Saturday, August 29, 2026
Homeदेसाईगंजऐतिहासिक यश; नैनपूरच्या महात्मा गांधी नगर परिषद उच्च प्राथमिक शाळेस 'आयएसओ' मानांकन..

ऐतिहासिक यश; नैनपूरच्या महात्मा गांधी नगर परिषद उच्च प्राथमिक शाळेस ‘आयएसओ’ मानांकन..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
देसाईगंज(गडचिरोली):-देसाईगंज पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या महात्मा गांधी नगर परिषद उच्च प्राथमिक शाळा नैनपूर या शाळेला आज,बुधवार ११ मार्च रोजी ISO 9001:2015 Quality Management System अंतर्गत आयएसओ मानांकन प्रमाणपत्र प्राप्त झाले आहे.देसाईगंज नगरपरिषद क्षेत्रातील प्रथमच आयएसओ मानांकित शाळा होण्याचा मान या शाळेला मिळाला असून ही संपूर्ण परिसरासाठी अभिमानाची बाब आहे.
या उल्लेखनीय यशामागे शाळेचे मुख्याध्यापक  खेमराज नारायण तिघरे यांचे दूरदृष्टीपूर्ण नेतृत्व,सातत्यपूर्ण प्रयत्न आणि शाळेच्या सर्वांगीण विकासासाठी केलेले समर्पित कार्य कारणीभूत ठरले आहे.त्यांच्या नेतृत्वाखाली शाळेने गुणवत्ता,शिस्त आणि शैक्षणिक प्रगतीचा नवा आदर्श निर्माण केला आहे.या यशात शाळेतील शिक्षकांचेही मोलाचे योगदान आहे.शिक्षक ईश्वर गहाणे यांनी दिलेल्या आर्थिक मदतीमुळे अनेक उपक्रमांना चालना मिळाली. तर शिक्षक मंगेश तुपट यांनी अथक परिश्रम घेत शाळेच्या कामात महत्त्वाची भूमिका बजावली.
विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शिक्षिका तृषाली सुखदेवे व अपर्णा जडे यांनी सातत्याने विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.तसेच प्राची खरकाटे, प्रियंका तलमले व विजय मुळे यांनी विद्यार्थ्यांमध्ये शिस्त,जबाबदारी आणि चांगल्या सवयी रुजविण्यासाठी विशेष प्रयत्न केले. यासोबतच प्रमिला खरकाटे यांच्या सहकार्यामुळे शाळेतील विविध उपक्रम यशस्वीपणे पार पडले.सर्व शिक्षकांच्या जिद्द,चिकाटी आणि एकजुटीच्या भावनेतूनच शाळेला हा मानाचा बहुमान प्राप्त झाला आहे.तसेच शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष  उमाकांत कवासे,उपाध्यक्ष रामेश्वर कांबळे व सर्व शाळा व्यवस्थापन समिती सदस्य यांचे मार्गदर्शन आणि सहकार्य शाळेला सतत लाभले.
नगरपरिषद देसाईगंजचे आरोग्य सभापती चैतनदास विधाते तसेच शिक्षण सभापती बंडूभाऊ यांच्या प्रेरणा आणि प्रोत्साहनामुळे शाळेच्या प्रगतीला नवी दिशा मिळाली आणि आज देसाईगंज नगरपरिषद क्षेत्रातील प्रथम आयएसओ शाळा होण्याचा बहुमान या शाळेला प्राप्त झाला आहे.
  •   खेमराज तिघरे,मुख्याध्यापक👇
महात्मा गांधी नगर परिषद उच्च प्राथमिक शाळा, नैनपूर येथे इयत्ता पहिली ते सातवीपर्यंत प्रवेश प्रक्रिया सुरू असून गावातील तसेच परिसरातील सर्व पालकांनी आपल्या पाल्यांचा प्रवेश या गुणवत्तापूर्ण आयएसओ मानांकित शाळेत करून घ्यावा,असे आवाहन शाळेच्या वतीने करण्यात येत आहे. प्रवेशासाठी इच्छुक पालकांनी त्वरित शाळेशी संपर्क साधावा.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

पीएम श्री छत्रपती शिवाजी महाराज नगर परिषद शाळेत राखी मेकिंग स्पर्धा व रक्षाबंधन कार्यक्रम उत्साहात संपन्न.. -विद्यार्थ्यांनी देसाईगंज पोलिस बांधवांना राखी बांधून व्यक्त केली...

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-देसाईगंज शहराच्या 'पीएम श्री छत्रपती शिवाजी महाराज नगर परिषद उच्च प्राथमिक शाळा जुनी वडसा' येथे आज,शनिवार २९ ऑगस्ट रोजी 'एक राखी देशाचे...

पोलीस दलात खळबळजनक घटना..! पोलीस उपनिरीक्षकाने धावत्या रेल्वे समोर घेतली उडी; घटनास्थळीच मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त :-नुकतेच १६ ऑगस्ट २०२६ रोजी नागपूर पोलिस आयुक्त कार्यालयातील जनसंपर्क व अर्ज शाखेत कार्यरत असलेले सहाय्यक पोलिस निरीक्षक (एपीआय)यांनी शासकीय निवासस्थानी गळफास...

देसाईगंज तालुक्यात रोजगार हमीच्या कामांमध्ये मोठा भ्रष्टाचार.. – काम न करताच उचलली लाखो रुपयांची बिले..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-देसाईगंज तालुक्यात यंत्रणा स्तरावरून करण्यात आलेल्या रोजगार हमी योजनेच्या कामांमध्ये मोठा कथित भ्रष्टाचार झाल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.यात अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या...

सर्व अन्न विक्रेते व्यावसायिकांना परवाना घेणे बंधनकारक.. – पाणीपुरी पासून ते चहा विक्रेते व इतर परवाना नसणाऱ्यांवर होणार कारवाई..

उद्रेक न्युज वृत्त :-अन्न व्यावसायिक विक्रेत्यांना व्यवसाय करण्यासाठी अन्न सुरक्षा व मानके कायदा २००६ चे कलम ३१ अंतर्गत परवाना घेणे किंवा नोंदणी प्रमाणपत्र घेणे...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!