Thursday, April 30, 2026
Homeगडचिरोलीझाडीपट्टी रंगभूमीत मानाचा तुरा... चुडाराम बल्हारपुरे यांच्या "धरती आबा: क्रांतीसुर्य बिरसा...

झाडीपट्टी रंगभूमीत मानाचा तुरा… चुडाराम बल्हारपुरे यांच्या “धरती आबा: क्रांतीसुर्य बिरसा मुंडा” या नाटकास मराठी ग्रंथ संग्रहालय ठाणेचा पुरस्कार जाहीर…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-जगप्रसिद्ध असलेल्या व गेल्या सव्वाशे वर्षांची परंपरा असलेल्या मराठी ग्रंथ संग्रहालय,ठाणे  या संस्थेतर्फे दरवर्षी मराठी साहित्यिकांना त्यांच्या विविध उत्कृष्ट वांड्.मय निर्मीतीसाठी श्रीस्थानक राज्यस्तरीय पुरस्काराने पुरस्कृत करण्यात येते व पुरस्कारप्राप्त साहित्यिकांना नामवंत मराठी साहित्यिकांचे हस्ते सन्मानित करण्यात येते. महाराष्ट्रातील साहित्य क्षेत्रात विशेष मानाचा समजल्या जाणाऱ्या या पुरस्काराकरीता नाट्यवांड्.मय प्रकारात यावर्षी झाडीपट्टीतील नाटककार चुडाराम बल्हारपुरे यांच्या “धरती आबा: क्रांतीसुर्य बिरसा मुंडा” या नाटकास नाट्यलेखनाचे  पारितोषिक जाहीर करण्यात आल्याचे मराठी ग्रंथ संग्रहालय ठाणे येथील कार्यवाह तसेच पुरस्कार समिती सदस्य व साहित्यिक चांगदेव काळे यांनी पत्रकाद्वारे कळविले असून येत्या २० ऑक्टोंबर २०२४ रोजी सायंकाळी ५ वाजता मराठी ग्रंथ संग्रहालय सरस्वती मंदिर,वा.अ.रेगे सभागृह,पहिला माळा,जिल्हा परिषद कार्यालयासमोर,स्टेशन रोड, ठाणे(पश्चिम)येथे होणाऱ्या संस्थेच्या पारितोषिक वितरण कार्यक्रमात हा पुरस्कार सरस्वती पुरस्काराने सन्मानित शरणकुमार लिंबाळे,सुप्रसिद्ध साहित्यिक यांचे हस्ते विविध मान्यवर तथा साहित्यिकांच्या उपस्थितीत प्रदान करण्यात येणार आहे.
 या पुरस्काराचे स्वरूप रोख रक्कम,सन्मानचिन्ह, सन्मान वस्त्र व सन्मानपत्र असे आहे.विशेष म्हणजे या नाटकास यापूर्वी साहित्य सेवा प्रज्ञामंच पुणे यांचा ‘उत्कृष्ट वांड्.मय पुरस्कार-२०२३’  प्राप्त झाले आहे.
 यापुर्वी त्यांच्या “गोंडवानाचा महायोध्दा-क्रांतिवीर बाबूराव शेडमाके” या नाटकास नाट्यलेखनाचे पाच पुरस्कार प्राप्त झाले आहेत.त्यात राधानगरी (जि. कोल्हापूर) येथील ‘गगनगिरी महाराज साहित्य गौरव पुरस्कार- २०२३’, मौजा फलटण (जिल्हा-सातारा येथील धर्मविर संभाजी महाराज उत्कृष्ट साहित्य पुरस्कार-२०२४ व तितिक्षा इंटरनॅशनल,पुणे यांचे तितिक्षा उत्कृष्ट वांड्.मय पुरस्कार-२०२४ झाडीबोली साहित्य मंडळ शाखा गडचिरोली यांचे उत्कृष्ट साहित्य पुरस्कार-२०२४ इत्यादी पुरस्कार प्राप्त झाले आहे.या नाटकांचे आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रयोग सुरू असून नुकत्याच भोपाळ (मध्यप्रदेश) येथे झालेल्या जनयोद्धा राष्ट्रीय समारोहात या नाटकाचा प्रयोग सादर करण्यात आला आहे.
चुडाराम बल्हारपुरे हे झाडीपट्टीतील राज्य पुरस्कार प्राप्त नाटककार आहेत.त्यांना महाराष्ट्र शासनाचे उत्कृष्ट वांड्.मय पुरस्कार प्राप्त झालेले आहे. आजपर्यंत त्यांची विविध १३ पुस्तके प्रकाशित झाली असून विविध स्तरावरील अनेक पुरस्काराने ते सन्मानीत आहेत.महामृत्युंजय मार्कंडेश्वर,महापूजा, बहूढंगी समाधीवाले बाबा,स्पेशल रिपोर्ट,धरती आबा-क्रांतीसुर्य बिरसा मुंडा व गोंडवानाचा महायोध्दा- क्रांतिवीर बाबूराव शेडमाके ही त्यांची गाजलेली नाटके आहेत.
चुडाराम बल्हारपुरे यांच्या या यशाबद्दल प्रा.अरुण बुरे, योगेश गोहणे,प्रा.यादव गहाणे,प्रा.डॉ.श्याम मोहरकर, प्रा.डॉ.जनबंधू,मेश्राम,प्रा.डॉ.योगीराज नगराळे,डॉ. दिपक चौधरी,नाट्यश्रीचे दादा चुधरी,दिलीप मेश्राम,राजेंद्र जरुरकर,दै.लोकमतचे संजय तिपाले,दै.हितवादचे रोहिदास राऊत,दै.देशोन्नतीचे नरेश बावणे,दै.सकाळचे मिलिंद उमरे,दै.पुण्यनगरीचे प्रल्हाद म्हशाखेत्री व प्रमोद गेडेकर,प्रा.नवनीत देशमुख (साहित्यिक),मधुश्री प्रकाशनचे पराग लोणकर (प्रकाशक) व इतर साहित्यिक व कलावंतांनी अभिनंदनासह शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

