Saturday, July 18, 2026
Homeदेसाईगंजदेसाईगंज,आरमोरी ठाण्याचे नवनियुक्त ठाणेदार अवैध धंद्यांवर लगाम लावणार काय?

देसाईगंज,आरमोरी ठाण्याचे नवनियुक्त ठाणेदार अवैध धंद्यांवर लगाम लावणार काय?

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त

देसाईगंज :- गडचिरोली जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांनी २० मार्च २०२३ रोजी आदेश काढून अपवादात्मक प्रकरणात सहानुभतीपूर्वक विचार करून जनहितार्थ कायद्या व सुव्यवस्था प्रशासकीय निकडीनुसार अधिनियमातील विविध कलमान्वये पदावधी पूर्ण होण्यापूर्वी बदली करणे गरजेचे असल्यास अशा प्रकरणांमध्ये प्रदान करण्यात आलेल्या अधिकाराचा वापर करून तात्पुरत्या स्वरूपात बदलीचे आदेश काढण्यात आले.त्यानुसार  देसाईगंजचे नवे ठाणेदार किरण रासकर तर आरमोरीचे नवे ठाणेदार संदीप मंडलिक यांची  नवनियुक्ती करण्यात आली.नवनियुक्ती तर करण्यात आली; मात्र दोन्ही तालुक्यातील ठाणेदार अवैध धंद्यांवर लगाम लावणार की काय? असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जातो आहे.जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांनी घेतलेले निर्णय वाखाणण्याजोगे आहे.जिल्ह्यामध्ये कधी न घडणारे खरे चित्र आज निदर्शनास येऊ लागले आहेत.

पूर्वी सगळीकडेच अवैध धंदे मोठ्या प्रमाणावर फोफावली होती.अशातच सध्याच्या घडीला अवैध सट्टा-पट्टी,कोंबडे बाजार,जुगार व इतर अवैधरीत्या चालणाऱ्या धंद्यांवर लगाम लावले आहे.मात्र हल्ली काही ठिकाणी शहरी तसेच ग्रामीण भागांमध्ये मोठ्या प्रमाणावर अवैध दारू विक्री अजूनही जोमाने सुरूच असल्याचे चित्र हल्ली दिसून येत आहे.दिवसाढवळ्या नव्याने मोठ्या प्रमाणावर नवनवीन दारूचा पुरवठा करणारे डोके वर काढू लागले आहेत.

ग्रामीण भागात तळीमांची संख्या झपाट्याने वाढत चालली आहे.दारूच्या आहारी जाऊन काही जणांची संसारे उध्वस्त होण्याच्या मार्गावर आहेत.अशातच काही अल्पवयीन मुले सुध्दा नशेच्या धुंदीत तल्लीन होतांना दिसून येतात.त्यामुळे असे चित्र दिसू नये याकरिता यावर आवर घालणे आवश्यक आहे.तसेच अवैधरित्या दारू विक्री बंदीवर देसाईगंज,आरमोरी ठाण्यातील नवनियुक्त ठाणेदार लगाम लावणार की काय? याकडे सर्वांच्या नजरा भिडलेल्या दिसून येत आहेत.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

पोलिसांनी पकडले सुगंधीत तंबाखूचे मोठे १० पोते..

उद्रेक न्युज वृत्त  गोंदिया :-सध्याच्या घडीला राज्याच्या विविध भागात अवैध सुगंधित तंबाखू,गुटखा व इतर मादक पदार्थ विक्री तथा त्याची वाहतूक करणाऱ्यांवर कारवाईचा सपाटा सुरू असतांनाच...

शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयांना विविध अर्थसहाय्य योजनांचा लाभ; प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-भारत सरकारच्या सांस्कृतिक कार्य विभागांतर्गत कार्यरत असलेल्या राजा राममोहन रॉय ग्रंथालय प्रतिष्ठान,कोलकाता यांच्या समान निधी(Matching Schemes)व असमान निधी(Non-Matching Schemes)योजनांद्वारे राज्यातील शासनमान्य...

रेल्वेची धडक; सहा हरणांचा जागीच मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-जिल्ह्याच्या पारशीवनी तालुक्यातील कन्हान नगर परिषद हद्दीच्या तुकाराम नगर नजीकच्या रेल्वे स्टेशन परिसरातील ट्रॅकवर तब्बल सहा हरीण मृतावस्थेत आढळून आल्याची घटना आज,शनिवार...

नैनपूरच्या महात्मा गांधी नगर परिषद शाळेत दोन डिजिटल वर्गखोल्यांचे उद्घाटन; प्रत्यक्ष मतदानातून शालेय मंत्रिमंडळाची स्थापना..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-देसाईगंज शहराच्या नैनपूर वार्ड येथील महात्मा गांधी नगर परिषद उच्च प्राथमिक शाळेत डिजिटल शिक्षण आणि लोकशाही मूल्यांचा सुंदर संगम अनुभवत आज,शनिवार १८...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!