Saturday, August 1, 2026
Homeआरमोरीइयत्ता चौथीच्या विद्यार्थ्याची गळफास घेऊन आत्महत्या; आरमोरी तालुक्यातील घटना..

इयत्ता चौथीच्या विद्यार्थ्याची गळफास घेऊन आत्महत्या; आरमोरी तालुक्यातील घटना..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
आरमोरी(गडचिरोली):-एका दहा वर्षीय शालेय विद्यार्थ्याने राहत्या घरीच ओढणीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना काल रविवारी दुपारी ४.३० वाजेच्या सुमारास आरमोरी तालुक्याच्या कोजबी गावात घडली.संस्कार विनोद कन्नाके वय १० वर्षे, रा.कोजबी असे मृतक चिमुकल्याचे नाव असून मोठ्या बहिणीसमवेत आजी-आजोबाकडे राहून तो इयत्ता चौथ्या वर्गात शिक्षण घेत होता.
संस्कार हा काल रविवारी दुपारच्या सुमारास बाहेरुन घरी परतला,त्यानंतर काही वेळाने आजी-आजोबाचे लक्ष नसतांना त्याने घरातच ओढणीने सहाय्याने गळफास लावून जीवनयात्रा संपवली.सदरची घटना आजी-आजोबांच्या निदर्शनास येताच त्यांनी एकच हंबरडा फोडला.ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेत घटनेची माहिती गावातील पोलिस पाटील माधुरी सहारे यांना दिली. त्यानंतर,पोलीस पाटील यांनी आरमोरी पोलिसांना पाचारण केले.पोलिसांनी घटनेचा पंचनामा करुन मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी आरमोरी उपजिल्हा रुग्णालयात पाठविला.विशेष म्हणजे,संस्कार हा घटनेची दिवशी बाहेरून घरी परतला आणि काही वेळातच त्याने गळफास घेतल्याने शंका-कुशंकेला पेव फुटले आहे. त्यातच,त्याचे आई-वडील कामासाठी बाहेर राज्यात गेले असतांनाच दहा वर्षाच्या मुलावर एवढे कोणते संकट ओढवले की,त्याने आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलले.त्यामुळे आत्महत्या की हत्या? असा प्रश्न निर्माण झाला आहे.याबाबतचा अधिकचा तपास आरमोरी पोलिसांकडून करण्यात येत आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

तीन चिमुकल्यांचा नदीत बुडून दुर्दैवी मृत्यू; आज दुपारच्या घटनेने हळहळ..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्याच्या कुरखेडा तालुक्यातील मौजा-खेडेगाव येथे आज,शनिवार १ ऑगस्ट रोजी दुपारी सुमारे १२.३० वाजताच्या सुमारास सती नदीत आंघोळीसाठी गेलेल्या चार अल्पवयीन मुलांपैकी...

अखेर पुरात वाहून गेलेल्या ‘त्या’ इसमाचा सापडला मृतदेह..

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-जिल्ह्याच्या लाखांदूर तालुक्यातील मांदेड येथे अतिवृष्टीमुळे दुथडी भरून वाहणाऱ्या नाल्यात पडून एका वृद्धाचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त केली जात असतांनाच अखेर...

युरोप आणि चीन दौऱ्यासाठी शेतकऱ्यांनी अर्ज सादर करण्याचे आवाहन..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-विदेशातील शेतीचा अभ्यास करण्यासाठी राज्यातील शेतकऱ्यांचे देशाबाहेर अभ्यास दौरे आयोजित करण्यात येतात.सन २०२६-२७ साठी राज्य पुरस्कृत या योजनेत युरोप, चीन या...

कर्जमाफी योजनेतील ३ हजार ८१२ शेतकऱ्यांनी तातडीने ई-केवायसी करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-राज्य शासनाने २ जून आणि १५ जुलै २०२६ रोजी घेतलेल्या निर्णयानुसार ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना–२०२६’ जाहीर केली आहे.या योजनेच्या...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!