Monday, September 7, 2026
Homeदेसाईगंजदेसाईगंज तालुक्यातील राम मंदिरास सौंदर्यिकरणासह पर्यटन स्थळाचा दर्जा द्या- - सामाजिक कार्यकर्ते...

देसाईगंज तालुक्यातील राम मंदिरास सौंदर्यिकरणासह पर्यटन स्थळाचा दर्जा द्या- – सामाजिक कार्यकर्ते खेमराज नेवारे यांची मागणी

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
देसाईगंज(गडचिरोली):-देसाईगंज तालुक्यापासून अवघ्या दोन किलोमीटर अंतरावर असलेल्या आमगांव बुट्टी हे प्रसिद्ध असे ऐतिहासिक गाव आहे.या गावात सर्व जाती धर्माचे समाजबांधव एकोप्याने राहतात. सर्वजण पारंपारिक सण एकत्र मिळून साजरे करतात. या गावात प्राचीन काळापासून नावाजलेले राम मंदिर अस्तित्वात आहे.मंदिराच्या स्थापनेपासून अर्जुनी- मोरगांव येथील पालीवाल कुटुंबियांचे हे श्रद्धास्थान आहे.या मंदिरात राम,लक्ष्मण,सीता,हनुमान तसेच माता दुर्गाची मूर्ती स्थापना करण्यात आली आहे. दरवर्षी रामनवमीला मोठी जत्रा या ठिकाणी भरते. हजारोंच्या संख्येने श्रद्धाळू भाविक भक्त दर्शन घेण्यासाठी येत असतात.
या ठिकाणी अनेक सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रम घेतले जातात.मात्र,सदर मंदिराच्या ठिकाणी सौंदर्यिकरणाचा अभाव दिसून येतो.त्यामुळे मंदिरात हाईमास्ट लाईट तसेच आकर्षक उद्यान तयार करून आधुनिक सोयी सुविधा उपलब्ध करून सुशोभीकरण केले तर जिल्ह्यासह देश,विदेशातील पर्यटक सुद्धा या ठिकाणी आवर्जून भेटी देऊन रोजगाराच्या संधी निर्माण होऊ शकतात.त्याचप्रमाणे मुक्कामासाठी गेस्ट हाऊस तयार करणे आवश्यक आहे.राम मंदिर परिसराला सौंदर्यिकरणासह पर्यटन स्थळाचा दर्जा दिल्यास इतर राम मंदिरांसारखी प्रसिद्धी मिळून गडचिरोली जिल्ह्याचे नावलौकिक होईल,यासाठी आमगांव बुट्टी येथील राम मंदिराचे सौंदर्यिकरणासह पर्यटन स्थळाचा दर्जा देण्याची मागणी आरमोरी विधानसभा क्षेत्राचे तत्पर जागरूक युवा उमेदवार खेमराज नेवारे यांनी केली आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

माजी सरपंचांनाच प्रशासक म्हणून कायम ठेवण्याची मुख्यमंत्र्यांकडे मागणी..

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र राज्यातील सुमारे १४ हजार २३४ ग्रामपंचायतींवर तत्कालीन सरपंच हे प्रशासक म्हणून नेमण्यात आले होते.अश्यातच माजी सरपंचांच्या सहा महिन्यांच्या काही प्रशासक पदाची...

नागपुरातील ऐतिहासिक ‘मारबत महोत्सव’ आजपासून सुरू..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-राज्याची उपराजधानी असलेल्या नागपूरच्या सांस्कृतिक परंपरेचा अविभाज्य घटक असलेला ऐतिहासिक 'मारबत महोत्सव' आज,रविवार ६ सप्टेंबरपासून सुरू झाला.या वर्षीचा महोत्सव हा १४५...

‘विकसित भारत युवा नेतृत्व संवाद-२०२७’.. गडचिरोली जिल्ह्यातील युवकांना पंतप्रधानांसमोर नेतृत्वगुण,नवकल्पना मांडण्याची संधी..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-भारताला २०४७ पर्यंत विकसित राष्ट्र बनविण्याच्या संकल्पनेत युवाशक्तीचा सक्रिय सहभाग वाढविण्यासाठी ‘विकसित भारत युवा नेतृत्व संवाद -२०२७’ या राष्ट्रीय उपक्रमाला ‘विकसित...

पोलीस अधिकाऱ्यांच्या जाचाला कंटाळून एएसआयची आत्महत्या..

उद्रेक न्युज वृत्त  नवी मुंबई :-काही दिवसांपासून राज्यातील महाराष्ट्र पोलीस प्रशासनात खळबळ उडवून देणाऱ्या घटना उघडकीस येऊ लागल्या आहेत.मागील महिन्याच्या १६ ऑगस्टला नागपूर पोलिस आयुक्त कार्यालयातील...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!