Friday, September 4, 2026
Homeचंद्रपूरतब्बल सहा दिवसांपासून दोन अल्पवयीन मुली बेपत्ता..!

तब्बल सहा दिवसांपासून दोन अल्पवयीन मुली बेपत्ता..!

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
चंद्रपूर :-जिल्ह्याच्या बल्लारपूर शहरातील दोन अल्पवयीन मुली मागील सहा दिवसांपासून बेपत्ता असून पालकांनी बल्लारपूर पोलीस ठाण्यात  मीसिंगची तक्रार दाखल केल्याने अज्ञातांविरोधात गुन्हा नोंदवून बल्लारपूर पोलिसांनी शोध सुरू केला आहे.पहिल्या घटनेत १९ ऑक्टोंबर २०२५ च्या रात्री १६ वर्षीय अल्पवयीन मुलगी घरीच होती.रात्री आपल्या आजीला बाथरूमला घेऊन गेली.नंतर आपल्या खोलीत गेली.मात्र,सकाळच्या सुमारास ती आपल्या खोलीत आढळली नसल्याने कुटुंबीयांनी  याबाबत २० ऑक्टोंबरला बल्लारपूर पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली.दुसऱ्या घटनेत बल्लारपूर शहरातीलच एक १७ वर्षीय अल्पवयीन मुलगी १३ ऑक्टोंबरपासून बेपत्ता असून ती कॉलेजमध्ये जाते म्हणून घरून निघाली.मात्र,त्या दिवशीपासून घरी परतलीच नाही.कुटुंबीयांनी सर्वत्र शोधाशोध केली; पण ती कुठेही आढळून न आल्याने अखेर कुटुंबीयांनी १९ ऑक्टोंबरला पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार नोंदविली.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

आज ११ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या व नियुक्त्या..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-राज्य सरकारने आज,गुरुवार ३ सप्टेंबर २०२६ रोजी तब्बल ११ सनदी अधिकाऱ्यांच्या (आयएएस) बदल्या व नियुक्त्या केल्या आहेत.यात भारतीय प्रशासकीय सेवेतील जिल्हा...

सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांसाठी राज्यस्तरीय स्पर्धा; उत्कृष्ट मंडळांना मिळणार पुरस्कार..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-राज्यातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या विधायक कार्याला प्रोत्साहन देण्यासाठी पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागामार्फत ‘महाराष्ट्र राज्य सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा-२०२६’ आयोजित करण्यात...

देसाईगंज पोलीस स्टेशन हद्दीतील जप्त केलेला तब्बल १० लाख ९१ हजार ३९० रुपयांचा दारुसाठा नष्ट..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-देसाईगंज पोलीस स्टेशन हद्दीतील १८५ गुन्ह्यांच्या नोंदीतुन जप्त करण्यात आलेला तब्बल १० लाख ९१ हजार ३९० रुपयांचा दारुसाठा आज,गुरुवार ३ सप्टेंबर रोजी...

अपघातात शिक्षकाचा दुर्दैवी मृत्यू..!

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-नागपूरच्या बुटीबोरी परिसरातील लोकमत प्रेस ते सिडको कॉलनी मार्गावर अंधारात उभ्या असलेल्या ट्रकला दुचाकीची मागून जोरदार धडक बसल्याने झालेल्या अपघातात शिक्षकाचा उपचारादरम्यान...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!