Sunday, April 19, 2026
Homeगडचिरोलीसाहेब..! नागपूर,गोंदियासह गडचिरोली जिल्ह्यातील शिक्षक घोटाळ्याची चौकशी करा- कैलास बगमारे - बोगस...

साहेब..! नागपूर,गोंदियासह गडचिरोली जिल्ह्यातील शिक्षक घोटाळ्याची चौकशी करा- कैलास बगमारे – बोगस अल्पसंख्याक व बोगस शालार्थ आयडी प्रकरणी नागपूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-शिक्षण उपसंचालक कार्यालयातील बोगस शिक्षक भरतीचा प्रकार चव्हाट्यावर आला होता.या प्रकरणात शिक्षण विभागातील उपसंचालक उल्हास नरड यांच्यासह काही अधिकारी,कर्मचाऱ्यांना अटक करण्यात आली होती.यात गोंदिया जिल्ह्यातील एक शिक्षक व एका संस्थेचा संचालक अशा दोघांचा समावेश आहे. बोगस शिक्षक भरतीत गोंदिया जिल्ह्यात धागेदोरे व अटक करण्यात आलेल्या म्हैसकर याने काय-काय केले?त्याच्या तपासणीसाठी हे पथक गोंदियात दाखल झाले होते.नागपूर येथील पोलिस उपायुक्त-२ यांचे पथक शुक्रवारी ९ मे रोजी दुपारी गोंदियाच्या शिक्षण विभागात दाखल झाले. दरम्यान,दुपारी ४ वाजेपासून त्यांनी चौकशी केली. बनावट मान्यतापत्र व आयडीवरून शिक्षक भरती करून शासनाची फसवणूक करण्यात आली.गोंदिया जिल्ह्यातील एका शाळेचा शिक्षक म्हैसकर व एका संचालकाला अटक करण्यात आली. म्हैसकर हा बनावट मान्यतापत्र तयार करून देत होता. चौकशीदरम्यान भरतीसाठी वापरण्यात आलेले बनावट मान्यतापत्र तपासण्यासाठी पोलिस उपायुक्तांचे पथक गोंदिया येथे दाखल झाले होते. शासनाची शिक्षक भरती बंद असतांना गोंदियात बोगस शिक्षक भरती करण्यात आली.या बोगस भरती प्रकरणाची चौकशी करण्यासाठी पोलिस उपायुक्तांचे पथक माध्यमिक शिक्षण विभागात दाखल झाले होते.माध्यमिक शिक्षणाधिकारी डॉ.महेंद्र गजभिये,अधीक्षक नरेंद्र भगत यांच्याकडून संबंधित पत्रासंदर्भात माहिती जाणून घेतली.अशातच आता गडचिरोली जिल्ह्यातील विश्वशांती विधालय कुनघाडा (रै) व विश्वशांती विद्यालय भेंडाळा ता.चामोर्शी जि.गडचिरोली येथील बोगस अल्पसंख्याक पत्राच्या आधारे संस्थापक व इतर कर्मचाऱ्यांनी संगनमत करून बोगस शालार्थ आयडी बनविली या तपासात अडथळा येऊ नये,यासाठी संबंधितांना ताब्यात घेतल्यास मोठा घोटाळा उघडकीस आल्याशिवाय राहणार नाही,करीता नागपूर,गोंदियासह गडचिरोली जिल्ह्यातील शिक्षक घोटाळ्याची चौकशी करून संबंधितांवर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीची तक्रार भाजपाचे गडचिरोली पंचायत राज ग्रामविकास जिल्हा सहसंयोजक कैलास जे.बगमारे यांनी नागपूरचे फुटाळा रोडवरील सदर पोलीस स्टेशनला पत्रानिशी दाखल केली आहे.त्यामुळे येत्या पुढील काळात शिक्षक भरती घोटाळ्यात गडचिरोली जिल्ह्याचे नंबर लागण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

विद्यार्थ्यांची सुरक्षितता महत्त्वाची; सर्व शैक्षणिक संस्था सकाळच्या सत्रात सुरू ठेवण्याचे निर्देश..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-दिवसेंदिवस उष्णतेची तीव्रता वाढत असल्याने शाळा व महाविद्यालयात जाणाऱ्या विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.अश्यातच चंद्रपूर जिल्ह्यात उन्हाची...

चहा बनवण्यासाठी गॅस पेटवणार तितक्याच उडाला भडका; पतीचा मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-स्वयंपाकघरातील गॅस लिकेज असल्याने चहा बनवण्यासाठी गॅस पेटवणार तितक्याच आगीचा अचानकपणे भडका उडाला आणि काही क्षणातच सिलिंडरचा जोरदार स्फोट झाला.दरम्यान,संपूर्ण घरात...

वाहनधारकांसाठी दिलासा; गडचिरोली शहरातील ट्रॅफिक सिग्नल काही वेळासाठी राहणार बंद..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-विदर्भातीलच नव्हे तर राज्याच्या विविध जिल्ह्यात उकाड्याने नागरिक हैराण झाले आहेत. सकाळपासूनच उन्हाची तीव्रता वाढत चालल्याने जीवाची लाहीलाही होत आहे.अश्यातच शहरातील महत्त्वाच्या...

उष्णतेची तीव्रता; प्रखर उन्हामुळे शेतातच पडली बेशुद्ध.. – शेतकरी महिलेचा मृत्यू; नागरिकांनी विशेष खबरदारी घेण्याचे आवाहन..

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र राज्याच्या विविध भागात उष्णतेचा पारा चढल्याने आरोग्य विभागासह प्रशासन सतर्क झाले आहे.त्यातच,नागरिकांना विशेष खबरदारी घेण्याचे आवाहन करत आहे.विशेष म्हणजे,दुपारी १२...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!