Thursday, August 6, 2026
Homeभंडाराइन्स्टाग्रामवर मैत्री; नंतर लैंगिक अत्याचार.. - २३ वर्षीय युवकावर गुन्हा दाखल...

इन्स्टाग्रामवर मैत्री; नंतर लैंगिक अत्याचार.. – २३ वर्षीय युवकावर गुन्हा दाखल…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
भंडारा :-सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रेम-प्रकरणे जास्तच निखळली जात आहेत.त्यातच अल्पवयीन मुली प्रेमाच्या जाळ्यात अडकून सर्वकाही गमावून बसू लागल्या आहेत.असाच प्रकार भंडारा जिल्ह्यात उघडकीस आला.सुरुवातील एका २३ वर्षीय युवकाची इन्स्टाग्रामवर अल्पवयीन मुलीशी ओळख झाली. अल्पवयीन विद्यार्थिनीसोबत मैत्री करून नंतर तिच्यावर लैंगिक अत्याचार करणाऱ्या युवकाविरुद्ध आंधळगाव पोलिसांनी तिची आई व मुलीच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल केला आहे.घटनास्थळ लाखनी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील असल्याने सदर गुन्हा लाखनी पोलिस ठाण्यात वर्ग करण्यात आला आहे.बुद्धशील नाशिक जांभूळकर वय २३ वर्षे असे आरोपीचे नाव आहे.
आंधळगाव पोलिस ठाण्याच्या हद्दीतील एका गावातील इयत्ता दहावीमध्ये शिकणारी १६ वर्षीय अल्पवयीन विद्यार्थिनीची ओळख इन्स्टाग्रामवरून लाखनी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील २३ वर्षीय बुद्धशील नाशिक जांभूळकर या युवकासोबत झाली. ओळखीचे रूपांतर मैत्रीत झाल्यामुळे त्यांच्या भेटी सुरू झाल्या.अशातच त्याने विद्यार्थिनीला त्याच्या घरी भेटायला बोलावले.त्यावरून रविवारी ८ डिसेंबरला ती त्याच्या गावी जाण्यासाठी निघाली.दुपारी ४ वाजता ती बुद्धशीलच्या दुचाकीवरून त्याचे आईवडील काम करीत असलेल्या वीटभट्टीवर गेले.त्यानंतर त्याच्या गावी रात्री ८ वाजता पोहोचले.घरी कोणीही नसल्यामुळे पीडितेनेच स्वयंपाक केला.एकत्र जेवण केल्यानंतर रात्री त्याने तिच्या इच्छेविरुद्ध लैंगिक अत्याचार केला.दुसऱ्या दिवशी घरी पोहोचल्यावर आईने कुठे व कोणासोबत होती; अशी विचारणा केली असता पीडितेने घडलेला प्रकार सांगितला.त्यानंतर पीडितेने आईसह आंधळगाव पोलिस ठाणे गाठून तक्रार दाखल केली.हे प्रकरण लाखनी पोलिसांना वर्ग झाल्याने आता सहाय्यक पोलिस निरीक्षक आशिष चिलांगे तपास करीत आहेत.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

पत्नीच्या डोळ्यादेखत वाघाचा हल्ला; पती ठार..

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-जिल्ह्याच्या तुमसर तालुक्यातून एक धक्कादायक घटना आज,गुरुवार ६ ऑगस्ट रोजी दुपारच्या सुमारास उघडकीस आली.दावेझरी गाव नजीकच्या चुल्हारडोह-आग्री जंगल परिसरात गुरे चारण्यासाठी...

प्राप्त तक्रारींची दखल; जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्देशानंतर पातागुडम-सोमनपल्ली महामार्गाच्या दुरुस्तीला गती..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्याच्या सिरोंचा तालुक्यातील सोमनपल्ली राष्ट्रीय महामार्गाच्या दुरावस्थेबाबत नागरिकांकडून सातत्याने प्राप्त होणाऱ्या तक्रारींची दखल घेत जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांच्या निर्देशानंतर राष्ट्रीय महामार्ग...

सरकारने सरसकट थकबाकी द्यावी; अन्यथा बेमुदत धरणे आंदोलन.. – कंत्राटदार आक्रमक..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-सरकार केलेल्या कामांची थकबाकी देत नाही; पण नवीन कामे करवून घेत आहे.अश्यातच राज्यभरात विविध विभागातील कामांच्या सुमारे ९० हजार कोटी रुपयांच्या थकबाकीमुळे त्रस्त...

देसाईगंज,आरमोरी,कुरखेडा,कोरची व इतर पोलीस ठाण्याच्या ठाणेदारांच्या बदल्या..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-गडचिरोली जिल्ह्याच्या विविध पोलीस ठाण्यांसह उपपोलिस ठाणे व पोलिस मदत केंद्रांतील तब्बल ७२ अधिकाऱ्यांच्या प्रशासकीय बदल्या करण्यात आल्या आहेत.या संदर्भात काल बुधवारी...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!