Monday, July 13, 2026
Homeनागपूरसुरुवातीला वाटले विमानाला पक्षी धडकला; पण आता खरे कारण आले समोर..!

सुरुवातीला वाटले विमानाला पक्षी धडकला; पण आता खरे कारण आले समोर..!

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
नागपूर :-नागपूरच्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावरून शुक्रवारी सायंकाळी ६ वाजून ५५ मिनिटांनी नागपूर-दिल्लीसाठी उड्डाण केलेले एअर इंडियाचे एआय-४६६ हे विमान टेकऑफ नंतर अवघ्या १० मिनिटांतच परत उतरवण्यात आले होते. सुरुवातीला विमानाला पक्षी धडकला असावा,अशी शक्यता व्यक्त करण्यात आली होती; मात्र,काल शनिवारी रात्रीपर्यंत झालेल्या तपासणीत विमानाच्या इंजिनमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याचे निष्पन्न झाले. विमानावर बर्ड हिटचे कोणतेही चिन्ह आढळलेले नाही.विशेष म्हणजे, काही कालावधीपासून विमान दुर्घटनेच्या घटना घडू लागल्याने ‘नो रिस्क’ म्हणून सदरचा निर्णय तात्काळ घेण्यात आला.सदरचे विमान हे १८० प्रवासी क्षमतेचे असून विमानात १६० प्रवासी दिल्लीला प्रवास करीत होते.बिघाडामुळे काहींना इंडिगोच्या विमानाने दिल्लीला पाठविण्यात आले,तर काहींना मुंबईमार्गे दिल्लीला रवाना करण्यात आले,तर काहींनी आपली यात्रा रद्द केली. उड्डाण केलेले विमान परतल्यानंतर टेक्निकल टीमने तपासणी करून पायलटला उड्डाणासाठी ‘ओके’ दिले होते; परंतु पायलटने इंजिनमध्ये जाणवणाऱ्या वायब्रेशनची तक्रार नोंदवून अधिक सखोल तपासणी करण्याची मागणी केली.सुरुवातीला बर्ड हिटचा संशय व्यक्त करण्यात आला असला तरी तांत्रिक तपासणीत हे प्रकरण केवळ तांत्रिक बिघाडाचे असल्याचे स्पष्ट झाले आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

केंद्रीय विद्यालयात इयत्ता पहिली ते पाचवीच्या प्रवेशासाठी अर्ज प्रक्रिया सुरू..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-गडचिरोली येथे नव्याने सुरू झालेल्या केंद्रीय विद्यालयात शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी इयत्ता १ ली ते ५ वी मधील रिक्त जागांसाठी प्रवेश...

आता मार्केटमध्ये येणार दहा किलो वजनाचा गॅस सिलेंडर..

उद्रेक न्युज वृत्त:-बऱ्याच ठिकाणी जागेचा अभाव, वजनी सिलेंडर तसेच वजनानुसार वाढणारी रक्कम सर्वसामान्यांना न झेपावणारी असते.विशेषतः लहान व्यावसायिक,हॉटेल चालक आणि रस्त्यावरील विक्रेते. यासाठी सरकारी...

वाघ दिसताच पळत सुटले; जीव वाचवण्यासाठी धावत असतांनाच बंधाऱ्यात पडले,बाप-लेकाचा दुर्दैवी मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-जिल्ह्याच्या रामटेक तालुक्यातून एक हृदयद्रावक घटना उघडकीस आली आहे.शेतावर गेलेले तिघेजण वाघ दिसताच जिकडे बनेल तिकडे धावत-पळत सुटले.पण जीव वाचवण्यासाठी बंधाऱ्यावरून...

पालकमंत्री साहेब..मक्याचे करायचे काय? पोळी खायला गहू द्या न..!

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यात जुलै महिन्यापासून शासकीय स्वस्त धान्य दुकानांतून लाभार्थ्यांना मक्याचे वितरण केले जात आहे.दर महिन्याला तांदळासोबत १० ते १५ किलो मिळणारा गहू...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!