Friday, June 19, 2026
Homeनाशिकअन् ग्रामस्थांनी संपूर्ण गावच विक्रीचा घेतला ठराव

अन् ग्रामस्थांनी संपूर्ण गावच विक्रीचा घेतला ठराव

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त

नाशिक :- पाहिजे त्या प्रमाणात शेत मालाला भाव मिळत नाही.कितीही राबून कर्जाचे डोंगर उभे येऊन ठाकले आहे.कधी किडीचा प्रादुर्भाव,तर कधी अवकाळी पाऊस,गारपीट व इतर समस्यांना शेतकरी बांधवांना सामोरे जावे लागत आहे.अशातच शेत मालाच्या पिकांचे उत्पादन चांगले झाल्यास योग्य भाव मिळत नसल्याने काल सोमवारी गावातील शेतकऱ्यांची बैठक घेण्यात आली.माळवाडी गावातील ९५ टक्के शेतकरी हे कांदा उत्पादक आहेत.याशिवाय नगदी पिक म्हणून काही जण भाजीपालाही लावतात.मात्र,गावकरी घेत असलेल्या कोणत्याही पिकाला गेल्या ३ ते ४ वर्षांत योग्य भाव मिळाला नाही,असा मुद्दा ग्रामस्थांनी मांडला.गावातील सर्व कुटुंबांचे उदरनिर्वाहाचे प्रमुख साधन शेती आहे. मात्र,शेतीमालाला भावच मिळत नसल्याने शेतकऱ्यांकडे उदरनिर्वाहासाठीही पैसे राहत नाही.आरोग्य,शिक्षण,लग्न आणि दैनंदिन जीवन जगण्यासाठी लागणार पैसाच शेतकऱ्यांना शेती व्यवसायातून मिळत नाही.त्यामुळे हे गावच विकावे व त्यातून पैसे मिळावेत; असा ठराव ग्रामस्थांनी केला आहे.

ग्रामस्थांच्या सभेत राज्य सरकारकडे काही मागण्याही करण्यात आल्या.पुर्णपणे शेतीवर अवलंबून असलेल्या शेतकऱ्यांच्या किमान गरजा पूर्ण व्हाव्यात आणि कर्जफेड करता येईल,इतपत त्याच्या मालाला भाव मिळावा; अशी प्रमुख मागणी ग्रामस्थांनी केली. सरकारने आमच्या मागण्यांची गंभीर दखल घ्यावी. शेतमालाला चांगला भाव मिळवून देण्यासाठी सरकारने प्रयत्न करावेत.अन्यथा आम्हाला गाव विकायचे आहे,ते सरकारनेच विकत घ्यावे; अशी मागणी देवळा तालुक्यातील ग्रामस्थांनी केली आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

जीएसटी नंबर मिळवून दिले नं..! आता दहा हजार द्या.. – राज्यकर निरीक्षक लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-गलेलठ्ठ पगार असतांना एकदा कां ओवर कमाईची सवय लागली रे लागली,तर मग ज्या टेबलावर कुठलेही काम मोफत जरी होत असेल तरी...

स्थानिक उत्पादनांना मिळणार नवी ओळख; गडचिरोली ब्रँडसाठी स्वतंत्र लोगो आणि टॅगलाईन..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-स्थानिक उत्पादनांना जागतिक बाजारपेठ मिळवून देण्यासाठी स्वतंत्र 'गडचिरोली ब्रँड' विकसित करणे,पर्यटन विकासाला गती देणे,महिला बचत गटांना अधिक सक्षम बनविणे,धान साठवणुकीची क्षमता...

गडचिरोलीतील सहा लोहखनिज खाणी महाराष्ट्र राज्य खनिज महामंडळाला द्याव्यात- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस – गडचिरोली हे भविष्यात देशातील महत्त्वाचे औद्योगिक व पोलाद उत्पादन केंद्र म्हणून...

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-महाराष्ट्राला देशातील ‘ग्रीन स्टील हब’ बनविण्याच्या उद्देशाने केंद्रीय कोळसा व खनिकर्म मंत्रालयाने गडचिरोलीतील सहा लोहखनिज खाणी महाराष्ट्र राज्य खनिज महामंडळाला द्याव्यात,अशी...

माजी सैनिकास पैश्याची मागणी; महिला लिपिक एसीबीच्या कचाट्यात..

उद्रेक न्युज वृत्त  गोंदिया :-एका ३६ वर्षीय महिला लिपिकेस(महसुल सहाय्यक)माजी सैनिक यांचे ताब्यात असलेली सिलींगची अतिक्रमीत जमीन माजी सैनिक म्हणुन त्यांचे नावावर नियमीत करुन देण्याच्या...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!