उद्रेक न्युज वृत्त
आरमोरी :- तालुक्यातील मोठे गाव असलेल्या वासाळा येथील दिक्षाभुमीच्या आवारात भव्य-दिव्य असे बुद्धविहार साकारण्यात येत आहे.गगण मलीक यांनी ६ फुटाची बुद्ध मुर्ती बौद्ध समाज मंडळ वासाळा येथील बौद्ध बांधवास दान केली असून दिक्षाभूमी आवारातील सभोवती १० लाखांचे वाल कंपाऊंड तयार झाले आहे व बुद्ध विहाराचे बांधकाम प्रगती पथावर आहे.संपूर्ण बांधकाम अवघ्या दोन महिन्यात पूर्णत्वास आणले जाणार असुन येत्या १४ एप्रिल ते बुद्ध जयंती पर्यंत भव्य कार्यक्रम आयोजीत करण्यात येणार आहे.
बौध्द समाज मंडळ वासाळाचे अध्यक्ष तानु मेश्राम, सचिव भाऊराव रामटेके तसेच प्रा.मुनिश्वर बोरकर,टि. एम.खोब्रागडे,अशोक श्यामकुळे,नामदेव मेश्राम तसेच बौद्ध बांधव वासाळाआदी उपसकांचे अथक परिश्रम सुरु आहेत.बुद्ध विहाराचे बांधकामा करीता दान करणारे प्रा.मुनिश्वर बोरकर ५५ हजार रुपये,भाग्यवान खोब्रागडे ५१ हजार रुपये,प्राचार्य मदन मेश्राम ५१ हजार रुपये,शालीनी गेडाम ५१ हजार रुपये,प्राचार्य प्रकाश मेश्राम ५१ हजार रुपये,योगेश शेन्डे ५१ हजार रुपये,रवींद्र जनवार ५१ हजार रुपये,ॲड.राम मेश्राम ११ हजार रुपये,मनोज मेश्राम २१ हजार रूपये,प्रा. नोमेश मेश्राम २१ हजार रुपये,जिबकाटे २१ हजार रुपये,भाग्यवान टेकाम माजी जि.प.सदस्य २१ हजार रुपये, प्रा.पार्टाकस शेन्डे २१ हजार रुपये,माजी आमदार डॉ.रामकृष्ण मडावी २१ हजार रुपये, ११ हजार रुपये गुणवंत शेन्डे,१५ हजार दान करणारे गावातील कर्मचारी व इतरांच्या सहकार्याने बुद्ध विहार साकार होत आहे.दान करणाऱ्यांनी कार्यक्रम होइपर्यत सहकार्य करावे अशी विनंती सामाजीक कार्यकर्ते प्रा.मुनिश्वर बोरकर वासाळा यांनी केले आहे.