Friday, June 26, 2026
Homeनागपूरचहा बनवण्यासाठी गॅस पेटवणार तितक्याच उडाला भडका; पतीचा मृत्यू..

चहा बनवण्यासाठी गॅस पेटवणार तितक्याच उडाला भडका; पतीचा मृत्यू..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
नागपूर :-स्वयंपाकघरातील गॅस लिकेज असल्याने चहा बनवण्यासाठी गॅस पेटवणार तितक्याच आगीचा अचानकपणे भडका उडाला आणि काही क्षणातच सिलिंडरचा जोरदार स्फोट झाला.दरम्यान,संपूर्ण घरात आग पसरून घरातील जीवनावश्यक वस्तू सोन्याचे दागिने,टीव्ही,फ्रीज,कपडे यांसह सर्व साहित्य जळून खाक झाले.आग लागल्यानंतर घरातील सर्वजण सैरावैरा पळू लागले.यात अतुल दशरथ पानतावणे वय ४० वर्षे यांचा मृत्यू झाला,तर आग विझवत असतांना अतुल यांची पत्नी नम्रता,आई शांता,मोठा भाऊ नितीन पानतावणे वय ५० वर्षे,मजवा भाऊ विनय पानतावणे वय ४८ वर्षे आणि अतुल यांची तीन मुले होरपळल्याने या सर्वांवर कामठी उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.सदरची घटना आज,रविवार १९ एप्रिल रोजी सकाळच्या सुमारास नागपूर जिल्ह्याच्या कामठी शहरातील गांधीनगर भाजी मंडी परिसरात घडली.आगीच्या घटनेची माहिती मिळताच अग्निशामक दलाने घटनास्थळी धाव घेत आग आटोक्यात आणली.तोपर्यंत मोठे नुकसान झाले होते. याप्रकरणी जुनी कामठी पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली असून वरिष्ठ पोलिस निरीक्षक प्रशांत जुमडे आणि सहाय्यक पोलिस निरीक्षक मनीष हिवरकर यांनी तातडीने घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.पोलिसांनी मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी कामठी उपजिल्हा रुग्णालयात पाठवला असून घटनेचा पुढील सखोल तपास सुरू करण्यात आला आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

आकांक्षित जिल्हा कामगिरीत गडचिरोली देशात ‘टॉप टेन’ मध्ये..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-केंद्र सरकारच्या 'आकांक्षित जिल्हा' मोहिमेतंर्गत उत्कृष्ट कामगिरी करत गडचिरोली जिल्ह्याने देशभरातील ११२ आकांक्षित जिल्ह्यांच्या यादीत पहिले १० मध्ये स्थान पटकावले आहे....

महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात मोठी कर्जमुक्ती योजना; कर्जमुक्ती योजनेबाबत वाचा संपूर्ण माहिती.. – कोण पात्र आणि कोण असणार अपात्र..

उद्रेक न्युज वृत्त :-शेतकरी बांधव राज्याच्या ग्रामीण अर्थव्यवस्थेचा महत्त्वाचा भाग आहेत.अनियमित पाऊस, गारपीट,दुष्काळ,अतिवृष्टी व महापूर यांसारख्या नैसर्गिक संकटांमुळे आर्थिक अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी...

बहिणीचा छळ असह्य; जावयाचा साळ्यानेच केला खून.. – ५० हजाराची दिली सुपारी..

उद्रेक न्युज वृत्त  गोंदिया :-गेल्या सहा वर्षापासून बहिणीचा छळ करीत असल्याच्या रागातून ५० हजाराची सुपारी देत चक्क साळ्यानेच जावयाचा गेम बजावला असल्याची धक्कादायक बाब पोलीस तपासात...

सावधान..! जिल्हा परिषद शाळांतील परिचर भरतीची सोशल मीडियावरील जाहिरात बनावट..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-सोशल मीडियावर जिल्हा परिषद शाळांमध्ये परिचर(Peon)पदभरतीसंदर्भात प्रसारित होत असलेली जाहिरात पूर्णपणे खोटी,बनावट आणि दिशाभूल करणारी असल्याचा अधिकृत खुलासा जिल्हा परिषदेचे मुख्य...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!