उद्रेक न्युज वृत्त
देसाईगंज :-शासन स्तरावरून विविध प्रकारच्या योजना शौचालय बांधकामासाठी आखल्या जातात.लाखो व कोट्यवधी रुपये या योजनांवर खर्च केल्या जाते.जेणेकरून कुणीही उघड्यावर शौचास बसु नये.यामध्ये रोजगार हमी योजने अंतर्गत सुरुवातीपासूनच शौचालय बांधकामे हाती घेण्यात आली तसेच हल्ली स्वच्छ भारत मिशनच्या माध्यमातून घरोघरी शौचालय बांधकामे ज्यांच्याकडे शौचालय नाही अशांना शौचालये बांधुन देण्यात आले.
तरीसुध्दा देसाईगंज तालुक्यातील नव्हे तर इतरही तालुक्यातील ग्रामीण भागातील तरुण मंडळी,वयोवृद्ध,स्त्रीया,पुरुष मंडळी व लहाण्यांपासून तर थोरांपर्यंतची मंडळी घरी शौचालय असूनही उघड्यावर शौचास जातात.कित्तेक ग्रामपंचायतीला जिल्हा परिषदे कडून स्वच्छ व हागणदारीमुक्त गाव म्हणून गौरविले गेले आहे.तरी उघड्यावर शौचास बसणार्ऱ्यांचे प्रमाण वाढलेले दिसून येते.
सकाळच्या सुमारास पहाटे व रात्रोच्या सुमारास एकास सोबत घेऊन वा गट तयार करून व हातात डब्बा घेऊन,गावातील बाह्य रस्त्यांवर व मुख्य रस्त्यांवर शौचास करणाऱ्यांचे प्रमाण वाढलेले आहे.ग्रामपंचायती अंतर्गत दंडात्मक कारवाईचे त्या ठिकाणी भले मोठे फलक लावले गेले असूनही,त्याला न जुमानता उघड्यावर शौचास बसले जात आहे.
यासाठी कुणीही उघड्यावर शौचास बसणार नाही याकरिता ग्रामपंचायत पदाधिकारीच नाही तर गावकऱ्यांनी मिळून ठोस पावले उचलणे गरजेचे आहे जेणेकरून डब्बा पार्टीला आळा बसेल आणि स्वच्छ व हागणदारी मुक्त गाव होण्यास मदत होईल.