Wednesday, August 19, 2026
Homeनागपूरबकरीचा चारा तोडण्यासाठी झाडावर चढला अन् चिकटूनच राहिला; १५ वर्षीय बालकाचा दुर्दैवी...

बकरीचा चारा तोडण्यासाठी झाडावर चढला अन् चिकटूनच राहिला; १५ वर्षीय बालकाचा दुर्दैवी मृत्यू..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
नागपूर :-गाव खेड्यांमध्ये शेळ्या,बकऱ्या व इतर पशुंसाठी गावनजिक परिसरातील चारा म्हणजेच झाडाच्या डारा तोडून आणल्या जातात वा गुराखी गुरे चराईसाठी जंगल परिसरात नेत असतात.अशातच शहरी भागात अश्या प्रकारच्या सुविधा उपलब्ध नसल्याने परिसरातीलच वृक्षाचा पाला तोडत असतात.अशातच एक १५ वर्षीय बालक बकरीसाठी चारा तोडण्यासाठी झाडावर चढला असता बालकाचा विजेच्या तारांशी संपर्क आल्यामुळे झाडावरच चिकटूनच राहिला आणि त्याचा मृत्यू झाल्याची घटना यशोधरानगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत ऑटोमोटिव्ह चौकाजवळील पंतप्रधान आवास योजना इमारतीजवळ सकाळी ८ वाजताच्या सुमारास घडली.हिदायतुल्ला हामिद हुसैन शेख वय १५ वर्षे,रा.लाल झेंडा चौक,नागपूर असे विजेच्या धक्क्याने मृत्यू झालेल्या बालकाचे नाव आहे.हिदायतुल्ला शेख सकाळी बकऱ्यांना चारा तोडण्यासाठी तोडण्यासाठी झाडावर चढला.या झाडाला लागूनच विजेच्या तारा होत्या.झाडाची डार तोडत असतांना तो विजेच्या तारांच्या संपर्कात आला.त्याला विजेचा तीव्र धक्का लागला आणि झाडावरच त्याचा मृत्यू होऊन तो तेथेच अडकला.घटनेची माहिती मिळताच यशोधरानगर पोलिसांनी घटनास्थळी जाऊन अग्निशमन दल आणि वीज कर्मचाऱ्यांना बोलावले.त्यानंतर बालकाला झाडावरून खाली उतरवून उपचारासाठी मेयो रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी त्याला तपासून मृत घोषित केले.बालकाचे वडील हामिद हुसैन शेख यांच्या सूचनेवरून यशोधरानगर पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

देसाईगंज एमएसडब्ल्यूच्या विद्यार्थ्यांना विविध संस्था भेटीतून सामाजिक कार्याचे मोलाचे मार्गदर्शन..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-देसाईगंज अनिकेत समाजकार्य महाविद्यालयाच्या वतीने नुकतेच एम.एस.डब्ल्यू.(समाजकार्य पदव्युत्तर पदवी) अभ्यासक्रमाच्या १२० पेक्षा अधिक विद्यार्थ्यांसाठी विविध सामाजिक संस्थांना संस्था भेटीचे आयोजन करण्यात आले.या भेटीदरम्यान...

विजेचा जोरदार शॉक; दोन भावांचा दुर्दैवी मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त पुणे :-घराजवळ असणाऱ्या जनावरांच्या गोठ्याजवळ विजेचा जोरदार शॉक लागून दोन सख्ख्या चुलत भावांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना आज,बुधवार १९ ऑगस्ट रोजी सकाळी...

खुद्द पत्नीनेच प्रियकर दिराच्या मदतीने पतीचा काढला काटा.. -अनैतिक संबंधाचा बिन भाड्याच्या खोलीत ‘दी एंड’..

उद्रेक न्युज वृत्त  वर्धा :-अनैतिक संबंधात आडकाठी येणाऱ्या पतीचा खुद्द पत्नीनेच प्रियकर चुलत दिराच्या मदतीने काटा काढल्याची घटना वर्धा जिल्ह्याच्या हिंगणघाट तालुक्यातील वडनेर पोलिस ठाण्याच्या...

विद्यमान आमदारांच्या पीए व वाहनचालकांच्या मानधनात वाढ..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-राज्याच्या विधानसभा आणि विधान परिषदेच्या विद्यमान आमदारांचे स्वीय सहाय्यक म्हणजेच पीए आणि वाहनचालकांच्या मानधनात दहा हजार रुपयांची वाढ करण्यात आली आहे.सदरची...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!