Thursday, August 6, 2026
Homeगडचिरोलीजिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाची बैठक संपन्न.. - देसाईगंज व गडचिरोली विभागात मानव-वन्यजीव...

जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाची बैठक संपन्न.. – देसाईगंज व गडचिरोली विभागात मानव-वन्यजीव संघर्षाची तीव्रता..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-जिल्ह्यातील विविध नैसर्गिक व मानवनिर्मित आपत्तींचा प्रभावीपणे सामना करण्यासाठी अद्ययावत जिल्हा आपत्ती व्यवस्थापन आराखड्यानुसार सर्व विभागांनी समन्वयाने आणि सज्जतेने कार्यवाही करावी,असे निर्देश जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणचे अध्यक्ष अविश्यांत पंडा यांनी दिले.जिल्हाधिकारी कार्यालय येथे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाची बैठक संपन्न झाली,यावेळी ते बोलत होते.बैठकीस प्राधिकरणाचे सदस्य व विविध विभागांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.
आपत्ती व्यवस्थापन आराखड्याला मंजुरी👇
बैठकीत जिल्हा आपत्ती व्यवस्थापन आराखड्याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. जिल्ह्याची आपत्तीप्रवणता लक्षात घेऊन संभाव्य धोके,त्यांचे स्वरूप,चालू व भविष्यातील तसेच नव्याने उद्भवणाऱ्या जोखीम,संवेदनशील ठिकाणे, प्रतिबंधात्मक उपाययोजना यांचा समावेश असलेला हा आराखडा तयार करण्यात आल्याची माहिती जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी निलेश तेलतुंबडे यांनी दिली.चर्चेनंतर सदर आराखड्यास प्राधिकरणाकडून मंजुरी देण्यात आली.
सर्व विभागांना तत्परतेचे निर्देश👇
आपत्ती व्यवस्थापन ही केवळ एका विभागाची जबाबदारी नसून सर्व यंत्रणांचा समन्वय आवश्यक आहे.त्यामुळे सर्व विभागांनी आपल्याकडे उपलब्ध असलेल्या साधनसामग्रीचा आढावा घ्यावा आणि आराखड्यानुसार कार्यवाही सुनिश्चित करण्याचे निर्देश त्यांनी दिले.
मानव-वन्यजीव संघर्षावर तातडीच्या उपाययोजना👇
आराखड्यात मानव-वन्यजीव संघर्षाचाही समावेश करण्यात आला असून,विशेषतः देसाईगंज(वडसा)व गडचिरोली विभागात या संघर्षाची तीव्रता वाढत असल्याचे वन विभागाकडून निदर्शनास आणण्यात आले.या पार्श्वभूमीवर वन विभागाने तातडीने आवश्यक उपाययोजना राबवाव्यात,असे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले.
पूरस्थिती नियंत्रण व पूर्वसूचना यंत्रणा👇
भामरागड,अहेरी व सिरोंचा तालुक्यातील मान्सूनकालीन पूरपरिस्थिती लक्षात घेऊन ग्रामपातळीवर अलर्ट यंत्रणा सज्ज ठेवण्याचे निर्देश देण्यात आले.तसेच धरणांतून पाणी विसर्गाबाबत ऑटोमॅटिक पूर्वसूचना देणारी प्रणाली कार्यान्वित करण्याचे आदेश पाटबंधारे विभागास देण्यात आले.
भामरागड तालुक्यातील इंद्रावती,पर्लकोट व पामुलगौतम नद्यांमुळे उद्भवणाऱ्या पूरपरिस्थितीबाबत सखोल सर्वेक्षण करून उपाययोजनांचा अहवाल सादर करण्याचे निर्देशही देण्यात आले.बैठकीस उपवनसरंक्षक श्रीमती आर्या व्ह‍ि.एस.,उपव‍िभागीय अध‍िकारी तथा सहायक जिल्हाधिकारी अरुण एम.न‍िवासी उपज‍िल्हाध‍िकारी आश‍िष वानखेडे,पाटबंधारे व‍िभागाचे कार्यकारी अभ‍ियंता राहुल मोरघडे,सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभ‍ियंता सुरेश साखरवाडे व अव‍िनाश मोरे तसेच इतर संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

देसाईगंज,आरमोरी,कुरखेडा,कोरची व इतर पोलीस ठाण्याच्या ठाणेदारांच्या बदल्या..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-गडचिरोली जिल्ह्याच्या विविध पोलीस ठाण्यांसह उपपोलिस ठाणे व पोलिस मदत केंद्रांतील तब्बल ७२ अधिकाऱ्यांच्या प्रशासकीय बदल्या करण्यात आल्या आहेत.या संदर्भात काल बुधवारी...

खासगी हॉस्पिटल्सचा संप; रुग्ण सेवा प्रभावित..

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलने (एमएमसी)'सर्टिफिकेट कोर्स इन मॉडर्न फार्माकॉलॉजी' (सीसीएमपी)पूर्ण केलेल्या होमिओपॅथी(बीएचएमएस) डॉक्टरांना नोंदणी देण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाविरोधात राज्यभरातून वैद्यकीय असंतोषाचा वणवा...

तब्बल १५४ नवीन ‘आपले सरकार सेवा केंद्रे’ होणार स्थापन; अर्ज करण्याचे आवाहन..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यात ग्रामपंचायत व नगर परिषद आणि नगर पंचायत स्तरावर तब्बल १५४ नवीन 'आपले सरकार सेवा केंद्रे' स्थापन करण्यासाठी इच्छुकांकडून अर्ज मागविण्यात...

कोठी-पिपलीबुर्गी मार्गावरील पुलाच्या नुकसानीची होणार उच्चस्तरीय चौकशी..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्याच्या एटापल्ली तालुक्यातील हालेवारा-कोठी-रेगाडंडी-पिपलीबुर्गी मार्गावरील सा.क्र.६/९०० येथील मोठ्या पुलाच्या नुकसानीच्या घटनेची उच्चस्तरीय चौकशी करून जबाबदारी निश्चित करून चौकशीत दोषी आढळणाऱ्यांवर कठोर...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!