Saturday, April 18, 2026
Homeदेसाईगंजआमदार रामदास मसरामांनी गाजवले हिवाळी अधिवेशन.. - आरमोरी विधानसभा क्षेत्रातील विविध समस्यांचे...

आमदार रामदास मसरामांनी गाजवले हिवाळी अधिवेशन.. – आरमोरी विधानसभा क्षेत्रातील विविध समस्यांचे मुद्दे उपस्थित करून वेधले शासनाचे लक्ष..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
देसाईगंज(गडचिरोली):-आरमोरी विधानसभा क्षेत्राचे नवनिर्वाचित आमदार रामदास मसराम यांनी  नागपूर येथे सुरू असलेल्या विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात गडचिरोली जिल्ह्यासह आरमोरी विधानसभा क्षेत्राअंतर्गत येणाऱ्या आरमोरी,देसाईगंज, कुरखेडा व कोरची तालुक्यातील आरोग्य,शिक्षण, शेतकरी,बेरोजगार तरुण,रस्ते,सिंचन,घरकुल व परिसरातील समस्यांसंदर्भात विविध मुद्दे उपस्थित करून शासनाचे लक्ष वेधले आहे.
नागपूरच्या विधिमंडळ हिवाळी अधिवेशनात आमदार रामदास मसराम म्हणाले की,आरमोरी विधानसभा क्षेत्रामध्ये अनेक शेतकऱ्यांच्या समस्या असून मागील पाच वर्षांपासून शेतकऱ्यांनी शेतीसाठी लागणारी नवीन विद्युत जोडणीसाठी डिमांड भरूनही त्यांना विद्युत वितरण कंपनीतर्फे नव्याने विद्युत जोडणी न देता,सोलर खरेदी करण्यासाठी सांगितले जात आहे; सोलरमुळे शेतीसाठी आवश्यक असणारे पाणी होणार नाही; त्यामुळे शेतकऱ्यांना नुकसानीस सामोरे जावे लागणार असल्याने डिमांड भरलेल्या शेतकऱ्यांना नवीन विद्युत जोडणी देण्यात यावी,जिल्ह्यासह विधानसभा क्षेत्रात हिंस्त्र प्राण्यांचा वावर आहे; वाघ आणि जंगली हत्तींच्या उपद्रवामुळे शेतकरी धास्तावले आहेत.काही दिवसांपूर्वीच शेतावर गेलेल्या गर्भवती महिलेस वाघाने ठार केल्याने शेतावर जाण्यास नागरिक घाबरत आहेत. जंगली हत्ती पिकांची नासधूस करीत असल्याने यांचा बंदोबस्त करण्यात यावा,शहरी भागासह ग्रामीण भागातील रस्त्यांची बिकट अवस्था झाली आहे; त्यामुळे याकडे लक्ष घालवे,शाळेत शिक्षकांचा अभाव असल्याने रिक्त पदे तातडीने भरण्यात यावीत,आरोग्याची समस्या भेडसावत असून उपजिल्हा रुग्णालय,ग्रामीण रुग्णालय,प्राथमिक आरोग्य केंद्रे तसेच उपकेंद्र या ठिकाणी संपूर्ण सोयी-सुविधा उपलब्ध करून द्यावेत, कुरखेडा उपजिल्हा रुग्णालयाचे १०० खाटांचे प्रश्न लवकर मार्गी लावावा,सिंचनाच्या सोयी उपलब्ध करून द्याव्यात,नगर विकासाच्या बाबतीत आरमोरी,देसाईगंज, कुरखेडा,कोरची येथील सिटी सर्व्हे लवकरात लवकर करण्यात यावे,प्रधानमंत्री आवास योजनेचे काही हप्ते थकल्याने घरकुलांचे बांधकाम अर्धवट स्थितीत असून ते पूर्ण करण्यासाठी निधी उपलब्ध करून द्यावा,मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेतील प्रशिक्षणार्थींना विद्यावेतन वेळेवर मिळत नाही.तीन महिन्यांपासून त्यांचे विद्यावेतन रखडलेले आहे.त्यामुळे तात्काळ देण्यात यावे,तसेच प्रशिक्षणार्थींना तत्कालीन मंत्र्यांनी दिलेले आश्वासन पूर्ण करून त्यांना कायमस्वरुपी करण्यात यावे; अशा विविध मागण्या व समस्या निकाली काढणे संदर्भात आरमोरी विधानसभा क्षेत्राचे आमदार रामदास मसराम यांनी यंदाचे हिवाळी अधिवेशन गाजवले आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

उन्हाच्या तडाख्यात कोसळणार अवकाळी पावसाच्या सरी..

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र राज्याच्या विविध भागात उन्हामुळे लाहीलाही होत आहे.सकाळी दहा वाजल्यापासूनच उकाड्याने नागरिक हैराण होऊ लागलेत.अनेक जिल्ह्यांचा पारा दिवसागणिक वाढू लागल्याने दुपारच्या...

वाढत्या उष्णतेपासून स्वतःचा बचाव करण्याचे आवाहन.. – उष्माघाताची लक्षणे आणि उपाययोजना..

उद्रेक न्युज वृत्त  ​गडचिरोली :-जिल्ह्यात सध्या तापमानाचा पारा दिवसेंदिवस वाढत असून,कडक उन्हामुळे उष्माघात (Heat Stroke)होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. ही बाब गांभीर्याने घेत जिल्हा आरोग्य...

सावधान..! प्रधानमंत्री लोन योजनेच्या नावाने बनावट जाहिरातीचा आधार..

उद्रेक न्युज वृत्त :-हल्ली फसवणूक करणाऱ्यांचे नेटवर्क दिवसेंदिवस वाढत चालल्याने नागरिकांनी सतर्क राहणे गरजेचे झाले आहे.कोणत्याही मोठ्या आमिषाला बळी पडण्यापूर्वी माहितीची खातरजमा करणे अत्यंत...

मोहफुले वेचत असतांनाच बिबट्याचा हल्ला.. – जंगलशिवारात छिन्नविच्छिन्न अवस्थेत आढळला मृतदेह..

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-जिल्ह्याच्या तुमसर वनपरिक्षेत्राच्या हरदोली सहवनक्षेत्रातील ३३६ कक्ष क्रमांकाच्या सोनेगाव बीटातील एकमध्ये बिबट्याने मोहफुले वेचत असणाऱ्या महिलेच्या मानेवर हल्ला चढवून ठार केल्याची...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!