Wednesday, July 15, 2026
Homeभंडाराशिक्षकाचे पाच विद्यार्थिनींशी अश्लील चाळे; पालकांनी चपलेने बदडले..

शिक्षकाचे पाच विद्यार्थिनींशी अश्लील चाळे; पालकांनी चपलेने बदडले..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
भंडारा :-जिल्ह्यात शिक्षकी पेशाला काळीमा फासणारी घटना आज,मंगळवार १० मार्च रोजी उघडकीस आली आहे.एका ५४ वर्षीय शिक्षकाने इयत्ता चौथीच्या पाच विद्यार्थिनींशी अश्लील चाळे केल्याचा संतापजनक प्रकार भंडारा जिल्ह्याच्या पवनी तालुक्यातील वडेगाव येथील जिल्हा परिषद शाळेत उघडकीस आला.नराधम शिक्षक विद्यार्थिनींना मोबाईलवर अश्लील व्हिडिओ दाखवून गैरवर्तन करायचा.सदरचा प्रकार मुलींनी आपल्या पालकांना सांगितला असता संतप्त पालकांनी आज सकाळी शाळेत जाऊन नराधम शिक्षकाला जाब विचारत चपलेने चांगलेच बदडले.पालकांच्या तक्रारीवरुन पोलिसांनी आरोपी शिक्षकाला अटक केली आहे.अनिल जगन राऊत वय ५४ वर्षे असे आरोपी शिक्षकाचे नाव असून पवनी पोलिसांनी नराधम शिक्षकावर पॉक्सो,विद्यार्थ्यांना धमकावणे,मारणे या प्रकारचे गुन्हे दाखल करून अटक केली आहे.
वडेगावच्या जिल्हा परिषद शाळेत इयत्ता पहिली ते चौथ्या वर्गात १९ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत.यातील पाच विद्यार्थिनींसोबत शिक्षकाने लैंगिक छळ केला आहे. आरोपी शिक्षक अनिल राऊत हा मागील पाच वर्षांपासून शाळेत कार्यरत आहे.छळ करून याबाबत कुणाकडे वाच्यता केल्यास जीवे मारण्याची धमकीही त्याने दिली होती.अखेर एका मुलीने याबाबत आपल्या पालकांना सांगितले आणि त्याचे घृणास्पद कृत्ये समोर आले. घटनेचा गांभीर्य लक्षात घेत आरोपी शिक्षकाला अटक करत विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

आजपासून संपूर्ण गडचिरोली जिल्ह्यात जमावबंदी आदेश लागू..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी जिल्हादंडाधिकारी अविश्यांत पंडा यांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियम,१९५१ च्या कलम ३७ (१) व (३)अन्वये संपूर्ण गडचिरोली...

महत्त्वपूर्ण निर्णय..चंद्रपूर डाक विभागातून विभाजन होऊन आता गडचिरोली स्वतंत्र डाक विभाग..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-गडचिरोली जिल्ह्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण निर्णय घेत डाक विभागाने चंद्रपूर डाक विभागातून गडचिरोली डाक विभागाचे प्रशासकीय विभाजन करण्याची अधिकृत घोषणा केली आहे.या...

पदाचा दुरुपयोग; चार लाखाची झाडे विकली एक लाखात,सरपंच अपात्र..

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-काहीजण एखाद्या पदावर विराजमान झाले की,स्वतःला मोठे पदाधिकारी समजून मनमर्जीने निर्णय घेण्याचा सपाटा चालवतांना दिसून येतात.पण,आपल्या मागची पार्श्वभूमी काय होती आणि...

आता भेसळयुक्त आणि दूषित अन्नाची एकाच तक्रारीवर होणार कारवाई..

उद्रेक न्युज वृत्त :-भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरण म्हणजेच एफएसएसएआयने भेसळयुक्त आणि दूषित अन्नावर कारवाई करण्यासाठी 'फूड सेफ्टी कनेक्ट' ॲप सुरू केले आहे.या...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!