Wednesday, August 19, 2026
Homeगडचिरोलीकुरखेडाच्या देऊळगाव खरेदी केंद्रातील धान अपहार प्रकरणी पाच आरोपी अटकेत.. -आता...

कुरखेडाच्या देऊळगाव खरेदी केंद्रातील धान अपहार प्रकरणी पाच आरोपी अटकेत.. -आता अटकेतील आरोपींची संख्या झाली सात..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-जिल्ह्यातील कुरखेडा तालुका अंतर्गत येणाऱ्या देऊळगाव खरेदी केंद्रात उघडकीस आलेल्या धान अपहार प्रकरणात मोठी कारवाई करण्यात आली आहे.आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्था देऊळगाव येथे पणन हंगाम २०२३-२४ व हंगाम २०२४-२५ मध्ये आधारभूत खरेदी योजनेअंतर्गत धान खरेदी करण्यात आला होता.परंतु साठा पुस्तकानुसार व प्रत्यक्ष शिल्लक धान यात प्रथम दर्शनी तफावत आढळल्यामुळे शिल्लक धानाची मोजणी व्यवस्थापकीय संचालक नाशिक यांच्या आदेशानुसार करण्यात आली.त्या मोजणीत दोन्ही हंगामात १०,०८४.०८ क्विंटल धान कमी आढळून आल्याने गडचिरोलीचे जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत आरोपींवर कारवाई करण्याचे निर्देश दिले होते.त्यामुळे आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्था  देऊळगावचे सचिव,संचालक तसेच संबंधित अधिकारी व कर्मचारी अशा एकूण १७ जणांविरुद्ध कुरखेडा पोलीस ठाण्यात शुक्रवार १८ एप्रिल २०२५ रोजी भारतीय न्याय संहितेच्या कलम ३१६ (५),३१८ (४),३(५) अन्वये रात्री उशिरा पर्यंत गुन्हा दाखल करण्यात आला होता.त्यानुसार देऊळगाव खरेदी केंद्राचे प्रभारी विपणन निरीक्षक चंद्रकांत कासारकर व हितेश पेंदाम यांना याआधीच अटक करण्यात आली होती.अशातच आता आणखी ५ संचालकांना कुरखेडा पोलिसांनी अटक केली आहे.आणखी ५ जणांना अटक केल्याने आता अटकेतील आरोपींची संख्या सात झाली आहे.पोलिसांकडून अटक करण्यात आलेल्यांमध्ये संस्थेचे अध्यक्ष पतिराम कोकोडे,उपाध्यक्ष पंढरी दादगाये आणि संचालक मंडळाचे सदस्य भाऊराव कवाडकर, नुसाराम कोकोडे आणि भीमराव शेंडे यांचा समावेश आहे.घोटाळ्यातील मुख्य आरोपी कुरखेडा उप प्रादेशिक व्यवस्थापक मुरलीधर बावणे आणि संस्थेचा व्यवस्थापक महेंद्र मेश्राम यांच्यासह १० आरोपी अद्यापही फरार आहेत. फरार आरोपींचा शोध पोलिसांकडून घेतला जात असून प्रकरणाचा पुढील तपास कुरखेडा पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक महेंद्र वाघ करीत आहेत.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

विजेचा जोरदार शॉक; दोन भावांचा दुर्दैवी मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त पुणे :-घराजवळ असणाऱ्या जनावरांच्या गोठ्याजवळ विजेचा जोरदार शॉक लागून दोन सख्ख्या चुलत भावांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना आज,बुधवार १९ ऑगस्ट रोजी सकाळी...

खुद्द पत्नीनेच प्रियकर दिराच्या मदतीने पतीचा काढला काटा.. -अनैतिक संबंधाचा बिन भाड्याच्या खोलीत ‘दी एंड’..

उद्रेक न्युज वृत्त  वर्धा :-अनैतिक संबंधात आडकाठी येणाऱ्या पतीचा खुद्द पत्नीनेच प्रियकर चुलत दिराच्या मदतीने काटा काढल्याची घटना वर्धा जिल्ह्याच्या हिंगणघाट तालुक्यातील वडनेर पोलिस ठाण्याच्या...

विद्यमान आमदारांच्या पीए व वाहनचालकांच्या मानधनात वाढ..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-राज्याच्या विधानसभा आणि विधान परिषदेच्या विद्यमान आमदारांचे स्वीय सहाय्यक म्हणजेच पीए आणि वाहनचालकांच्या मानधनात दहा हजार रुपयांची वाढ करण्यात आली आहे.सदरची...

सावधगिरी बाळगा..! नागरिकांनी कोणत्याही अनोळखी लोन किंवा ट्रेडिंग ॲपवर विश्वास ठेवू नये..

उद्रेक न्युज वृत्त :-अल्पावधीत ट्रेडिंगच्या माध्यमातून लखपती करण्याचे तसेच तात्काळ कर्ज देण्याचे आमिष दाखवून अनधिकृत डिजिटल लेंडिंग ॲप्स आणि संशयास्पद कंपन्यांकडून नागरिकांची आर्थिक फसवणूक...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!