Thursday, August 27, 2026
Homeआरमोरीआरमोरी तालुक्यातील 'त्या' चार आरोपींची कारागृहात रवानगी... - आझाद समाज पार्टीने कठोर...

आरमोरी तालुक्यातील ‘त्या’ चार आरोपींची कारागृहात रवानगी… – आझाद समाज पार्टीने कठोर कारवाईची केली होती मागणी…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
आरमोरी(गडचिरोली):-प्रेम प्रकरणाच्या संशयातून केलेल्या मारहाणीमुळे तणावात गेलेल्या शिवानी फकीरदास कोवे वय १७ वर्षे,रा.कुकडी,ता.आरमोरी या अल्पवयीन मुलीने विष प्राशन केल्याने उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला होता.आरमोरी तालुक्याच्या विहीरगाव येथील प्रशांत भोयर या दोन अपत्य असलेल्याची पत्नी शिल्पा भोयर,आई कल्पना विश्वनाथ भोयर,वहिनी अरुणा प्रफुल भोयर यांनी शिवानीच्या घरी जाऊन भांडण करीत तिला खोलीत डांबून मारहाण केली होती.त्यामुळे ती नैराश्यात गेली आणि तिने विष प्राशन केले.ही आत्महत्या नसून हत्याच आहे; त्यामुळे मारहाण करणाऱ्या दोषींवर मनुष्यवधाच्या गुन्ह्यासह ऍट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा  दाखल करावा तसेच सदर प्रकरणाची सखोल चौकशी करून कुठल्याही राजकीय दबावात न येता युवतीच्या कुटुंबीयांना न्याय मिळवून देण्यात यावा; अशी मागणी गडचिरोलीसह आरमोरी आझाद समाज पार्टीचे गडचिरोली जिल्हाध्यक्ष राज बन्सोड, जिल्हा महासचिव पुरुषोत्तम रामटेके,आरमोरी विधानसभाध्यक्ष ऋषी सहारे,जिल्हा सचिव दिनेश बनकर,गडचिरोली विधानसभा प्रभारी धनराज दामले,आरमोरी तालूका कार्याध्यक्ष पुरुषोत्तम मैंद, युवा आघाडी प्रमुख शुभम पाटील,उपाध्यक्ष पियुष वाकडे,शहराध्यक्ष नितीन भोवते,मिडीया प्रभारी सतीश दुर्गमवार व पीडिताचे आई-वडील यांच्या वतीने करण्यात आली होती.त्यानुसार सिंधु विश्वनाथ भोयर,शिल्पा प्रशांत भोयर,अरूणा प्रफुल्ल भोयर,प्रशांत विश्वनाथ भोयर यांच्यावर आत्महत्येस कारणीभूत ठरल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला होता.या चार आरोपींची दोन दिवसांच्या पोलिस कोठडीनंतर काल ८ ऑक्टोंबरला कारागृहात रवानगी करण्यात आली आहे.पोलीस निरीक्षक कैलास गवते यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरिक्षक विजय चलाख,अंमलदार जयपाल बांबोडे,जयप्रकाश निमसरकर पुढील तपास करीत आहेत.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

नेपाळमध्ये अडकलेल्या पर्यटकांसाठी संपर्क क्रमांक व ऑनलाइन नोंदणी लिंक जारी..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-नेपाळमधील रसुवा जिल्ह्यात भोटे कोशी नदीला आलेल्या पूरस्थितीमुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे.या पार्श्वभूमीवर नेपाळमध्ये अडकलेल्या गडचिरोली जिल्ह्यातील पर्यटकांनी अथवा त्यांच्याशी संपर्क...

विजेचा जोरदार धक्का लागल्याने कर्मचाऱ्याचा मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-शेतशिवारातील विद्युत वाहिनीतील तांत्रिक बिघाड दूर करत असतांनाच अचानकपणे विजेचा जोरदार धक्का लागून विद्युत वितरण कंपनीत कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्याचा जागीच मृत्यू...

गडचिरोली जिल्ह्यातील सर्व पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याचे निर्देश.. -कामांच्या गुणवत्तेबाबत कोणतीही तडजोड खपवून घेतली जाणार नाही- सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोंसले

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील रस्ते व पुलांची कामे उच्च प्रतीची,सुरक्षित आणि दीर्घकाळ टिकणारी झाली पाहिजेत.कामांच्या गुणवत्तेबाबत कोणतीही तडजोड खपवून घेतली जाणार नाही.निकृष्ट अथवा सदोष...

धक्कादायक..! आई-वडीलांनी दोन मुलांना सोबत घेऊन धावत्या रेल्वे समोर मारली उडी.. – चौघांचा करून अंत..

उद्रेक न्युज वृत्त  जळगाव :-जिल्ह्याच्या अमळनेर तालुक्यातील टाकरखेडा येथे आज,गुरुवार २७ ऑगस्ट रोजी पहाटेच्या सुमारास एकाच कुटुंबातील चौघांनी धावत्या रेल्वे समोर उडी मारून सामूहिक आत्महत्या...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!