Saturday, April 18, 2026
Homeभंडारासावधान..! घरकुलच्या नावाने फसवणूक करणाऱ्यांची टोळी सक्रिय.. - महिलेस घातला गंडा..

सावधान..! घरकुलच्या नावाने फसवणूक करणाऱ्यांची टोळी सक्रिय.. – महिलेस घातला गंडा..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
भंडारा :-राज्यात सध्या स्थितीत विविध घरकुल योजने अंतर्गत नागरिकांना मोठ्या प्रमाणावर घरकुले मंजूर करण्यात आली आहेत.त्यामुळे काही भामट्यांकडून वयोवृध्द तसेच निरक्षर लोकांचा फायदा घेत तुमच्या नावाने घरकुल आले आहे, त्यासाठी काही रक्कम द्यावी लागणार सांगून पैसे लुटण्याचा प्रकार नुकताच उघडकीस आला आहे.  जिल्हा परिषद मधील अधिकारी असल्याचे सांगून भामट्याने फसवणूक केल्याचे लक्षात येताच महिलेने आपबिती सांगितल्याने सदर प्रकरण उजेडात आले आहे.
भंडारा जिल्ह्यात घरकुल यादी प्रसिद्ध होऊन बऱ्याच ठिकाणी कामाला प्रारंभ झाला आहे.याचाच फायदा घेत पवनी तालुक्याच्या कातुर्ली येथे एका भामट्याने गावात प्रवेश केला.जिल्हा परिषदमधील अधिकारी आहे,असे सांगून गावातीलच एका महिलेला घरकुल आल्याचे बोलला.त्यासाठी सहा हजार रुपये रोख रक्कम द्यावी लागेल,अन्यथा तुमचे घरकुल परत जाईल असे सांगितले.महिलेने आमिषाला बळी पडत घरात असलेले सहा हजार रुपये त्या भामट्याला दिले. घडलेला हा प्रकार काल रविवारला महिलेच्या लक्षात आला.गावात कुठल्याही प्रकारची मुनादी व सूचना नसतांना घरकुलाचा मुद्यावर कुणी कसे पैसे मागू शकतो यावरही आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. कोण,कुठल्या प्रकारे फसवणूक करेल,हे सांगताच येत नाही.त्यामुळे नागरिकांनी सतर्कता बाळगलेली बरी.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

बालविवाह रोखण्यासाठी प्रशासन ॲक्शन मोडवर.. – ग्रामीण भागात बालविवाह रोखण्याची जबाबदारी ग्रामसेवक व ग्रामविकास अधिकाऱ्यांवर..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-अक्षयतृतीयेच्या मुहूर्तावर दरवर्षी बालविवाहाच्या घटना घडण्याची शक्यता लक्षात घेता  गडचिरोली जिल्हा प्रशासन व महिला व बालविकास विभाग ॲक्शन मोडवर आले आहे.या...

उष्णतेचा कहर; उद्याला नागपूर जिल्ह्यातील सर्व शाळा आणि शैक्षणिक संस्था बंद ठेवण्याचे आदेश..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-वाढत्या उष्णतेच्या लाटेचा कहर लक्षात घेता नागपूर जिल्हा प्रशासनाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. भारतीय हवामान विभागाने उद्या,शनिवार १८ एप्रिल रोजी नागपूर...

खताचा काळाबाजार भोवला; देसाईगंजच्या कृषी केंद्र संचालकावर फौजदारी गुन्हा दाखल..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-शेतकऱ्यांच्या हक्काचे अनुदानित डीएपी खत(DAP)अनधिकृतरीत्या जिल्ह्याबाहेर विकणे,खताचा काळाबाजार करणे तसेच शासकीय ई-पॉस(e-POS) प्रणालीमध्ये फेरफार केल्याप्रकरणी देसाईगंज येथील मे.नाकाडे कृषी केंद्रचे संचालक...

देसाईगंज-आरमोरी काँग्रेस कमिटीची “संघटन सृजन अभियान-पदाधिकारी बैठक” संपन्न..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-देसाईगंज शहराच्या सिंधू भवन येथे आज,शुक्रवार १७ एप्रिल रोजी तालुका काँग्रेस कमिटी देसाईगंज-आरमोरी यांच्या वतीने आयोजित “संघटन सृजन अभियान-पदाधिकारी बैठक” उत्साहात पार...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!