Saturday, June 20, 2026
Homeचंद्रपूरजप्त केलेले दोन हायवा ट्रक तहसील कार्यालयातून बेपत्ता...

जप्त केलेले दोन हायवा ट्रक तहसील कार्यालयातून बेपत्ता…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
वरोरा(चंद्रपूर) :-रेतीची अवैध वाहतूक करतांना महसूल अधिकाऱ्यांनी दोन हायवा ट्रक जप्त केले.त्यानंतर ताब्यात घेऊन तहसील कार्यालय परिसरात जमा केलेले दोन हायवा ट्रक बेपत्ता झाल्याचा धक्कादायक प्रकार चंद्रपूर जिल्ह्याच्या वरोरा महसूलच्या तक्रारीमुळे काल,बुधवारी २२ जानेवारीला उघडकीस आला.
वरोरा तहसील कार्यालयाचे नायब तहसीलदार उल्हास लोखंडे व महसूल विभागााचे पथक मंगळवारी २१ जानेवारीच्या रात्री गस्त घालत होते.दरम्यान,त्यांना शेगाव बसस्थानकाजवळ एम एच२७ बीएक्स ४७०० आणि एम एच ४० सीटी १८०४ क्रमांकाचे दोन हायवा ट्रक आढळून आले.चौकशी केल्यानंतर दोन्ही वाहन चालकांकडून रेतीचा परवाना आढळून आला नाही. त्यामुळे रेती भरलेले हायवा ट्रक रात्रीच वरोरा तहसील कार्यालय परिसरात जमा करायला लावले.मात्र,पहाटे हे ट्रक कार्यालयाच्या परिसरातून बेपत्ता झाले.जप्त केलेले दोन्ही ट्रक तहसील परिसरात लावल्यानंतर चाव्या नायब तहसीलदार लोखंडे यांनी आपल्या ताब्यात घेतल्या. कारवाई करून घरी गेल्यानंतर हे ट्रक बेपत्ता झाले. वाहनांच्या चाव्या अधिकाऱ्यांकडेच असतांना बेपत्ता झाल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.काही महिन्यांपूर्वी विनापरवाना रेती भरलेले ट्रॅक्टर वनविभागाने जप्त केले होते.चालकाने रेती रस्त्यावरच टाकून ट्रॅक्टर घेऊन पोबारा केला होता.वनविभागाने पोलिसात तक्रार केल्यानंतर ही घटना उघडकीस आली होती.आता तहसील कार्यालयातून दोन ट्रक बेपत्ता झाल्याने सर्वत्र चर्चेचा विषय ठरला आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

वाघाच्या हल्ल्यात शेतकऱ्याचा मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-वाघाच्या हल्ल्यात एका शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना नागभीड तालुक्यातील गिरगाव येथे आज,शुक्रवार १९ जून रोजी सकाळच्या सुमारास उघडकीस आली.आत्माराम दसरू बोरकर...

कुटुंबीयांना भेटण्यासाठी गावात येताच नक्षली समर्थक पोलिसांच्या तावडीत..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-तब्बल अकरा वर्षांपासून पोलिसांना गुंगारा देणारा नक्षल समर्थक अखेर पोलिसांच्या तावडीत सापडला.विशेष म्हणजे,कुटुंबीयांना भेटण्यासाठी गावात येताच त्यास अटक करण्यात आली.त्याचा शोध...

देसाईगंजात सुगंधित तंबाखूविक्री जोमात; आरमोरीत अवैध सट्टा-पट्टी,तर कुरखेड्यात दारूचा महापूर..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-गडचिरोली जिल्ह्याच्या विविध तालुक्यात अवैध धंद्यांनी डोके वर काढले असून देसाईगंज शहर व तालुक्यात सुगंधित तंबाखूची खुलेआम विक्री,तर आरमोरी शहरापासून ते ग्रामीण...

जीएसटी नंबर मिळवून दिले नं..! आता दहा हजार द्या.. – राज्यकर निरीक्षक लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-गलेलठ्ठ पगार असतांना एकदा कां ओवर कमाईची सवय लागली रे लागली,तर मग ज्या टेबलावर कुठलेही काम मोफत जरी होत असेल तरी...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!