Tuesday, July 21, 2026
Homeदेसाईगंजआज देसाईगंज नगरीत राष्ट्रीय प्रबोधनकार गोविंद पोलाड यांच्या भव्य समाज प्रबोधन कार्यक्रमाचे...

आज देसाईगंज नगरीत राष्ट्रीय प्रबोधनकार गोविंद पोलाड यांच्या भव्य समाज प्रबोधन कार्यक्रमाचे आयोजन.. – छ्त्रपती शिवाजी क्लबच्या वतीने दोन दिवसीय शिवजयंती महोत्सव..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
देसाईगंज(गडचिरोली):-रयतेचे राजे शिवछत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती दिनाचे औचित्य साधून दरवर्षी प्रमाणे यंदाही छत्रपती शिवाजी क्लब देसाईगंजच्या वतीने देसाईगंज (वडसा)शहरात आज आणि उद्या दोन दिवसीय भव्य शिवजयंती महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.सदर शिवजयंती महोत्सव सोहळ्यास सहपरिवार उपस्थित राहण्याचे आवाहन देसाईगंज छत्रपती शिवाजी क्लबचे अध्यक्ष,आयोजक तथा ओबीसी संघटनेचे शहराध्यक्ष सागर वाढई यांनी केले आहे.
देसाईगंज शहरात जवळपास गेली दहा वर्षांपासून  विविध सामाजिक,शैक्षणिक तथा सांस्कृतिक पर्यावरण पूरक अशी कामे छत्रपती शिवाजी क्लबच्या माध्यमातून होत आलेली आहेत.आरोग्य क्षेत्रात  मोठ्या प्रमाणात कामे करून जवळपास तीन ते चार हजार रुग्णांना आजपर्यंत रक्ताचा पुरवठा करण्यात आलेला आहे.गेल्या दहा वर्षापासून देसाईगंज शहरात तारखेनुसार सर्व प्रथम शिवजयंती साजरे करणारा छत्रपती शिवाजी क्लब असून ज्यात शिवजयंती वैचारिक प्रबोधनाच्या माध्यमातून साजरी केली जाते. पावसाळ्यामध्ये पर्यावरणापूरक जसे,की वृक्षारोपण करणे पद्धतीचे कार्यक्रम होत असतात.मागील कोरोना कालखंडात शैक्षणिक कार्यक्रम,मोफत गरीब व गरजू मुलांसाठी ट्युशन क्लासेस अशा पद्धतीचे  कार्यक्रम वर्षभर छत्रपती शिवाजी क्लबच्या माध्यमातून सुरू असतात.छत्रपती शिवाजी क्लबचे कार्य हे वाखाणण्याजोगे आहे.यंदाही देसाईगंज छत्रपती शिवाजी क्लब येथील सर्वांच्या सहकार्याने आज,मंगळवार १८ फेब्रुवारी ते उद्या १९ फेब्रुवारी २०२५ रोजी शिवजयंती महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.आज,मंगळवारी सायंकाळी ७.३० वाजेच्या सुमारास शहराच्या राजेंद्र वॉर्ड येथील समाज भवनाच्या भव्य आवारात छत्रपती शिवाजी शिवाजी महाराजांवर आधारित राष्ट्रीय प्रबोधनकार गोविंद पोलाड यांच्या भव्य समाज प्रबोधन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. सदर कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून आरमोरी विधानसभा क्षेत्राचे आमदार रामदास मसराम, सहउद्घाटक माजी पंचायत समिती सभापती परसराम टिकले,कार्यक्रमाचे अध्यक्ष दामोधर शिंगाडे तर दीप प्रज्वलन वनक्षेत्र सहाय्यक रमेश घुटके यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.सदर कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
त्याचप्रमाणे उद्या बुधवार १९ फेब्रुवारीला सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास शहरातील आरमोरी मार्ग, देसाईगंज पोलीस स्टेशन समोरून छत्रपती शिवाजी महाराजांची भव्य-दिव्य मिरवणूक व पालखी निघणार आहे.सदर मिरवणुकीचे दीप प्रज्वलन आरमोरी विधानसभा क्षेत्राचे आमदार रामदास मसराम यांच्या वतीने करण्यात येणार आहे.मिरवणुकीमध्ये विशेष आकर्षण म्हणून गोंडी नृत्य,शिवकालीन आखाडा,लेझीम पथक व डिजे सेटप यांचे आयोजन करण्यात आले आहे.सदर महोत्सवात सहपरिवार सहभागी होऊन कार्यक्रमाची शोभा वाढवावी; असे छत्रपती शिवाजी क्लब देसाईगंज (वडसा) यांच्या वतीने आवाहन करण्यात आले आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

आंधळी येथे मोफत नेत्रसेवा शिबिर संपन्न; ११७ जणांची तपासणी,तर ३२ रुग्णांवर होणार मोफत शस्त्रक्रिया..

उद्रेक न्युज वृत्त  कुरखेडा(गडचिरोली):-ग्रामीण भागातील नागरिकांना दर्जेदार नेत्रसेवा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने महात्मे आय बँक हॉस्पिटल नागपूर,समता फाउंडेशन मुंबई,आधार ग्रामीण विकास संस्था आंधळी आणि गट...

सोनम वांगचुक समर्थनाथ कुरखेड्यात रिपाईच्या वतीने निदर्शने व निवेदन सादर..

उद्रेक न्युज वृत्त  कुरखेडा(गडचिरोली):-परीक्षांच्या नावाखाली विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळ करणे सुरू झाले आहे. रात्रंदिवस मेहनत घेऊन परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना काही दिवसांतच कळतेय की अगोदरच पेपरची कॉपी...

डीएपी खताच्या जागतिक पुरवठा साखळीवर परिणाम; शेतकऱ्यांनी पिकांच्या गरजेनुसार पर्यायी खतांचा वापर करण्याचे आवाहन.. -प्रत्यक्ष खताच्या गोणीवरील छापील किंमत पाहूनच खत खरेदी करावे..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-डीएपी खताच्या जागतिक पुरवठा साखळीवर परिणाम झाल्याने राज्यासह गडचिरोली जिल्ह्यातही डीएपी खताचा पुरवठा अपेक्षेप्रमाणे होत नसल्याने शेतकऱ्यांनी पिकांच्या गरजेनुसार पर्यायी खतांचा...

नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन..पुढील चोवीस तास महत्वाचे; चार जिल्ह्यात अतिवृष्टीचा इशारा..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-महाराष्ट्र राज्यातील विविध भागात पावसाने जोरदार हजेरी लावल्याचे चित्र आहे. हवामान विभागाने नुकतेच १९ जुलै ते २३ जुलै दरम्यान पाच दिवसांसाठी जोरदार...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!