- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
भंडारा :-काहीजण अल्पवयीन मुलींचे शोषण करून तिला खाईत ढकलून शारीरिक,मानसिक व इतर त्रास देण्याचे काम करत आहेत.मात्र,कायद्याच्या पुढे कुणाचेही चालत नसते.असाच प्रकार सात वर्षांपूर्वी घडला होता व घटनेच्या वेळी अल्पवयीन असलेल्या एका १६ वर्षीय तरुणीला न्यायालयाने अलीकडेच दिलेल्या निकालात तब्बल सात वर्षानंतर न्याय मिळाला आहे.प्रकरणी आरोपी तरुणाला एका गुन्ह्यात १२ व दुसऱ्या गुन्ह्यात १२ तर अन्य एका गुन्ह्यात ३ वर्ष सश्रम कारावासासह दंडाची शिक्षा सुनावली आहे.म्हणजेच एकूण २७ वर्षे कारावासासह दंडाची शिक्षा सुनावण्यात आली आहे.
सदर प्रकरण असे की,१६ वर्षीय मुलगी बेपत्ता असल्याची तक्रार तिच्या पालकांनी पालांदूर पोलिसात १४ मे २०१८ रोजी दिली होती.त्यानुसार सुरुवातीला पोलिसांनी भादंवि कलम ३६३ चा गुन्हा दाखल केला होता.पोलिसांनी तिचा शोध घेतल्यावर चौकशी केली असता,धीरज संतोष झिंगरे वय २६ वर्षे, पालांदूर या तरुणाने आपल्याला लग्नाचे वारंवार आमिष दाखवून शारीरिक संबंध प्रस्थापित केल्याची तक्रार नोंदविली होती.त्यातून आपण गर्भवती झाल्याचे तरुणीने सांगितले होते.त्यामुळे पोलिसांनी विविध कलम लावून कलम ३७६ (१), (३) आणि सहकलम (४),(५),(एल),(जे),(२),६ अंतर्गत पोक्सोचे कलम लावून गुन्हा दाखल केला होता.या प्रकरणी जिल्हा सत्र न्यायाधीश राजेश अस्मार यांनी दिलेल्या निकालात धीरज झिंगरे याला कलम ३६३ नुसार तीन वर्षे सश्रम कारावास व पाच हजार रुपयांचा दंड तसेच ३७६ कलम अंतर्गत १२ वर्षे सश्रम करावा २० हजार रुपये दंड आणि पोक्सो कलमांतर्गत १२ वर्षे सश्रम कारावास व वीस हजार रुपयांचा दंड अशी शिक्षा सुनावली आहे.प्रेमसंबंधातून जन्मलेले बाळ सध्या तरुणीकडे असून,ती आपल्या आई-वडिलांकडे राहत आहे.घटनेला ७ वर्ष लोटले असून,सध्या हे बाळ सहा वर्षांचे आहे.
- Advertisement -

