Friday, June 19, 2026
Homeनाशिकविद्युत निरीक्षक कार्यालयातील महिला शिपाई पाचशे रुपयासाठी अडकली एसीबीच्या जाळ्यात..

विद्युत निरीक्षक कार्यालयातील महिला शिपाई पाचशे रुपयासाठी अडकली एसीबीच्या जाळ्यात..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

नाशिक :- शहरातील विद्युत निरीक्षक कार्यालयात कार्यरत असलेल्या महिला शिपाई गीता हेमंत बोकडे वय ४५ वर्षे,रा.अशोकामार्ग, यांनी पाचशे रूपयांची लाच घेतल्याचे उघडकीस आले आहे.लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने काल,सोमवारी दि. १३ मे रोजी बोकडे यांना लाच घेताना रंगेहात पकडले.

एका तक्रारदार महिलेला विद्युत ठेकेदार व पर्यवेक्षक परवाना मिळण्याकरिता विद्युत निरीक्षक कार्यालयात अर्ज करायचा होता.बोकडे यांनी तक्रारदार महिलेला परवान्यासाठी लागणारी कागदपत्रे मिळवून देते, असे सांगून त्यांच्यावर प्रभाव टाकला.तसेच दीड हजार रूपयांची लाच मागितली.सापळ्यात अडकण्यापुर्वी एक हजार रूपये बोकडे यांनी तक्रारदार महिलेकडून स्वीकारले होते.काल,सोमवारी उर्वरित पाचशे रूपये पंचांसमक्ष स्वीकारले असता त्यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलिस निरिक्षक गायत्री जाधव,हवालदार ज्योती शार्दूल,संदीप वणवे यांच्या पथकाने सायंकाळी कार्यालयाच्या आवारात रंगेहाथ ताब्यात घेतले.त्यांच्याविरूद्ध भद्रकाली पोलिस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्याचे काम रात्री उशीरापर्यंत सुरू होते.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

जीएसटी नंबर मिळवून दिले नं..! आता दहा हजार द्या.. – राज्यकर निरीक्षक लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-गलेलठ्ठ पगार असतांना एकदा कां ओवर कमाईची सवय लागली रे लागली,तर मग ज्या टेबलावर कुठलेही काम मोफत जरी होत असेल तरी...

स्थानिक उत्पादनांना मिळणार नवी ओळख; गडचिरोली ब्रँडसाठी स्वतंत्र लोगो आणि टॅगलाईन..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-स्थानिक उत्पादनांना जागतिक बाजारपेठ मिळवून देण्यासाठी स्वतंत्र 'गडचिरोली ब्रँड' विकसित करणे,पर्यटन विकासाला गती देणे,महिला बचत गटांना अधिक सक्षम बनविणे,धान साठवणुकीची क्षमता...

गडचिरोलीतील सहा लोहखनिज खाणी महाराष्ट्र राज्य खनिज महामंडळाला द्याव्यात- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस – गडचिरोली हे भविष्यात देशातील महत्त्वाचे औद्योगिक व पोलाद उत्पादन केंद्र म्हणून...

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-महाराष्ट्राला देशातील ‘ग्रीन स्टील हब’ बनविण्याच्या उद्देशाने केंद्रीय कोळसा व खनिकर्म मंत्रालयाने गडचिरोलीतील सहा लोहखनिज खाणी महाराष्ट्र राज्य खनिज महामंडळाला द्याव्यात,अशी...

माजी सैनिकास पैश्याची मागणी; महिला लिपिक एसीबीच्या कचाट्यात..

उद्रेक न्युज वृत्त  गोंदिया :-एका ३६ वर्षीय महिला लिपिकेस(महसुल सहाय्यक)माजी सैनिक यांचे ताब्यात असलेली सिलींगची अतिक्रमीत जमीन माजी सैनिक म्हणुन त्यांचे नावावर नियमीत करुन देण्याच्या...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!