- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त :-काही दिवसांपूर्वीच गडचिरोलीत नक्षली नेता भूपतीने ६१ साथीदारांसह आत्मसमर्पण केले,तर छत्तीसगडच्या बस्तरमध्ये २१० नक्षलवाद्यांसह रूपेशने आत्मसमर्पण करून हातातील लाल दहशत सोडून संविधान स्वीकारले.अश्यातच गडचिरोली आणि बस्तर येथील सामूहिक आत्मसमर्पणानंतर,छत्तीसगडच्या उदंती नक्षली पथकानेही दिवाळी सणाच्या पूर्वसंध्येला सशस्त्र संघर्ष सोडण्याचा निर्णय घेतला होता; ज्यामुळे छत्तीसगडमध्ये शांततेची आशा निर्माण झालेली असतांनाच नक्षलिंच्या एका गटाने पुन्हा डोके वर काढल्याची घटना छत्तीसगडच्या बीजापूर जिल्ह्यात उघडकीस आली आहे.नक्षलवाद्यांनी पोलीस खबऱ्या असल्याच्या संशयावरून दोन ग्रामस्थांची निर्घृणपणे धारदार शस्त्रांनी हत्या केली आहे.सदरची धक्कादायक घटना बीजापूर जिल्ह्याच्या उसूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नेलकांकेर गावात घडली असून तिरुपती सोढी वय ३८ वर्षे व रवी कट्टम वय २५ वर्षे असे हत्या झालेल्या ग्रामस्थांची नावे आहेत.काल शुक्रवारी रात्रीच्या सुमारास नक्षलवाद्यांनी नेलकांकेर गावात प्रवेश केला आणि दोघांनाही झोपेतून उठवत धारदार शस्त्रांनी हत्या केली.घटनेने संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले.घटना घडवून नक्षलवादी लगेच जंगलाच्या दिशेने पळून गेले.घटनेची माहिती मिळताच पोलिस पथक घटनास्थळी दाखल झाले आणि पुढील तपास सुरू केला.यापूर्वी १४ ऑक्टोंबर २०२५ रोजी इलमिडी थाना क्षेत्रातील मुजालकांकेर गावात नक्षलवाद्यांनी भाजप कार्यकर्ता सत्यम पुनेमची गळा दाबून हत्या केली होती. त्यावेळेस ‘मद्देड एरिया कमिटी’ ने या हत्येची जबाबदारी स्वीकारलेली होती.
- Advertisement -

