- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
गडचिरोली :-महाराष्ट्रात गुटखा,पानमसाला आणि सुगंधीत तंबाखूवर राज्य शासनाने १९ जुलै २०१२ पासून सक्तीची बंदी लादली; मात्र गेल्या १४ वर्षांत ही बंदी कागदोपत्रीच राहिल्याची टीका सातत्याने होत होती. छत्तीसगड,गुजरात,मध्य प्रदेश,हैदराबाद आदी ठिकाणी उत्पादित गुटख्याची महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात वाहतूक,साठवणूक आणि विक्रीचे जाळे झपाट्याने पसरले.परंतु मे महिन्यात तुकाराम मुंढे यांनी अन्न व औषध प्रशासन(एफडीए)आयुक्तपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर धडक कारवाईचे सत्र सुरू केल्याने चित्र बदलू लागले आहे.प्रतिबंधित गुटखा आणि तंबाखूजन्य पदार्थांच्या अवैध व्यवसायात सहभागी असलेल्यांवर थेट ‘मकोका’ लावण्याचा इशारा मुंढे यांनी दिला.त्याचा परिणाम राज्यातील अन्य जिल्ह्यांप्रमाणेच गडचिरोलीत स्पष्टपणे दिसून येत आहे.गेल्या तीन ते चार दिवसांपासून अधिकांश पानटपऱ्यांना टाळे लागले असून,सुरू असलेल्या पानटपऱ्यांमधून गुटखापुड्या व खर्रा गायब झाला आहे.विशेष म्हणजे,बंदी लागू झाल्यानंतर प्रथमच एवढ्या मोठ्या प्रमाणात विक्रेते आणि पुरवठादार धास्तावल्याचे चित्र दिसत आहे.अश्यातच गडचिरोली जिल्ह्यात प्रतिबंधित सुगंधित तंबाखू,अवैध दारु,जुगार व इतर बेकायदेशीर धंद्यांवर प्रभावी कारवाई करण्याचे आदेश जिल्हा पोलीस अधीक्षक एम.रमेश यांनी दिलेले असतांनाच गडचिरोली पोलिसांनी मोठी कारवाई करत सुगंधित तंबाखूच्या अवैध साठवणूक व विक्री करणाऱ्या पाच जणांच्या मुसक्या आवळून तब्बल २ लाख १५ हजार ७१० रुपये किंमतीचा प्रतिबंधित तंबाखू व इतर साहित्य जप्त केले.अरविंद अवधराम गुप्ता वय ३१ वर्षे,विवेक अवधराम गुप्ता वय २१ वर्षे,अनिकेत घनश्याम बांबोळे वय २७ वर्षे,यश सुभाष चव्हाण वय ३१ वर्षे,अजय सतिश गेडाम वय ३१ वर्षे अशी अटक केलेल्या आरोपींची नावे असून पाचही आरोपी गडचिरोली शहराच्या गोकुलनगर येथील रहिवासी आहेत.प्रकरणी गडचिरोली अन्न व औषध प्रशासन विभागाचे अन्न सुरक्षा अधिकारी जितेंद्र कुंजाम यांच्या फिर्यादीवरून गडचिरोली पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम १२३,२२३,२७४,२७५,३(५) तसेच अन्न सुरक्षा आणि मानके अधिनियम २००६ अंतर्गत विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.अवैध सुगंधित तंबाखू साठवणुकिबाबत गडचिरोली पोलिसांना गोपनीय माहिती मिळाली होती.त्याआधारे, काल शनिवारी गोकुलनगर परिसरात धाड मारताच गोकुलनगर येथील २१ वर्षीय विवेक अवधराम गुप्ता याने आपल्या राहत्या घरात तसेच किरायाच्या खोलीत विक्रीसाठी मोठ्या प्रमाणात प्रतिबंधित सुगंधित तंबाखू साठवून ठेवला होता.पोलिसांनी पंचासमक्ष दोन्ही ठिकाणी छापा टाकला असता मोठ्या प्रमाणावर तंबाखूजन्य पदार्थांचा साठा आढळून आला. कारवाईदरम्यान,४० हजार १२० रुपये किंमतीचे ८२ पाकिटे ‘ईगल हुक्का शिशा तंबाखू’,३२३ किलो कच्ची सुपारी (किंमत १ लाख ६१ हजार ५०० रुपये),६७ किलो ‘ईगल शिशा खर्रा’ पन्नी(किंमत १२ हजार रुपये)तसेच इतर साहित्य(किंमत २ हजार ९० रुपये)असा एकूण २ लाख १५ हजार ७१० रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
- Advertisement -

