Wednesday, August 5, 2026
Homeउद्रेक न्युज वृत्तचार भाषांवर प्रभुत्व गाजवणाऱ्या नक्षलीची ओळख एका सेल्फीमुळे; वाचा रोमांचक कहाणी..

चार भाषांवर प्रभुत्व गाजवणाऱ्या नक्षलीची ओळख एका सेल्फीमुळे; वाचा रोमांचक कहाणी..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त :-ओडिशा आणि छत्तीसगड सीमेवर झालेल्या चकमकीत चलपती हा म्होरक्या मारला गेला.अनेक दशके चलपती कोण?याची माहिती नसणाऱ्या पोलिसांना त्याची माहिती पत्नीसोबत काढलेल्या सेल्फीमुळे मिळाली.त्याची पत्नीही नक्षलवादी कारवायांत सहभागी आहे.रामचंद्र रेड्डी हा चलपती नावानेच नक्षलींमध्ये ओळखला जातो. ओडिशाच्या नयागडमध्ये २००८ मध्ये झालेल्या सुरक्षा दलातील हल्ल्याचा मास्टरमाईंड होता.या हल्ल्यात १३ सुरक्षा कर्मीचा मृत्यू झाला होता.पोलिसांचा शस्त्रसाठा लुटल्यानंतर नक्षलवादी सुरक्षित नयागडमधून बाहेर पडतील याची तजवीज त्याने केली होती.पोलिसांची कुमक या हल्ल्यावेळी मिळू नये म्हणून त्याने या भागाकडे येणाऱ्या सर्व रस्त्यांवर झाडे पाडून अडथळे निर्माण केल होते.आंध्र प्रदेशच्या चित्तूर जिल्ह्यातील चलपती तेथील नक्षलवादी चळवळ संपल्यानंतर छत्तीसगड आणि ओडिशात कार्यरत झाला.गेले अनेक महिने तो त्याच्या गुडघ्याच्या त्रासामुळे प्रवास करू शकत नसल्याने बस्तर जिल्ह्यातील दरभा गावात राहत होता.तो आता पासष्टीचा आहे.शाळेचे तोंडही न पाहिलेल्या चलपतीचे वाचन मात्र अफाट होते.तेलुगू,हिंदी,इंग्लिश आणि ओडिया या भाषांवर प्रभुत्व होते.लष्करी युद्धकला आणि गनिमी कावा यात तो तज्ज्ञ होता.जंगलात वास्तव्य करीत असतांना तो अरुणा ऊर्फ चैतन्य व्यंकट रवीच्या संपर्कात आला.ती आंध्र,ओडिशा सीमावर्ती समितीच डेप्युटी कमांडर होती.सहवासातून प्रेम फुलल्यावर दोघे विवाहबद्ध झाले.दशकभर चलपती कोण? याची साधी कल्पनाही पोलिसांना नव्हती.२०१६ मध्ये एका चकमकीत एक फोन सापडला.त्यात त्या दोघांचा सेल्फी होता.त्यावरून त्याची ओळख पटली आणि पोलिसांना त्याचा ठावठिकाणा समजला.त्यानंतर त्याच्या १२ साथीदारांनी त्याला सुरक्षितस्थळी हलवत असतांना झालेल्या चकमकीत चलपती मृत्यू पावला.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

ऑगस्ट महिन्यापासून गॅस कनेक्शनची ई-केवायसी असणे बंधनकारक; अन्यथा कनेक्शन होणार बंद..

उद्रेक न्युज वृत्त :-गॅस सिलिंडरचा काळाबाजार थांबवण्यासाठी आणि साठेबाजी उघड करण्यासाठी केंद्र सरकारने सार्वजनिक क्षेत्रातील गॅस कंपन्या इंडेन, एचपी आणि भारत गॅसच्या ग्राहकांसाठी स्वयंपाकाच्या...

आता बनावट किंवा खोट्या कागदपत्रांच्या आधारे जातवैधता प्रमाणपत्र तयार करणे पडणार महागात..

उद्रेक न्युज वृत्त :-बरेचदा जातवैधता प्रमाणपत्र अर्थात कॉस्ट व्यालीडिटी सर्टिफिकेट बनावट किंवा खोट्या कागदपत्रांच्या आधारे बनवून शासकीय योजनांचा लाभ मिळवणे,शासकीय नोकरी,अभियांत्रिकी प्रवेश व इतर...

महामार्गाच्या विस्तारासाठी सरकारने शेतकऱ्यांना भूमिहीन करू नये- विजय वडेट्टीवार

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गाचा विस्तार भंडारा,गोंदिया,गडचिरोली आणि चंद्रपूरपर्यंत करण्यासाठी सुरू असलेल्या भूसंपादनात व सुपिक जमीन घेण्यासाठी प्रशासनाकडून बळजबरी केली जात असल्याचा आरोप...

गडचिरोली जिल्ह्याला ४८ आधार नोंदणी संच प्राप्त; इच्छुक सेवा केंद्र चालकांनी अर्ज करण्याचे आवाहन..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील ग्रामीण व दुर्गम भागात आधार नोंदणी व बायोमेट्रिक अद्ययावतीकरणाच्या सेवा अधिक प्रभावीपणे उपलब्ध करून देण्यासाठी इच्छुक आपले सरकार सेवा केंद्र...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!