Saturday, May 2, 2026
Homeदेसाईगंजअन् सरपंच म्हणू लागले; 'पावसाळ्यामुळे जंतू असू शकतात'..! - ऊसेगावात आढळला पिण्याच्या...

अन् सरपंच म्हणू लागले; ‘पावसाळ्यामुळे जंतू असू शकतात’..! – ऊसेगावात आढळला पिण्याच्या पाण्यात नारू सदृश्य जंतू; शिवराजपूर गट ग्रामपंचायतीतील प्रकार..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
देसाईगंज(गडचिरोली):-गडचिरोली जिल्ह्याच्या
मुलचेरा तालुक्यात डेंग्यूचा उद्रेक सुरू असून आतापर्यंत ६ ऑगस्ट ते १५ ऑगस्ट दरम्यानच्या कालावधीत तब्बल पाच जणांचा मृत्यू झाला आहे.यामध्ये निष्काळजीपणाचा ठपका ठेऊन दोन डॉक्टर व दोन आरोग्य सहाय्यकांवर कारवाई करण्यात आली आहे.सध्या स्थितीत डेंग्यूचा प्रकोप असलेल्या भागात आरोग्य विभागाची एकूण २९ पथके तैनात केली आहेत.डेंग्यूच्या एकूण ६९० चाचण्या करण्यात आल्या असून त्यापैकी तापाचे २११ तर डेंग्यूचे ११८ रुग्ण आढळले आहेत.सध्या २८ जणांवर उपचार सुरु आहेत.अश्यातच जिल्ह्यात डेंग्यूने थैमान घातले असतांनाच देसाईगंज तालुक्याच्या शिवराजपूर गट ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या ऊसेगाव येथील पिण्याच्या पाण्यात नारू सदृश्य जंतू आढळून आल्याने गावात एकच खळबळ उडाली.त्यातच पिण्याच्या पाण्यात ‘पावसाळ्यामुळे जंतू असू शकतात’ असे मिश्किलपणे सरपंचांनी उत्तर दिल्याने सर्वजण अवाक् होऊन दिलेल्या उत्तरात प्रश्न पाहू लागलेत.यामुळे गावातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.
देसाईगंज तालुका मुख्यालयापासून सहा किलोमीटर अंतरावर शिवराजपूर गट ग्रामपंचायत आहे.यामध्ये शिवराजपूर,ऊसेगाव व फरी गावांचा समावेश होतो. सदर ग्रामपंचायतीत मागील वर्षात जल जीवन मिशन योजने अंतर्गत ग्रामस्थांना पिण्याच्या पाण्यासाठी कोट्यवधी रुपयांची पाणी पुरवठा योजना सुरू करण्यात आली आणि ‘हर घर जल’ च्या माध्यमातून ग्रामपंचायतीतर्फे गावकऱ्यांना नळाद्वारे पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्यात येत आहे.त्यातच काल,शनिवार १६ ऑगस्ट रोजी ऊसेगाव येथील अजय नेवारे यांच्या कुटुंबातील सदस्य सायंकाळच्या सुमारास नळाद्वारे पिण्याचे पाणी भरत असतांनाच पाण्यात नारू सदृश्य जंतू आढळून आल्याने एकच खळबळ माजली.त्यानुसार ग्रामस्थांनी एकच गर्दी करून याबाबत ग्रामपंचायत प्रशासनास कळवले. अश्यातच जेव्हापासून पिण्याच्या पाण्याच्या टाकीचे बांधकाम झाले तेव्हापासून टाकीची सफाईच करण्यात आली नसल्याचे गावकऱ्यांचे म्हणणे असून सदरच्या प्रकारामुळे गावकऱ्यांनी ग्रामपंचायत प्रशासनाप्रती रोष व्यक्त केला आहे.
  • सुषमा सयाम,सरपंचा शिवराजपूर गट ग्रामपंचायत👇
पावसाळा असल्यामुळे जंतू अशू शकतात,आमचे कर्मचारी नियमित ब्लिचिंग पावडर टाकून पाण्याच्या टाकीची साफ-सफाई करतात.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

येत्या शैक्षणिक वर्षापासून विद्यार्थ्यांच्या नावात आईचे नाव अनिवार्य..

उद्रेक न्युज वृत्त :-आईच्या योगदानाला विशेष सन्मान देण्यासाठी,लिंग समानतेला प्रोत्साहन देण्यासाठी आणि सामाजिक समतोल राखण्यासाठी आता महाराष्ट्र राज्यातील शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या ओळखीच्या पद्धतीत महत्त्वपूर्ण बदल...

सहपालकमंत्र्यांच्या हस्ते बचत गटाच्या सहा महिला प्रभागसंघांना फिरत्या रेस्टॉरंटचे वितरण..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील ग्रामीण महिलांच्या उत्पन्नात वाढ करून त्यांना सन्मानाने जगण्यासाठी 'उमेद' अभियान आणि जिल्हा प्रशासनाने एक अभिनव पाऊल उचलले आहे.महाराष्ट्र दिनाचे औचित्य...

माय-लेकीने राहत्या घरीच घेतला गळफास..!

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-बाळ जन्माला येताच मृत पावल्याने धक्क्यातून सावरण्यासाठी आईकडे राहायला गेलेल्या मुलीने आणि तिच्या आईने राहत्या घरीच गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना...

मोठा अनर्थ टळला; चक्क धावत्या बसचे चाक निघाल्याने प्रवाशांमध्ये खळबळ..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-कधीकाळी धावती बस अचानकपणे बंद पडते, तर कधी गाडीच्या वरचा छप्परच उडून जातो.पावसात तर काही बसेसमध्ये चक्क छतावरून पाणी गळायला लागतो.अश्या...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!