागरिक हैराण झाले आहेत. सकाळपासूनच उन्हाची तीव्रता वाढत चालल्याने जीवाची लाहीलाही होत आहे.अश्यातच शहरातील महत्त्वाच्या...

उष्णतेची तीव्रता; प्रखर उन्हामुळे शेतातच पडली बेशुद्ध.. – शेतकरी महिलेचा मृत्यू; नागरिकांनी विशेष खबरदारी घेण्याचे आवाहन..

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र राज्याच्या विविध भागात उष्णतेचा पारा चढल्याने आरोग्य विभागासह प्रशासन सतर्क झाले आहे.त्यातच,नागरिकांना विशेष खबरदारी घेण्याचे आवाहन करत आहे.विशेष म्हणजे,दुपारी १२...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!