Friday, June 19, 2026
Homeवर्धाऐन संक्रातीच्या दिवशीच तलाठी अडकला एसीबीच्या जाळ्यात..!

ऐन संक्रातीच्या दिवशीच तलाठी अडकला एसीबीच्या जाळ्यात..!

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
वर्धा :-जिल्ह्याच्या कारंजा तालुक्यातील काजळी ग्रामपंचायतीच्या तलाठ्यास ऐन संक्रात सणाच्या दिवशीच तीन हजाराची लाच घेतांना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने तलाठी कार्यालयात सापळा रचून रंगेहाथ अटक केली आहे.ललितकुमार रामकृष्णाजी जोगे वय ४० वर्षे,रा.सुखकर्ता नगर, आलोडी,ता.जि.वर्धा असे अटकेतील लाचखोर तलाठ्याचे नाव आहे.
एसीबीने दिलेल्या माहितीनुसार,प्रकरणातील तकारदार यांची डोंगरगाव शेत शिवारात शेत क्रमांक ५९/१ नुसार २.४९ हे.आर.क्षेत्रात शेत जमिन आहे. शेतीच्या सातबाऱ्यावर सन २०२४-२०२५ मधील पेरेपत्रक (पिकांची नोंद)चढविण्यासाठी तक्रारदार व त्यांचे मित्र ७ जानेवारी २०२६ रोजी काजळी साजाचे तलाठी ललित जोगे यांचेकडे गेले असता त्यांनी ३ हजार रुपयांची मागणी केली.तक्रारदार यांना लाच रक्कम देण्याची मुळीच ईच्छा नसल्याने त्यांनी काल,बुधवार १४ जानेवारी रोजी वर्धा येथील लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली. लागलीच ऐन संक्रात सणाच्या दिवशीच एसीबीच्या पथकाने सापळा रचून पडताळणी केली व तलाठी कार्यालयातच ३ हजार रुपये लाचेची रक्कम घेतांना तलाठ्यास रंगेहाथ पकडले.पथकाने तलाठ्याची अंगझडती घेतली असता लाच रकमेसह एक रेडमी कंपनीचा मोबाईल मिळुन आला.प्रकरणी आरोपी तलाठी ललितकुमार जोगे याचेवर कारंजा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
सदरची कार्यवाही दिगांबर प्रधान,पोलीस अधिक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग नागपुर,माधुरी बाविस्कर,अप्पर पोलीस अधिक्षक,लाचलुचपत प्रतिबंधक विभाग नागपुर यांचे मार्गदर्शानात पर्यवेक्षक अधिकारी राकेश साखरकर,पोलीस उपअधिक्षक, ला.प्र.वि.वर्षा,सापळा अधिकारी कान्होपात्रा बन्सा, पोलीस निरिक्षक संदिप मुपडे,ला.प्र.वि.वर्धा व पथकातील पो.हवा.पंकज डाहाके,मंगेश झांमरे, मपो.हवा.राखी फुलमाळी,पो.कॉ.प्रशांत मानमोडे, मनिष मसराम,लक्ष्मण केंद्रे व चालक स.फौ.गणेश मेश्राम यांचेसह लाचलुचपत प्रतिबंधक विभाग वर्धा यांनी केली.
  • नागरिकांना आवाहन👇
लाचलुचपत प्रतिबंधक विभाग,वर्धा कडुन आव्हान करण्यात येते की,कोणी लोकसेवक स्वतः अगर इतरांमार्फत शासकिय कामासाठी लाचेची मागणी करीत असल्यास किंवा खाजगी व्यक्ती मार्फत कोणी लाचेची मागणी करीत असल्यास टोल फ्रि क्रमांक- १०६४, दुरध्वनी क्र.07152-243844 व व्हॉटसॲप मोबाईल क्र.7517611064 व पोलीस उपअधिक्षक, मो.क्र.7350902100 वर संपर्क करावा.तसेच ई.मेल- acbwardha@gmail.com वर तक्रार करावी,असे आवाहन लाच लुचपत प्रतिबंधक विभाग,वर्धा च्या पोलीस निरिक्षक कान्होपात्रा बन्सा यांनी केले आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

जीएसटी नंबर मिळवून दिले नं..! आता दहा हजार द्या.. – राज्यकर निरीक्षक लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-गलेलठ्ठ पगार असतांना एकदा कां ओवर कमाईची सवय लागली रे लागली,तर मग ज्या टेबलावर कुठलेही काम मोफत जरी होत असेल तरी...

स्थानिक उत्पादनांना मिळणार नवी ओळख; गडचिरोली ब्रँडसाठी स्वतंत्र लोगो आणि टॅगलाईन..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-स्थानिक उत्पादनांना जागतिक बाजारपेठ मिळवून देण्यासाठी स्वतंत्र 'गडचिरोली ब्रँड' विकसित करणे,पर्यटन विकासाला गती देणे,महिला बचत गटांना अधिक सक्षम बनविणे,धान साठवणुकीची क्षमता...

गडचिरोलीतील सहा लोहखनिज खाणी महाराष्ट्र राज्य खनिज महामंडळाला द्याव्यात- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस – गडचिरोली हे भविष्यात देशातील महत्त्वाचे औद्योगिक व पोलाद उत्पादन केंद्र म्हणून...

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-महाराष्ट्राला देशातील ‘ग्रीन स्टील हब’ बनविण्याच्या उद्देशाने केंद्रीय कोळसा व खनिकर्म मंत्रालयाने गडचिरोलीतील सहा लोहखनिज खाणी महाराष्ट्र राज्य खनिज महामंडळाला द्याव्यात,अशी...

माजी सैनिकास पैश्याची मागणी; महिला लिपिक एसीबीच्या कचाट्यात..

उद्रेक न्युज वृत्त  गोंदिया :-एका ३६ वर्षीय महिला लिपिकेस(महसुल सहाय्यक)माजी सैनिक यांचे ताब्यात असलेली सिलींगची अतिक्रमीत जमीन माजी सैनिक म्हणुन त्यांचे नावावर नियमीत करुन देण्याच्या...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!