Sunday, April 19, 2026
Homeउद्रेक न्युज वृत्तभारताने तब्बल १० देशांना विकला २९८ कोटी ७० लाख रुपयांचा शेण..!

भारताने तब्बल १० देशांना विकला २९८ कोटी ७० लाख रुपयांचा शेण..!

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त :-गायीच्या शेणाची आंतरराष्ट्रीय बाजारात प्रचंड मागणी असून भारताने तब्बल २९८ कोटी ७० लाख रुपयांच्या शेणाची निर्यात केली आहे. नीती आयोगानुसार,भारतात ३० कोटी गायी असून त्यांच्यापासून एका दिवसात ३० लाख टन शेण मिळते. यात पहिल्या क्रमांकावर राजस्थान,दुसऱ्या क्रमांकावर उत्तर प्रदेश व तिसरा महाराष्ट्राचा क्रमांक लागतो. भारतातील १८१ व्यावसायिकांनी जगभरातील ३२७ खरेदीदारांना शेणाची निर्यात केली आहे.भारत जवळपास १० देशांना शेणाची निर्यात करीत असून या यादीत अमेरिका दुसऱ्या,तर चीन चौथ्या क्रमांकावर आहे.शेण आणि गोमूत्रापासून जमिनीची उत्पादन क्षमता वाढविण्यासाठी जर्मन विकास बँकेने आंध्रप्रदेशातील महिलांना आर्थिक साहाय्य दिले आहे.भारताने २०२४-२५ मध्ये १२५ कोटी रुपये किमतीच्या ताज्या शेणाची आणि १७३.७ कोटी रुपयांचे शेणखत असे २९८ कोटी ७० लाख रुपयांच्या शेणखताची निर्यात केली आहे.भारतातून गायीचे शेण आयात करणाऱ्या देशांमध्ये कुवैत, अमेरिका,सिंगापूर,चीन,नेपाळ,ब्राझिल,अर्जेंटिना, ऑस्ट्रेलिया,मालदीव आणि न्यूझीलंड या देशांचा समावेश आहे.यातही कुवैतने सर्वाधिक शेण खरेदी केले आहे. २०२४ मध्ये कुवैतने १९२ मेट्रिक टन शेण खरेदी केले होते.कुवैत गायीच्या शेणाचा वापर खजूरचे उत्पादन करण्यासाठी करीत आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

विद्यार्थ्यांची सुरक्षितता महत्त्वाची; सर्व शैक्षणिक संस्था सकाळच्या सत्रात सुरू ठेवण्याचे निर्देश..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-दिवसेंदिवस उष्णतेची तीव्रता वाढत असल्याने शाळा व महाविद्यालयात जाणाऱ्या विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.अश्यातच चंद्रपूर जिल्ह्यात उन्हाची...

चहा बनवण्यासाठी गॅस पेटवणार तितक्याच उडाला भडका; पतीचा मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-स्वयंपाकघरातील गॅस लिकेज असल्याने चहा बनवण्यासाठी गॅस पेटवणार तितक्याच आगीचा अचानकपणे भडका उडाला आणि काही क्षणातच सिलिंडरचा जोरदार स्फोट झाला.दरम्यान,संपूर्ण घरात...

वाहनधारकांसाठी दिलासा; गडचिरोली शहरातील ट्रॅफिक सिग्नल काही वेळासाठी राहणार बंद..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-विदर्भातीलच नव्हे तर राज्याच्या विविध जिल्ह्यात उकाड्याने नागरिक हैराण झाले आहेत. सकाळपासूनच उन्हाची तीव्रता वाढत चालल्याने जीवाची लाहीलाही होत आहे.अश्यातच शहरातील महत्त्वाच्या...

उष्णतेची तीव्रता; प्रखर उन्हामुळे शेतातच पडली बेशुद्ध.. – शेतकरी महिलेचा मृत्यू; नागरिकांनी विशेष खबरदारी घेण्याचे आवाहन..

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र राज्याच्या विविध भागात उष्णतेचा पारा चढल्याने आरोग्य विभागासह प्रशासन सतर्क झाले आहे.त्यातच,नागरिकांना विशेष खबरदारी घेण्याचे आवाहन करत आहे.विशेष म्हणजे,दुपारी १२...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!