- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
चंद्रपूर :-सिम व्हेरीफिकेशनच्या नावाने सायबर चोरट्याने गडचिरोली जिल्ह्याच्या नवतळा येथील इसमास ३ लाख २२ हजार ९३४ रुपयांना गंडा घातल्याचा प्रकार तीन दिवसांपूर्वी म्हणजेच सोमवारी ९ डिसेंबरला उघडकीस आला आहे.प्रकरणी सावली तालुक्याच्या पाथरी पोलीस स्टेशन येथे अज्ञात सायबर भामट्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.किशोर ढिवरुजी कुणघाडकर,रा.नवतळा, जि.गडचिरोली असे खात्यातून रक्कम लंपास झालेल्या इसमाचे नाव आहे.
किशोर कुणघाडकर हे चंद्रपूर जिल्ह्याच्या
सावली तालुक्यातील पाथरी येथे काही कामानिमित्त वास्तव्यास राहत आहेत.घटनेच्या दिवशी त्यांना ०६२०२१४५६३९ (06202145639) या नंबर वरून मोबाईलवर फोन आला.त्यांनी तो उचलताच समोरील व्यक्तीने ‘मी जिओ केअर सेंटर मुंबई वरून बोलत असून,तुमची सिम व्हेरिफाय होणार आहे.त्यासाठी तुमचे सिम बंद करण्यात येईल.तुम्हाला १० ते १५ मिनिटांनी कंपनीद्वारे फोन येईल व व ते सांगतील, त्यानुसार तुम्ही १ नंबर प्रेस कराल व तुमच्या आधार कार्डचे शेवटचे चार अंक सांगाल’ असे सांगण्यात आले.काही वेळा नंतर पुन्हा ०२२३५०६२२२२ (02235062222)या नंबर वरून कॉल आला.सिम व्हेरिफिकेशन होण्यासाठी १ नंबरची बटण दाबा;असे समोरच्या व्यक्तीने सांगितले.त्यानुसार किशोर कुणघाडकर यांनी १ नंबरची बटण दाबताच
फोन कट होऊन सिम कार्ड बंद झाले आणि लगेच कुणघाडकर यांच्या दोन ते तीन अकाउंट असलेल्या खात्यामधून टप्प्या टप्प्याने असे एकूण ३ लाख २२ हजार ९३४ रुपये लंपास करण्यात आले.काही वेळाने
आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच किशोर कुनघाडकर यांनी पाथरी पोलिस स्टेशन येथे गुन्हा दाखल केला.पोलिसांनी अज्ञात सायबर भामट्या विरुद्ध कलम (भा.न्या.सं.२०२३)३१८(४),(मा. तं. अ. २०००).६६ (क),६६ (ड) गुन्हा नोंदविण्यात आला. घटनेचा पुढील तपास पाथरी पोलिस करीत आहेत.
सावधगिरी बाळगा👇
सायबर गुन्हेगार हा वेगवेगळ्या युक्त्या लढवीत असतात जसे सायबर बुलिंग,जुस जैकिंग,सिम वेरिफिकेशसन,बैंक खाते अपडेट करणे,अश्लील व्हिडिओ बनवून ब्लॅकमेल करणे,कस्टमर केअर नंबर वरून फोन करणे,फ्री गिफ्टचे आमिष दाखविणे,फेक वेबसाईड,अज्ञात ॲप डाऊनलोड करणे,पोलीस अधिकारी असल्याचे सांगून आपल्याला आधार किंवा अन्य कोणतीही माहिती विचारल्यास सांगु नये.तुमचा युपीआय वर चुकीने पैसे पाठविले आहेत ते परत करायला सांगतील तर उत्तर देऊ नये.
प्रमोद रासकर,ठाणेदार पाथरी पोलिस स्टेशन👇
फ्री ऑफरला बळी पडू नका,तुमची वैयक्तिक माहिती सार्वजनिक करणे टाळा,फेक कॉलला उत्तर देऊ नका,कुणालाही ओटीपी सांगु नका,फेक ॲप डाउनलोड करू नका,वारंवार फोन येत असल्यास जवळच्या पोलिस स्टेशनला संपर्क करा,किंवा सायबर हेल्पलाईन १९३० या नंबरवर सपर्क साधावा.सायबर गुन्हेगार यांच्या पासून नागरिकांनी सावध रहावे.
- Advertisement -