चक्क चोरट्यांनी खासदारांच्या शेतातील वीज मीटरसह मोटरपंप नेला चोरून.

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-जिल्ह्यात चोरीच्या घटनांनी जोर धरलेला असतांनाच आता थेट लोकप्रतिनिधीही यातून सुटलेले नाहीत.भंडारा-गोंदिया लोकसभा क्षेत्राचे खासदार डॉ.प्रशांत पडोळे यांच्या वडिलोपार्जित शेतातून अज्ञात...

तब्बल २१ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; चंद्रपूर पोलिस अधीक्षक पदाची सूत्रे आता आयुष नोपानी यांच्याकडे..

उद्रेक न्युज वृत्त :-ऐन महाराष्ट्र दिनाच्या पूर्वसंध्येला म्हणजेच आज,गुरुवार ३० एप्रिल रोजी राज्यातील तब्बल २१ आयपीएस अधिकाऱ्यांच्या(भारतीय पोलीस सेवा)बदल्या करण्यात आल्या आहेत.यात चंद्रपूरचे विद्यमान...

“आपण लोकांची कामे करण्यासाठी बसलो आहोत; अडवणूक करण्यासाठी नाही”.. -सहपालकमंत्र्यांकडून अधिकाऱ्यांची कानउघडणी..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे संपूर्ण मॅपिंग करून शासनाने स्वतः त्यांच्या दारात जाऊन गरजेनुसार योजनांचा लाभ द्यावा,अशी भूमिका कृषी राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे सहपालकमंत्री ॲड.आशिष...

अखेर कुरखेडा नगरपंचायत सफाई कामगारांच्या बेमुदत संपावर तोडगा; संप मागे..

उद्रेक न्युज वृत्त  कुरखेडा(गडचिरोली):-कुरखेडा नगरपंचायत अंतर्गत कार्यरत सफाई कामगारांंनी थकीत वेतनाकरीता मागील २३ एप्रीलपासून बेमुदत कामबंद आंदोलन सुरू केले होते.त्यामुळे शहरातील स्वच्छतेचा गंभीर प्रश्न निर्माण...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!