Thursday, September 24, 2026
Homeचंद्रपूरकोळशी येथे ग्राम जयंती महोत्सव आदर्श विवाह मेळावा संपन्न

कोळशी येथे ग्राम जयंती महोत्सव आदर्श विवाह मेळावा संपन्न

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त

नितेश केराम/चंद्रपूर विशेष जिल्हा प्रतिनिधी

चंद्रपूर :- कोरपना तालुक्यातील कोळशी येथे ग्राम जयंती महोत्सव आदर्श विवाह मेळावा दरवर्षी प्रमाणे याही वर्षी सुध्दा मोठ्या उत्साहात साजरा करून संपन्न झाला.कोळशी ग्रामवाशिय जनता अविरत पंधरा वर्षांपासून विवाह सोहळ्याची पंरपरा जोपासित आहेत.सदर विवाह सोहळ्यामध्ये कुठल्याही प्रकारची आर्थिक मदत न घेता संपूर्ण विवाह मोफत लावल्या जातो.

आजच्या घडीला अनेक विवाहांवर लाखो रुपयांची उधळपट्टी केली जाते.मात्र अनेक सर्वसामान्य व गोरगरीब नागरिकांकडे पैस्या अभावी विवाहास आर्थिक अडचणींचा सामना करावा लागतो.अशातच हीच परिस्थिती लक्षात घेता गावागावात सुख शांती प्रस्तापित होण्याच्या दुष्टीने सर्व थोर महापुरुष व संताच्या जयंतीचे औचित्य साधून वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या अंतीम इच्छेनुसार श्री गुरुदेव सेवा मंडळ सक्रिय कार्य घडविण्यासाठी तसेच नव्या पिडीला मानवधर्ममाचा विश्वशांतीचा व बंधुत्वाचा दिव्य संदेश देण्याचा साधूसंत व महापूरुषाचा कार्यकर्तुंत्वाचा जाणीव व्हावी व प्रेरणा मिळावी या निमित्ताने ग्राम जयंती महोत्सव आदर्श विवाह मेळावा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. त्या निमित्त कार्यक्रमात विवाह सोहळा ठेवण्यात आला.यामध्ये कोळशी गावातील युवक तरुण पुढे येऊन असे विविध कार्यक्रम गावात राबवित असतात.  विवाह सोहळ्यामध्ये परिसरातील गुरुदेव सेवा मंडळाच्या वतीने विवाह सोहळ्याचा कार्यक्रम मोठया संखेने पार पाडण्यात आला.

सदर मेळाव्यात तीन विवाह पार पडले असून विवाह सोहळ्याच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रेमललीत पारधी,ग्रामगीतार्चाय घुग्गुसचे नंदकीशोर वाढई,सरपंच संघटनेचे कालिदास चेडे,मीनाथ महाराज नारायण झाड,उमेश कोल्हे,दिलीप दोरखंडे,पांडुरंग जरीले, किलनाके महाराज आदींची प्रमुख्याने उपस्थिती होती. 

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

पुढील तीन तासात दोन जिल्ह्यात बरसणार जोरदार पाऊस; नागरिकांनी सतर्कता बाळगण्याचे आवाहन..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-उघडीप देणारा पाऊस कुठे जोरदार पडतो,तर कुठे एक थेंबही पडत नाही.निसर्गाचा लहरीपणा या वर्षी चांगलाच धडा शिकवायला लागल्याचे चित्र आहे.विशेष म्हणजे,काही...

निर्धारित ध्वनी मर्यादेचे उल्लंघन; डीजे मालक व गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांविरुद्ध गुन्हा दाखल.. – डीजे सह इतर साहित्य जप्त..

उद्रेक न्युज वृत्त  प्रशांत गेडाम  सिंदेवाही(चंद्रपूर):-चंद्रपूर जिल्ह्याच्या सिंदेवाही पोलीस स्टेशन हद्दीतील मौजा पवनपार येथील नवयुवक बाल गणेश मंडळाच्या गणेश विसर्जन मिरवणुकीत शासनाने प्रतिबंधित केलेल्या प्रेशर मिड(Pressure...

डुंबरसात्या आणण्यासाठी जंगल परिसरात गेलेल्या इसमाचा वाघाच्या हल्ल्यात मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-गावालगतच्या जंगल परिसरात 'डुंबरसात्या' म्हणजेच मशरूम आणण्यासाठी गेलेल्या एका ४५ वर्षीय इसमाचा वाघाच्या हल्ल्यात मृत्यू झाल्याची घटना आज,गुरुवार २४ सप्टेंबर रोजी...

कुरुड,कोंढाळा,सावंगी व विसोरा गावातील रिक्त कोतवाल पद भरण्यास शासनाची मान्यता.. – महिला आरक्षण व रिक्त पदे भरण्याकरिता जातीचा प्रवर्ग निश्चित करण्यासाठी विशेष सभा..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-गडचिरोली जिल्ह्याच्या देसाईगंज तालुक्यातील कुरुड,कोंढाळा,सावंगी व विसोरा गावातील गेल्या अनेक कालावधीपासून रिक्त असलेले कोतवाल(महसुल सेवक)पद भरण्यास शासनाने मान्यता दिली असून संबंधित गावातील...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!