Tuesday, April 21, 2026
Homeभंडाराशिक्षकाचे पाच विद्यार्थिनींशी अश्लील चाळे; पालकांनी चपलेने बदडले..

शिक्षकाचे पाच विद्यार्थिनींशी अश्लील चाळे; पालकांनी चपलेने बदडले..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
भंडारा :-जिल्ह्यात शिक्षकी पेशाला काळीमा फासणारी घटना आज,मंगळवार १० मार्च रोजी उघडकीस आली आहे.एका ५४ वर्षीय शिक्षकाने इयत्ता चौथीच्या पाच विद्यार्थिनींशी अश्लील चाळे केल्याचा संतापजनक प्रकार भंडारा जिल्ह्याच्या पवनी तालुक्यातील वडेगाव येथील जिल्हा परिषद शाळेत उघडकीस आला.नराधम शिक्षक विद्यार्थिनींना मोबाईलवर अश्लील व्हिडिओ दाखवून गैरवर्तन करायचा.सदरचा प्रकार मुलींनी आपल्या पालकांना सांगितला असता संतप्त पालकांनी आज सकाळी शाळेत जाऊन नराधम शिक्षकाला जाब विचारत चपलेने चांगलेच बदडले.पालकांच्या तक्रारीवरुन पोलिसांनी आरोपी शिक्षकाला अटक केली आहे.अनिल जगन राऊत वय ५४ वर्षे असे आरोपी शिक्षकाचे नाव असून पवनी पोलिसांनी नराधम शिक्षकावर पॉक्सो,विद्यार्थ्यांना धमकावणे,मारणे या प्रकारचे गुन्हे दाखल करून अटक केली आहे.
वडेगावच्या जिल्हा परिषद शाळेत इयत्ता पहिली ते चौथ्या वर्गात १९ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत.यातील पाच विद्यार्थिनींसोबत शिक्षकाने लैंगिक छळ केला आहे. आरोपी शिक्षक अनिल राऊत हा मागील पाच वर्षांपासून शाळेत कार्यरत आहे.छळ करून याबाबत कुणाकडे वाच्यता केल्यास जीवे मारण्याची धमकीही त्याने दिली होती.अखेर एका मुलीने याबाबत आपल्या पालकांना सांगितले आणि त्याचे घृणास्पद कृत्ये समोर आले. घटनेचा गांभीर्य लक्षात घेत आरोपी शिक्षकाला अटक करत विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

खेडेगावच्या जगंलात जुगाराचा डाव; अड्ड्यावर पोलीसांची धाड.. – तब्बल २२ आरोपींना अटक करून ७१ लाखाचा मुद्देमाल जप्त..

उद्रेक न्युज वृत्त  कुरखेडा(गडचिरोली):-कुरखेडा तालुक्यातील खेडेगावच्या जगंलात सुरू असलेल्या मोठ्या जुगार अड्ड्यावर मध्यरात्री ते आज मंगळवारी पहाटेच्या दरम्यान स्थानिक गुन्हे शाखा गडचिरोली व पोलीस स्टेशन कुरखेडा...

मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीत ३ हजारापेक्षा अधिकच्या रुग्णालयांचे जाळे; आज ऑनलाईन प्रणालीचे लोकार्पण..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी कक्षाकरिता विकसित करण्यात आलेल्या ऑनलाईन प्रणालीचे आज, मंगळवार २१ एप्रिल रोजी लोकार्पण करण्यात आले.यात राज्यामध्ये कार्यरत असणाऱ्या...

आंघोळ करून शाळेचा गणवेश परिधान करणार! तेवढ्यातच कोसळला खाली.. – शालेय विद्यार्थ्यांचा दुर्दैवी मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  ब्रम्हपुरी(चंद्रपूर):-नुकतेच चंद्रपूर जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणच्या अध्यक्षा वसुमना पंत यांनी जिल्ह्यातील सर्व शैक्षणिक संस्था सकाळच्या सत्रात सुरू करून सकाळी ११...

आता पोलिसांनाही हेल्मेटची सक्ती.. – विना हेल्मेट फोटो वा व्हिडीओ व्हायरल झाल्यास घेतली जाणार गंभीर दखल..

उद्रेक न्युज वृत्त :-कोणतेही नियम वा एखाद्या कायद्याची सक्ती ही सर्वप्रथम सर्वसामान्य नागरिकांसाठी लागू करण्यात येते.मात्र,जे नियम वा सक्ती तुम्ही दुसऱ्यांना सांगता त्याच्या अंमलबजावणीची...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!