Monday, June 22, 2026
Homeभंडाराजोपर्यंत तोडगा निघणार नाही; तोपर्यंत आंदोलन सुरूच... - ग्रामपंचायती कुलूपबंद; गाव कारभार...

जोपर्यंत तोडगा निघणार नाही; तोपर्यंत आंदोलन सुरूच… – ग्रामपंचायती कुलूपबंद; गाव कारभार ठप्प

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
भंडारा :-यापूर्वी ग्रामपंचायतीला १५ लाखांपर्यंतची विकासकामे करण्याची मुभा होती.मात्र,उच्च न्यायालयाने या विकासकामांवर कात्री लावली आहे. आता ग्रामपंचायतींना केवळ तीन लाखांपर्यंतची कामे मिळणार आहेत.त्यामुळे राज्यातील सरपंचासह जिल्ह्यातील सरपंच नाराज झाले असून,त्यांनी १६ ऑगस्टपासून ग्रामपंचायतीला कुलूप ठोकले आहे. त्यामुळे गाव कारभार ठप्प पडला आहे.मंगळवारला जिल्ह्यातील सरपंच आज,२८ ऑगस्ट रोजी मुंबई येथील आझाद मैदानावर होणाऱ्या मोर्चासाठी रवाना झाले आहेत.
राज्य सरकारने १५ ऑगस्टपर्यंत या निर्णयाविरुद्ध हायकोर्टात स्टे आणावा; अशी मागणी सरपंच संघटनेने केली होती.अन्यथा १६ ऑगस्टपासून राज्यभरातील सर्व ग्रामपंचायतींना कुलूपबंद आंदोलन करू; असा इशारा दिला होता.दरम्यान,१६ ऑगस्टपासून ग्रामपंचायती कुलूपबंद असून सरपंचांचे आंदोलन सुरूच आहे.ग्रामपंचायतीच्या चाव्या गटविकास अधिकाऱ्यांकडे सोपविण्यात आल्या आहेत.दरम्यान,ग्रामपंचायती कुलूपबंद असल्याने गावगाड्यातील कामे ठप्प पडली आहेत.जोपर्यंत तोडगा निघणार नाही,तोपर्यंत हे आंदोलन सुरू राहणार,असा इशारा सरपंच संघटनेने दिल्याने गावकरी, विद्यार्थ्यांची कामे अडचणीत सापडली आहेत.
 
मागण्या👇
 
नियमित सन्मानजनक मानधन,भत्ता मिळावे. सरपंचांना १५ हजार, उपसरपंचांना १० हजार, तर सदस्याला तीन हजार मानधन मिळावे.ग्रामपंचायत संबंधित सर्व घटकांना विमा,पेन्शन,निश्चित वेतन लागू करावे.मुंबईत सरपंच भवनाची स्थापना करावी. ग्रामसेवक व ग्रामविकास अधिकारी पद एकत्रित करून पंचायत विकास अधिकारी म्हणावे. ग्रामरोजगार सेवकाची नेमणूक पूर्णवेळ करून वेतन निश्चिती करावी.संगणक परिचालकांना ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या आकृतिबंधात आणावे,यावर समितीचा अहवाल त्वरित लागू करावा.संगणक परिचालकांचा भार ग्रामपंचायतींऐवजी शासनाने उचलावा. ग्रामपंचायतींना स्वायत्त संस्थेचा अधिकार देऊन विकासकामे करण्याचा अधिकार द्यावा व इतर मागण्यांसाठी सरपंच संघटनांद्वारे आंदोलन पुकारण्यात आले आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

कर्जफेडीसाठी दिलेला चेक बाऊन्स; दोषीला एक वर्षाच्या कारावासाची शिक्षा..

उद्रेक न्युज वृत्त  वर्धा :-एका बँकेकडून घेतलेल्या कर्जाची रक्कम परतफेड करण्यासाठी दुसऱ्या बँकेचा चेक दिला खरी, पण जो चेक देण्यात आला,त्या बँकेच्या खात्यात पुरेसे पैसेच...

३० वर्षीय तरुणाचा नदीत बुडून मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-जिल्ह्याच्या हिंगणा तालुक्यातील कोतेवाडा परिसराच्या वेणा नदीत बुडून एका ३० वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली आहे. विशेष म्हणजे,नदीतील...

अवैध तंबाखू साठवणूक व विक्री करणाऱ्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-महाराष्ट्रात गुटखा,पानमसाला आणि सुगंधीत तंबाखूवर राज्य शासनाने १९ जुलै २०१२ पासून सक्तीची बंदी लादली; मात्र गेल्या १४ वर्षांत ही बंदी कागदोपत्रीच...

शेतकऱ्याचा जीव घेणाऱ्या वाघाच्या हालचालींवर वनविभागाची बारकाईने नजर..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-नुकतेच चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रम्हपुरी वनविभागाच्या तळोधी(बा.)वनपरिक्षेत्रांतर्गत गोविंदपूर उपक्षेत्रातील नागभीड तालुक्याच्या गिरगाव जंगल परिसरात वाघाच्या हल्ल्यात आत्माराम दसरू बोरकर वय ५२ वर्षे,रा.गिरगाव,ता.नागभीड...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!