Wednesday, August 26, 2026
Homeकोंढाळाकोंढाळा जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेत ७४ वा प्रजासत्ताक दिन साजरा -...

कोंढाळा जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेत ७४ वा प्रजासत्ताक दिन साजरा – शाळेत विविध कार्यक्रमांचे सादरीकरण; चिमुकल्यांनी जिंकली गावकऱ्यांची मने

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त

कोंढाळा :- देसाईगंज तालुक्यातील कोंढाळा येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेत आज २६ जानेवारी २०२३ रोजी ७४ वा प्रजासत्ताक दिन विविध कार्यक्रमांनी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.कार्यक्रम सादरीकरणात चिमुकल्या विध्यार्थी-विद्यार्थिनींनी गावकऱ्यांची मने जिंकून गावकऱ्यांचा आनंद द्विगुणित केला.

प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून सकाळच्या सुमारास शाळेतील ध्वजारोहणानंतर आंबेडकर चौकातील डॉ.बाबा साहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस माल्यार्पण व जयघोष करण्यात आला.त्यानंतर ग्रामपंचायत कार्यालय व गावातील ध्वजारोहण करून ९ वाजेच्या सुमारास जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेत सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.यामध्ये विद्यार्थ्यांचे इंग्रजीतील संभाषण,देशभक्तीपर नृत्य,वृक्ष संवर्धन,कवायती,लेझीमचे सादरीकरण,डंबल्स सादरीकरण,फुग्यांचे कोंबडे बाजार व इतर कार्यक्रम सादर करून विद्यार्थी-विद्यार्थिनींनी गावकऱ्यांची मने जिंकली.

जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा कोंढाळा नेहमीच विद्यार्थ्यांच्या सुप्त कला गुणांना वाव मिळावा व त्यांच्यातील कलारुपी शिक्षण बाहेर पडावे यासाठी प्रयत्नशील कार्ये करीत असतात.शाळेतर्फे शाळा बाहेरची शाळा उपक्रम,फुलोरा उपक्रम,ई-लर्निंग व इतर उपक्रम उत्कृष्टरित्या राबविण्यात येत आहेत.

प्रजासत्ताक दिनी गावातील प्रतिष्ठित नागरिक, गावकरी मोठ्या संख्येने एकत्र येऊन ध्वजारोहणास उपस्थित होते.ध्वजारोहण व शाळेतील कार्यक्रमाप्रसंगी ग्रामपंचायतीच्या सरपंचा अपर्णा नितीन राऊत,उपसरपंच गजानन सेलोटे,वन व्यवस्थापन समिती अध्यक्ष नितीन राऊत,तंटामुक्ती अध्यक्ष हरिभाऊ पत्रे,शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष शेषराव नागमोती,माजी सरपंच कैलास राणे,पोलीस पाटील किरणताई कुंभलवार,सामाजिक कार्यकर्ते अरुण कुंभलवार,तंटामुक्त समिती उपाध्यक्ष भाऊराव पत्रे,माजी अध्यक्ष शाळा व्यवस्थापन समिती राजेंद्र शेंडे,राजेश मेश्राम,सुनील पारधी,पंढरी नखाते,माजी सरपंचा मंगलाताई शेंडे, ग्रामपंचायतीतील सर्व सदस्य गण,शाळा व्यवस्थापन समिती सर्व सदस्य गण,शाळेतील मुख्याध्यापक अनिल मूलकलवार,शिक्षक संतोष टेंभूर्णे,लालचंद धाबेकर,सुरेश आदे,शिक्षिका माधुरी रामगुंडे,रेखा चौधरी,रजनी जांभुळकर,शिल्पा सातेवार,भिमाताई ठवरे,निरुपारा देशपांडे,ग्रामपंचायत कर्मचारी, गावकरी,सामाजिक कार्यकर्ते व प्रतिष्ठित नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

आरोग्य सेवक व वरिष्ठ लिपिक एसीबीच्या जाळ्यात..

उद्रेक न्युज वृत्त  गोंदिया :-जिल्हा हिवताप कार्यालयातील आरोग्य सेवक व वरिष्ठ लिपिकाने नक्षल प्रोत्साहन भत्त्याचे एरियस बिल काढण्यासाठी लाचेची मागणी केल्याप्रकरणी गोंदियाच्या लाच लुचपत प्रतिबंधक...

मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षणाचा सुधारित कार्यक्रम जाहीर..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-भारत निवडणूक आयोगाने मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण-२०२६(Special Intensive Revision-SIR)कार्यक्रमात सुधारणा केली असून,सुधारित वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे.त्यानुसार,येत्या ३१ ऑगस्ट २०२६...

राज्यातील सर्व शासकिय,खाजगी व धर्मादाय रुग्णालयांचे फायर ऑडिटसह संबंधित यंत्रणांचे ऑडिट करण्याचे निर्देश..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-राज्यातील नागरिकांना सुरक्षित आणि दर्जेदार आरोग्य सेवा उपलब्ध करून देतांना रुग्णालयांची सुरक्षा प्राधान्याची बाब आहे.राज्यातील सर्व शासकीय,खासगी व धर्मदाय आरोग्य संस्थांमधील...

५ टक्के दिव्यांग कल्याण निधीचा शंभर टक्के विनियोग करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश.. – नगरपरिषद व नगरपंचायत स्तरावर दिव्यांग कल्याणासाठी राखीव निधी..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील दिव्यांग व्यक्तींसाठी शासनामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध कल्याणकारी योजनांचा लाभ पात्र लाभार्थ्यांपर्यंत वेळेत पोहोचवावा. प्रलंबित UDID नोंदणी व वैद्यकीय तपासणी प्रक्रिया...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!