Wednesday, September 23, 2026
Homeमुंबईउद्यापासून पावसाळी अधिवेशनास सुरुवात; सत्ताधारी आणि विरोधक येणार आमनेसामने..

उद्यापासून पावसाळी अधिवेशनास सुरुवात; सत्ताधारी आणि विरोधक येणार आमनेसामने..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
मुंबई :-महाराष्ट्र विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन हे उद्या,सोमवार २२ जून २०२६ पासून सुरू होणार आहे. सदरचे अधिवेशन तब्बल तीन आठवडे चालणार असून राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन वादळी ठरण्याची चिन्हे आहेत.विशेष म्हणजे,२२ जून ते १० जुलै या कालावधीत मुंबईत होणारे अधिवेशन वाढती महागाई,शेतकरी कर्जमाफीतील जाचक अटी-शर्ती, वाढती गुन्हेगारी,अनुसूचित जातीचे उपवर्गिकरण,तीव्र पाणीटंचाईसह अनेक महत्त्वाच्या विषयांवरून सत्ताधारी आणि विरोधक आमनेसामने येण्याची शक्यता आहे. त्यातच,अद्याप विधानसभा आणि विधान परिषदेमध्ये विरोधी पक्षनेत्याची निवड झालेली नाही.त्यामुळे पावसाळी अधिवेशनही विरोधी पक्षनेत्याविना होणार अशी चिन्हे दिसत आहेत.राज्य सरकारने काही धरणांतील उपलब्ध पाणी ३१ ऑगस्टपर्यंत प्रामुख्याने पिण्यासाठी राखीव ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानंतर शेतीसाठी सोडले जाणारे पाणीही काही ठिकाणी बंद करण्यात आले आहेत.शेतकऱ्यांना दिलेली आश्वासने एकीकडे पाळली जात नाहीत,तर दुसरीकडे पाणी मिळत नाही हा मुद्दा पेटणार आहे.यातच राज्यात सत्ताधाऱ्यांकडून सुरू असलेले पळवापळवीचे राजकारण तापण्याची शक्यता अधिक आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

बदलते हवामान; पाऊस घालणार थैमान..!

उद्रेक न्युज वृत्त :-सध्या हवामान बदलाचे संकेत असल्याने विदर्भातील नागपूर,यवतमाळ,चंद्रपूर,गोंदिया, भंडारा आणि गडचिरोली जिल्ह्यांसह मुंबई मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि कोकणात पावसाचा जोर वाढणार आहे.हवामान...

उच्च न्यायालयाचा दणका; अतिदुर्गम भागात दुचाकीने पोहोचले जिल्हाधिकारी व अधिकारी..!

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्याच्या भामरागड तालुक्यातील अतिदुर्गम लष्कर,गोपणार,मुरडपार,हॅलोदंडी आणि धिरंगी या गावांच्या मूलभूत विकासाला प्राधान्य देऊन विविध विभागांच्या लोककल्याणकारी व विकास योजनांचा लाभ जास्तीत...

बँकेची कामे असतील तर लवकर उरकून घ्या; सलग ५ दिवस बँकिंग सेवा राहणार ठप्प..!

उद्रेक न्युज वृत्त :-नुकतेच युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन्स(यूएफबीआय)या बँक कर्मचारी आणि अधिकाऱ्यांच्या संयुक्त संघटनेने विविध मागण्यांसाठी शुक्रवार ११ सप्टेंबर २०२६ रोजी एक दिवसीय देशव्यापी...

देसाईगंज आदर्श महाविद्यालयात क्रांतीवीर बाबुराव शेडमाके ‘कमवा व शिका’ योजनेबाबत मार्गदर्शन.. -योजनेंतर्गत आर्थिकदृष्ट्या गरजू व होतकरू ४० विद्यार्थ्यांची निवड..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-आदर्श कला,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय देसाईगंज येथील विद्यार्थी विकास विभागाच्या वतीने विद्यार्थ्यांसाठी राबविण्यात येत असलेल्या क्रांतीवीर बाबुराव शेडमाके ‘कमवा व शिका’ योजनेअंतर्गत...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!