Friday, September 4, 2026
Homeगडचिरोलीवीज कोसळून १७ वर्षीय मुलाचा मृत्यू; तर एकजण जखमी..

वीज कोसळून १७ वर्षीय मुलाचा मृत्यू; तर एकजण जखमी..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-हवामान खात्याने वर्तविलेल्या अंदाजानुसार आज,शनिवार २५ ऑक्टोंबर रोजी विदर्भातील विविध जिल्ह्यात पावसाने दुपारनंतर जोरदार हजेरी लावली.अश्याच प्रकारे आज गडचिरोली शहरासह देसाईगंज,आरमोरी,कुरखेडा व कोरची तालुक्यात पावसाने हजेरी लावून वातावरणात गारवा निर्माण केला. अश्यातच कोरची तालुक्यात दुपारच्या सुमारास एक दुर्दैवी घटना घडली.शेतात कामे करीत असतांनाच अचानकपणे विजांच्या कडकडाटासह पावसाने हजेरी लावल्याने पावसाच्या बचावापासून झाडाच्या आडोशाला उभे राहण्यासाठी गेलेल्या झाडावरच वीज कोसळल्याने दोन पैकी एका १७ वर्षीय मुलाचा मृत्यू झाला,तर एकजण विजेच्या धक्क्याने जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.सरगम सोमनाथ कोरचा वय १७ वर्षे,रा.केसालडाबरी, ता.कोरची,जि.गडचिरोली असे मृतक मुलाचे नाव असून तो कोरची तालुक्यातील मसेली येथील छत्रपती विद्यालयात इयत्ता दहाव्या वर्गात शिक्षण घेत होता.तर योगेश घावळे वय १७ वर्षे, रा.गुजूरबडगा,ता.देवरी, जि.गोंदिया असे जखमी मुलाचे नाव असून तो सरगमचा नातेवाईक होता.
आज शनिवारी दुपारच्या सुमारास सरगमचे वडील सोमनाथ कोरचा यांच्या शेतात धान कापणीसह धानाची गंजी तयार करणे सुरू होते.दुपारच्या सुमारास अचानकपणे पावसाने हजेरी लावली.सरगम आणि योगेश दोघेही शेतावरच असल्याने पावसामुळे शेतातील मोहाच्या झाडाच्या आडोशाला गेले.तर सरगमचे वडील काही अंतरावर उभे होते.तितक्याच अचानकपणे मोहाच्या झाडावर वीज कोसळली.यात सरगम व योगेश दोघेही जमिनीवर कोसळले.लागलीच सरगमच्या वडिलांनी ग्रामस्थांना माहिती देत दोघांनाही कोरचीच्या ग्रामीण रुग्णालयात नेले असता तेथील डॉक्टरांनी सरगमला मृत घोषित केले.तर योगेश घावळे जखमी झाल्याने तिथे प्राथमिक उपचारानंतर त्याला पुढील उपचारार्थ चिचगडच्या ग्रामीण रुग्णालयात भरती करण्यात आले आहे.घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

आज ११ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या व नियुक्त्या..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-राज्य सरकारने आज,गुरुवार ३ सप्टेंबर २०२६ रोजी तब्बल ११ सनदी अधिकाऱ्यांच्या (आयएएस) बदल्या व नियुक्त्या केल्या आहेत.यात भारतीय प्रशासकीय सेवेतील जिल्हा...

सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांसाठी राज्यस्तरीय स्पर्धा; उत्कृष्ट मंडळांना मिळणार पुरस्कार..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-राज्यातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या विधायक कार्याला प्रोत्साहन देण्यासाठी पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागामार्फत ‘महाराष्ट्र राज्य सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा-२०२६’ आयोजित करण्यात...

देसाईगंज पोलीस स्टेशन हद्दीतील जप्त केलेला तब्बल १० लाख ९१ हजार ३९० रुपयांचा दारुसाठा नष्ट..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-देसाईगंज पोलीस स्टेशन हद्दीतील १८५ गुन्ह्यांच्या नोंदीतुन जप्त करण्यात आलेला तब्बल १० लाख ९१ हजार ३९० रुपयांचा दारुसाठा आज,गुरुवार ३ सप्टेंबर रोजी...

अपघातात शिक्षकाचा दुर्दैवी मृत्यू..!

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-नागपूरच्या बुटीबोरी परिसरातील लोकमत प्रेस ते सिडको कॉलनी मार्गावर अंधारात उभ्या असलेल्या ट्रकला दुचाकीची मागून जोरदार धडक बसल्याने झालेल्या अपघातात शिक्षकाचा उपचारादरम्यान...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!