Saturday, April 18, 2026
Homeचंद्रपूरसावधान..! 'मी जिओ केअर सेंटर मुंबई वरून बोलत असून,तुमची सिम व्हेरिफाय...

सावधान..! ‘मी जिओ केअर सेंटर मुंबई वरून बोलत असून,तुमची सिम व्हेरिफाय होणार आहे; त्यासाठी तुमचे सिम बंद करण्यात येईल’ असे म्हणीत ३ लाखावर डल्ला…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
चंद्रपूर :-सिम व्हेरीफिकेशनच्या नावाने सायबर चोरट्याने गडचिरोली जिल्ह्याच्या नवतळा येथील इसमास ३ लाख २२ हजार ९३४ रुपयांना गंडा घातल्याचा प्रकार तीन दिवसांपूर्वी म्हणजेच सोमवारी ९ डिसेंबरला उघडकीस आला आहे.प्रकरणी सावली तालुक्याच्या पाथरी पोलीस स्टेशन येथे अज्ञात सायबर भामट्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.किशोर ढिवरुजी कुणघाडकर,रा.नवतळा, जि.गडचिरोली असे खात्यातून रक्कम लंपास झालेल्या इसमाचे नाव आहे.
किशोर कुणघाडकर हे चंद्रपूर जिल्ह्याच्या
सावली तालुक्यातील पाथरी येथे काही कामानिमित्त वास्तव्यास राहत आहेत.घटनेच्या दिवशी त्यांना ०६२०२१४५६३९ (06202145639) या नंबर वरून मोबाईलवर फोन आला.त्यांनी तो उचलताच समोरील व्यक्तीने ‘मी जिओ केअर सेंटर मुंबई वरून बोलत असून,तुमची सिम व्हेरिफाय होणार आहे.त्यासाठी तुमचे सिम बंद करण्यात येईल.तुम्हाला १० ते १५ मिनिटांनी कंपनीद्वारे फोन येईल व व ते सांगतील, त्यानुसार तुम्ही १ नंबर प्रेस कराल व तुमच्या आधार कार्डचे शेवटचे चार अंक सांगाल’ असे सांगण्यात आले.काही वेळा नंतर पुन्हा ०२२३५०६२२२२ (02235062222)या नंबर वरून कॉल आला.सिम व्हेरिफिकेशन होण्यासाठी १ नंबरची बटण दाबा;असे समोरच्या व्यक्तीने सांगितले.त्यानुसार किशोर कुणघाडकर यांनी १ नंबरची बटण दाबताच
फोन कट होऊन सिम कार्ड बंद झाले आणि लगेच कुणघाडकर यांच्या दोन ते तीन अकाउंट असलेल्या खात्यामधून टप्प्या टप्प्याने असे एकूण ३ लाख २२ हजार ९३४ रुपये लंपास करण्यात आले.काही वेळाने
आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच किशोर कुनघाडकर यांनी पाथरी पोलिस स्टेशन येथे गुन्हा दाखल केला.पोलिसांनी अज्ञात सायबर भामट्या विरुद्ध कलम (भा.न्या.सं.२०२३)३१८(४),(मा. तं. अ. २०००).६६ (क),६६ (ड) गुन्हा नोंदविण्यात आला. घटनेचा पुढील तपास पाथरी पोलिस करीत आहेत.
सावधगिरी बाळगा👇
सायबर गुन्हेगार हा वेगवेगळ्या युक्त्या लढवीत असतात जसे सायबर बुलिंग,जुस जैकिंग,सिम वेरिफिकेशसन,बैंक खाते अपडेट करणे,अश्लील व्हिडिओ बनवून ब्लॅकमेल करणे,कस्टमर केअर नंबर वरून फोन करणे,फ्री गिफ्टचे आमिष दाखविणे,फेक वेबसाईड,अज्ञात ॲप डाऊनलोड करणे,पोलीस अधिकारी असल्याचे सांगून आपल्याला आधार किंवा अन्य कोणतीही माहिती विचारल्यास सांगु नये.तुमचा युपीआय वर चुकीने पैसे पाठविले आहेत ते परत करायला सांगतील तर उत्तर देऊ नये.
प्रमोद रासकर,ठाणेदार पाथरी पोलिस स्टेशन👇
फ्री ऑफरला बळी पडू नका,तुमची वैयक्तिक माहिती सार्वजनिक करणे टाळा,फेक कॉलला उत्तर देऊ नका,कुणालाही ओटीपी सांगु नका,फेक ॲप डाउनलोड करू नका,वारंवार फोन येत असल्यास जवळच्या पोलिस स्टेशनला संपर्क करा,किंवा सायबर हेल्पलाईन १९३० या नंबरवर सपर्क साधावा.सायबर गुन्हेगार यांच्या पासून नागरिकांनी सावध रहावे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

बालविवाह रोखण्यासाठी प्रशासन ॲक्शन मोडवर.. – ग्रामीण भागात बालविवाह रोखण्याची जबाबदारी ग्रामसेवक व ग्रामविकास अधिकाऱ्यांवर..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-अक्षयतृतीयेच्या मुहूर्तावर दरवर्षी बालविवाहाच्या घटना घडण्याची शक्यता लक्षात घेता  गडचिरोली जिल्हा प्रशासन व महिला व बालविकास विभाग ॲक्शन मोडवर आले आहे.या...

उष्णतेचा कहर; उद्याला नागपूर जिल्ह्यातील सर्व शाळा आणि शैक्षणिक संस्था बंद ठेवण्याचे आदेश..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-वाढत्या उष्णतेच्या लाटेचा कहर लक्षात घेता नागपूर जिल्हा प्रशासनाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. भारतीय हवामान विभागाने उद्या,शनिवार १८ एप्रिल रोजी नागपूर...

खताचा काळाबाजार भोवला; देसाईगंजच्या कृषी केंद्र संचालकावर फौजदारी गुन्हा दाखल..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-शेतकऱ्यांच्या हक्काचे अनुदानित डीएपी खत(DAP)अनधिकृतरीत्या जिल्ह्याबाहेर विकणे,खताचा काळाबाजार करणे तसेच शासकीय ई-पॉस(e-POS) प्रणालीमध्ये फेरफार केल्याप्रकरणी देसाईगंज येथील मे.नाकाडे कृषी केंद्रचे संचालक...

देसाईगंज-आरमोरी काँग्रेस कमिटीची “संघटन सृजन अभियान-पदाधिकारी बैठक” संपन्न..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-देसाईगंज शहराच्या सिंधू भवन येथे आज,शुक्रवार १७ एप्रिल रोजी तालुका काँग्रेस कमिटी देसाईगंज-आरमोरी यांच्या वतीने आयोजित “संघटन सृजन अभियान-पदाधिकारी बैठक” उत्साहात पार...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!