Friday, June 19, 2026
Homeनागपूरहृदय हेलावणारी घटना..! सख्ख्या बापाने चिमुकलीच्या छातीत चाकूने केले वार.. - वेदनेने...

हृदय हेलावणारी घटना..! सख्ख्या बापाने चिमुकलीच्या छातीत चाकूने केले वार.. – वेदनेने किंकाळ्या फोडून सोडला प्राण..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
नागपूर :-सख्खा बाप किती निर्दयी म्हणावा.पत्नी सोबत पटत नसल्याने पत्नी वेगळी राहू लागली.अश्यातच आठ वर्षीय चिमुकलीचा ताबा पत्नीकडे जाऊ नये म्हणून चक्क पोटच्या गोळ्याला निर्दयी बापाने छातीत चाकूने वार करून हत्या केल्याची घटना नागपूरच्या वाठोडा पोलिस ठाण्याच्या हद्दीत  घडली.धनश्री शेखर शेंदरे वय ८ वर्षे असे मृत चिमुकलीचे नाव आहे.तर शेखर कृष्णराव शेंदरे वय ४६ वर्षे,रा.सरोदेनगर,नागपूर असे हैवान बापाचे नाव आहे.
आरोपी शेखरचा पत्नी शुभांगीसोबत बऱ्याच दिवसांपासून कौटुंबिक वाद सुरू होता.वादामुळे पत्नी शुभांगी त्याच्यापासून वेगळी राहू लागली.दोघांना आठ वर्षाची मुलगी असून वादानंतर ती शेखरकडेच होती. शेखर हा सरोदेनगरात किरायाने राहत असून
त्याच्यासोबत आई कुसुमताई,४५ वर्षीय लहान भाऊ उमेश हे देखील राहतात.मुलगी शेखरकडे राहत असल्याने शुभांगी वारंवार मुलीचा ताबा मागत होती. मात्र,शेखर त्याला नकार देत होता व त्यावरून वाद घालत होता.कायद्याच्या मार्गाने मुलगी धनश्रीचा ताबा शुभांगीकडेच जाईल याची त्याला कल्पना होती.त्यामुळे, त्याच्या डोक्यात हैवान शिरला आणि काल बुधवारी सकाळी पावणेसहाच्या सुमारास झोपेत असलेल्या धनश्रीच्या छातीत चाकूने वार केले.धनश्रीने वेदनेमुळे किंकाळ्या फोडताच आवाज ऐकून कुटूंबीयांनी धाव घेतली.पाहतात तो काय धनश्री रक्तबंबाळ अवस्थेत तडफडू लागली.तिच्याकडे पाहून दगडालाही पाझर फुटेल अशी अवस्था झाली होती.त्यानंतर,आजी व काका उमेश यांनी तातडीने धनश्रीला वाठोडा पोलिस ठाण्यात नेले व तेथून मेडिकल रुग्णालयात दाखल केले.मात्र, काही वेळातच धनश्रीने प्राण सोडला.प्रकरणी शेखरच्या आईच्या तक्रारीवरून हैवान बापावर गुन्हा दाखल करण्यात आला.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

जीएसटी नंबर मिळवून दिले नं..! आता दहा हजार द्या.. – राज्यकर निरीक्षक लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-गलेलठ्ठ पगार असतांना एकदा कां ओवर कमाईची सवय लागली रे लागली,तर मग ज्या टेबलावर कुठलेही काम मोफत जरी होत असेल तरी...

स्थानिक उत्पादनांना मिळणार नवी ओळख; गडचिरोली ब्रँडसाठी स्वतंत्र लोगो आणि टॅगलाईन..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-स्थानिक उत्पादनांना जागतिक बाजारपेठ मिळवून देण्यासाठी स्वतंत्र 'गडचिरोली ब्रँड' विकसित करणे,पर्यटन विकासाला गती देणे,महिला बचत गटांना अधिक सक्षम बनविणे,धान साठवणुकीची क्षमता...

गडचिरोलीतील सहा लोहखनिज खाणी महाराष्ट्र राज्य खनिज महामंडळाला द्याव्यात- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस – गडचिरोली हे भविष्यात देशातील महत्त्वाचे औद्योगिक व पोलाद उत्पादन केंद्र म्हणून...

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-महाराष्ट्राला देशातील ‘ग्रीन स्टील हब’ बनविण्याच्या उद्देशाने केंद्रीय कोळसा व खनिकर्म मंत्रालयाने गडचिरोलीतील सहा लोहखनिज खाणी महाराष्ट्र राज्य खनिज महामंडळाला द्याव्यात,अशी...

माजी सैनिकास पैश्याची मागणी; महिला लिपिक एसीबीच्या कचाट्यात..

उद्रेक न्युज वृत्त  गोंदिया :-एका ३६ वर्षीय महिला लिपिकेस(महसुल सहाय्यक)माजी सैनिक यांचे ताब्यात असलेली सिलींगची अतिक्रमीत जमीन माजी सैनिक म्हणुन त्यांचे नावावर नियमीत करुन देण्याच्या...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!