- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
चंद्रपूर :-हल्ली धान कापणीला वेग आला आहे.धान कापणी करीता मजूर वर्ग शेत बांधावर मोठ्या प्रमाणावर जात आहेत.अशातच गाव खेड्यात धान बांधणी करीता सिंध बांधाची आवश्यकता असल्याने सिंध आणायला जंगल परिसरात गेलेल्या इसमावार वाघाने हल्ला चढविला.यात इसम जागीच ठार झाला असल्याची घटना काल,शनिवारी १० ऑक्टोंबरच्या सकाळी १०:३० वाजताच्या दरम्यान घडली.विलास तुळशीराम मड़ावी वय ५२ वर्षे,रा.डोंगरगाव असे मृताचे नाव आहे.
सिंदेवाही वनपरिक्षेत्रातील उपक्षेत्र सिंदेवाही अंतर्गत येत असलेल्या नियतक्षेत्र डोंगरगाव सा.कक्ष क्रमांक-२५२ मध्ये शनिवारी सकाळच्या सुमारास जंगलात सिंध कापण्यासाठी गेलेल्या इसमावर दबा धरून बसलेल्या वाघाने हल्ला केला.यात त्याचा जागीच मृत्यू झाला.या घटनेची माहिती सिंदेवाही वनविभागाला प्राप्त झाली.त्या आधारे सिंदेवाही वनपरिक्षेत्र (प्रादेशिक)चे वनपरिक्षेत्र अधिकारी विशाल सालकर,क्षेत्र सहाय्यक नितिन गडपायले,पोलिस निरीक्षक विजय राठोड,डोंगरगाव (सा.)आणि कारघाटा येथील पोलिस पाटील यांनी घटनास्थळी भेट दिली.वनविभागाने पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदन करण्याकरिता ग्रामीण रुग्णालय सिंदेवाही येथे पाठविला.
- Advertisement -

